- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
संजय नेवे,विक्रमगड श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आज सहा.गटविकास अधिकाऱ्यांची भेट, विक्रमगड तालुका हा आदिवासीबहुल तालुका असुन अनेक ग्रामपंचायतीमध्ये पेसा अंतर्गत अनेक विकासकामे करण्यात येत असतात.या विकासकामांच्या बाबतीत काही तक्रारी यावेळी करण्यात आल्या.तसेच घरकुलातील काही लाभार्थ्यांचा हप्ता मिळत नसल्याने शिष्टमंडळाने मागणी केली. जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाला असून विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात, बोरवेल विहिरीतील पाण्याची पातळी कमी होत असून पाणीपुरवठा विभागाने यावर ठोस उपाय योजावेत,अशा विविध मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या शिष्टमंडळामध्ये मंगेश काळे,रुपेश डोले व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा समावेश होता.
सुरेश वैद्य,पालघर २८ मार्च रोजी पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन, राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २८ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता जनता दरबाराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे करण्यात येणार आहे. आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराविषयी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यावेळी ते बोलत होते. या जनता दरबारात नागरिकांनी आपली निवेदने तीन प्रतीमध्ये सादर करावित. नागरिकांनी लिखित स्वरूपात आपले प्रश्न नोंदवून घेण्यासाठी प्रशासनाने विविध विभागाच्या २० टेबलांची व्यवस्था केली असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले. सदर ठिकाणी जनता दरबारासाठी येणाऱ्या नागरिकांचे अर्ज नोंदणी करून टोकनचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच जिल्हाधिकारी…
सुशील भोईर,वसई, हर्ष सेन मृत्यूप्रकरणी दोषी व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, हर्ष सेन यांच्या दुर्दैवी आणि अकाली मृत्यूला जबाबदार असलेल्या फनफेअर आयोजक व ऑपरेटर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी वसई फेडरेशनतर्फे महत्त्वाची बैठक घेण्यात आली.या बैठकीस आम आदमी पार्टी,शिवसेना ( उबाठा ) आणि काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस चेतन मेच्चा,सुशील द्विवेदी जॉन परेरा,आम आदमी पार्टी, प्रवीण म्हाप्रळकर, सुरेंद्र सिंह,शिवसेना ( उबाठा ) रवी भूषण,काँग्रेस,वसई-विरार तसेच,वसई फेडरेशनचे पदाधिकारी जोसेफ वर्गीस आणि संदीप मायकर उपस्थित होते. या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजीत कुमार पवार यांची भेट घेऊन…
सचिन परब,वसई, वसईत धान्याचा काळाबाजार करणाऱ्या ५ दुकानाचे परवाने रद्द, वसईत धान्याचा काळाबाजार करणार्या ५ शिधावाटप दुकानांचे परवाने पुरवठा विभागाकडून रद्द करण्यात आले आहेत.सध्या या रास्तभाव दुकानातील कार्ड्स आसपासच्या परिसरातील दुकानाना जोडण्यात आली आहेत.जेणेकरून लोकांना या कारवाईचा त्रास होणार नाही. या दुकानात येणारे धान्य खाजगी बाजारात विकले जात असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे सातत्याने येत होत्या.याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात रास्तभाव दुकानदारांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. शिधावाटप दुकानात धान्याचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.भारतीय खाद्य निगमकडून येणारे धान्य शिधावाटप केंद्रात न उतरवता ते अन्य ठिकाणी उतरवले जात होते.यामध्ये रास्तभाव दुकान चालवणारे जगदंबा महिला बचत गट,जितेंद्र चव्हाण,श्रमिक महिला बचत…
दीपक मोहिते बॉटमलाईन, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या : कर्जमाफी हा उपाय नाही,शेतकऱ्यांच्या गरजा सरकारने लक्षात घ्यायला हव्यात… शेतकरी आत्महत्येचा आलेख सतत वर जात असुन तो थांबवण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले,तरी शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे.गेल्या सहा महिन्यात राज्यात अडीच हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.आजही शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे.कर्ज काढून पेरणी करणे,पीक वाचवण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी शेतमालाला भाव नाही.अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी,याविषयी कायम घोर लागलेला असतो.या व इतर कारणांमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या (एन.सी.आर.बी.) अहवालानुसार २०२० मध्ये देशात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” फडणवीस सरकारने नैतिक जबाबदारी स्विकारून पायउतार व्हावे, दोन दिवसापूर्वी झालेल्या दंगलीनंतर आता नागपूर शहर तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.पोलिसांनी आता दंगलखोरांचे अटकसत्र सुरू केले आहे.या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दंगलीमागे ” सुनियोजित पॅटर्न,” असल्याचे म्हंटले आहे.त्यामुळे ही दंगल घडवून आणण्यामागे असलेले ” सुनियोजित पॅटर्न,” अमलात आणणारे कोण आहेत,हे हुडकून काढण्याची जबाबदारी ही त्यांच्याच सरकारची आहे,ती त्यांनी टाळता कामा नये.दरम्यान शहरातील तणावाचे वातावरण झपाट्याने निवळत आहे,ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे.पण या घटनेने या सरकारची विश्वासार्हता पार रसातळाला गेली आहे.महाराष्ट्राच्या गेल्या ६५ वर्षीच्या वाटचालीला काळिमा घडणारी ही घटना असून मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या फडणवीस…
वसंत भोईर,वाडा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे गुरुवारी वाड्यात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या गुरुवारी वाड्यात येणार असून काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते,पदाधिकारी व ब्लाॅक अध्यक्षांसोबत ते लवीश हाॅल हरोसाळे येथे संवाद साधणार आहेत. काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे गुरूवारी वाड्यात येत आहेत. ते हरोसाळे येथील लवीश हाॅल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.गुरुवारी सकाळी १०.०० वाजता त्यांचे वाड्यात आगमन होईल त्यांनंतर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी व ब्लाॅक अध्यक्षांसोबत ते संवाद साधणार आहेत.हा कार्यक्रम उरकल्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेनंतर होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष…
दीपक मोहिते, नागपूर हिंसाचार: सरकारने संयमाने वागण्याची गरज,विरोधकांनीही आगीत तेल ओतू नये, ज्याची भिती होती,तेच नेमके नागपूर शहरात घडलं,या शहरात जी दंगल घडली,त्यामागे कोण आहेत.हे हुडकून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.पण या सर्व प्रकरणी राज्याच्या तपास यंत्रणाचे पितळ उघड्यावर पडले आहे.शहरात काय चाललंय, याची खबरबात म्हणा सुगावा जर अन्वेषण विभागाला लागत नसेल तर या विभागाचीही सखोल चौकशी व्हायला हवी. सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलाच वादंग सुरू असून राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून कबर हटवण्याची मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे. मात्र,राज्याची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरातील या आंदोलनानंतर तेथे हिंसाचार उफाळला व परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली.नागपूरच्या चिटणीस पार्कजवळ आणि शिवाजी चौक परिसरात जाळपोळ व…
शुभम सावंत,विरार, विवा महाविद्यालयाला सलग दोन वर्षे पुरस्कार,सर्वत्र कौतुकाचा वर्षाव, विरार येथील विवा महाविद्यालयाला २०२४ या वर्षांकरिता ” सेंटर ऑफ एक्सलन्स,” राज्यस्तरीय ” उत्कृष्ट महाविद्यालय,” ( पाचवा क्रमांक ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य उच्च,तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा राज्यस्तरीय स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा २०२५ नुकताच यशवंराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडला. राज्यातील ५० महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे.यावर्षी महाविद्यालयाने करिअर कट्टा उपक्रमाद्वारे विविध उपक्रम व योजना राबवत पालघर जिल्हात प्रथम येत ए + ग्रेड सोबतच सेंटर ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्राप्त केला.हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या…
शुभम सावंत विरार, विरार येथे स्त्री सन्मान सोहोळा संपन्न, बहुजन विकास आघाडी,युवा विकास आघाडी व विराट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.भारती देशमुख स्मृतिप्रित्यर्थ जागतिक महिला दिन विशेष “ स्त्री सन्मान,“ सोहळा व खाद्य कला महोत्सव,” चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या खाद्य महोत्सवांमध्ये ५० महिलांनी विविध प्रकारचे स्टॉल्स लावले होते.तर ५० महिलांनी विविध आपल्या विविध कला सादर केल्या. या सोहळ्यात ४० महिलांचा त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल स्त्री सन्मान हे चिन्ह देवून त्यांना गौरवण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी डिजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला.सोबतच सर्व सहभागी महिलांना सन्मानचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यास स्व.भारती देशमुख यांची कन्या गौरी देशमुख…
