सुशील भोईर,वसई,
हर्ष सेन मृत्यूप्रकरणी दोषी व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,
हर्ष सेन यांच्या दुर्दैवी आणि अकाली मृत्यूला जबाबदार असलेल्या फनफेअर आयोजक व ऑपरेटर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी वसई फेडरेशनतर्फे महत्त्वाची बैठक घेण्यात आली.या बैठकीस आम आदमी पार्टी,शिवसेना ( उबाठा ) आणि काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीस चेतन मेच्चा,सुशील द्विवेदी जॉन परेरा,आम आदमी पार्टी,
प्रवीण म्हाप्रळकर,
सुरेंद्र सिंह,शिवसेना ( उबाठा )
रवी भूषण,काँग्रेस,वसई-विरार
तसेच,वसई फेडरेशनचे पदाधिकारी जोसेफ वर्गीस आणि संदीप मायकर उपस्थित होते.
या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजीत कुमार पवार यांची भेट घेऊन सदर मागणी केली.त्यामुळे आयोजक आणि ऑपरेटरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
यावेळी पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल,असे स्पष्ट केले आहे.या घटनेमध्ये वसई-विरार महानगरपालिका अधिकारी तसेच राजकीय संबंध असलेले अन्य कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकरणी वसंत नगरीतील नागरिक एकजूट होत आहेत आणि सर्व दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची तयारी देखील करत आहेत.तसेच,वसंत नगरी मैदान,हे व्यवसायिक कारणांसाठी वापरण्यात येऊ नये आणि ते केवळ मुले,नागरिक व सार्वजनिक उपयोगासाठी राखीव ठेवण्यात यावे,अशी मागणी विविध पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे.
हर्ष सेन या तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी हा लढा आहे. या लढ्यात सर्व नागरिकांनी एकत्र यावे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा,असे आवाहन विविध पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.

