वसंत भोईर,वाडा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे गुरुवारी वाड्यात,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या गुरुवारी वाड्यात येणार असून काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते,पदाधिकारी व ब्लाॅक अध्यक्षांसोबत ते लवीश हाॅल हरोसाळे येथे संवाद साधणार आहेत.
काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे गुरूवारी वाड्यात येत आहेत. ते हरोसाळे येथील लवीश हाॅल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.गुरुवारी सकाळी १०.०० वाजता त्यांचे वाड्यात आगमन होईल त्यांनंतर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी व ब्लाॅक अध्यक्षांसोबत ते संवाद साधणार आहेत.हा कार्यक्रम उरकल्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेनंतर होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी दिली आहे.
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हे प्रथमच वाड्यात येत असल्याने त्यांच्या स्वागता साठी काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे.

