संजय नेवे,विक्रमगड
श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आज सहा.गटविकास अधिकाऱ्यांची भेट,
विक्रमगड तालुका हा आदिवासीबहुल तालुका असुन अनेक ग्रामपंचायतीमध्ये पेसा अंतर्गत अनेक विकासकामे करण्यात येत असतात.या विकासकामांच्या बाबतीत काही तक्रारी यावेळी करण्यात आल्या.तसेच घरकुलातील काही लाभार्थ्यांचा हप्ता मिळत नसल्याने शिष्टमंडळाने मागणी केली.
जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाला असून विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात, बोरवेल विहिरीतील पाण्याची पातळी कमी होत असून पाणीपुरवठा विभागाने यावर ठोस उपाय योजावेत,अशा विविध मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
या शिष्टमंडळामध्ये मंगेश काळे,रुपेश डोले व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा समावेश होता.

