शुभम सावंत विरार,
विरार येथे स्त्री सन्मान सोहोळा संपन्न,
बहुजन विकास आघाडी,युवा विकास आघाडी व विराट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.भारती देशमुख स्मृतिप्रित्यर्थ जागतिक महिला दिन विशेष “ स्त्री सन्मान,“ सोहळा व खाद्य कला महोत्सव,” चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या खाद्य महोत्सवांमध्ये ५० महिलांनी विविध प्रकारचे स्टॉल्स लावले होते.तर ५० महिलांनी विविध आपल्या विविध कला सादर केल्या.
या सोहळ्यात ४० महिलांचा त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल स्त्री सन्मान हे चिन्ह देवून त्यांना गौरवण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी डिजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला.सोबतच सर्व सहभागी महिलांना सन्मानचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यास स्व.भारती देशमुख यांची कन्या गौरी देशमुख व त्यांची नात उपस्थित होत्या.तसेच हार्दिक राऊत,कांता पाटील,वासंती पाटील,रिटा सरवैय्या व विभागातील महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.याप्रसंगी महिलांची लक्षणीय होती.जेष्ठ नागरिक,महिला,पुरुष,लहान मुलांच्या उपस्थितीने कार्यक्रमात रंगत आली.

