Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जनतेची फसवणूक करणे,थांबवा आता… स्वार्थ,व राजकीय लाभ,अशा जीवघेण्या स्पर्धेत आता माणुसकी हरवत चालली आहे.सांगली जिल्ह्यात एका विद्यर्थिनीला कमी गुण मिळाल्यामुळे तिच्या जन्मदात्या बापाने बळी घेतला.ग्रामीण भागातील शेतकरी दिवसागणिक मृत्यूला कवटाळत आहे.पण आपल्या राज्यकर्त्यांच्या हृदयाला पाझर फुटत नाही.फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा दिवसेंदिवस काळवंडत चालला आहे. राज्यात सर्वसामान्य माणसाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य,शिक्षण,रोजगार, कृषी,महागाई,पायाभूत सोयी-सुविधा व ग्रामविकास इ.क्षेत्राचा समावेश आहे.पण दुर्देवाने आपले राज्यकर्ते समाजकारणाऐवजी धर्मकारणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत.समाजात गोरगरीब जनतेची पिळवणूक करणाऱ्या मूठभर शेठजींचा अपवाद वगळता प्रत्येक घटक आज उपेक्षित जीवन जगत आहे.महागाईने परमसीमा गाठली आहे.जीवनावश्यक वस्तूवर लादण्यात आलेल्या जीएसटीने तर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून पडले…

Read More

दीपक मोहिते, ” बाळबोध, ” पहिलीपासून पाठ्यपुस्तकात या धड्याचा समावेश करण्यात यावा, १ ) गद्दारी कशी करतात ? २ ) गद्दारी करण्यासाठी किती मोबदला ( पेट्या किंवा खोके ) दिला जातो ? ३ ) गद्दारी केल्यानंतर लाभार्थ्यांना खोक्या व्यतिरिक्त अन्य कोणकोणते लाभ मिळतात ? ( खासदारकी,आमदारकी,मंत्रिपदे व महामंडळाची अध्यक्ष किंवा संचालकपदे ) ४ ) गद्दारी करणाऱ्यांच्या मुलाबाळाना कोणते लाभ मिळतात ? ५ ) गद्दारी करणाऱ्या गद्दारांची सारी पापे स्वच्छ धुतली जातात का ? ६ ) गद्दारांची पापे धुण्यासाठी कोणते वॉशिंग पावडर वापरले जाते ? या सगळ्या विषयांची माहिती या विद्यार्थ्यांना मिळावी,त्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने एखादी अभ्यास समिती नेमावी.हे पाठ्यपुस्तक बाजारात…

Read More

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी ; विश्लेषण, जग विनाशाच्या वाटेवर…. इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाची व्याप्ती आता वाढत चालली आहे.हमास व हिजबुल्लाह याना नामशेष केल्यानंतर इस्रायलने आपला मोर्चा इराणकडे वळवला आहे.वास्तविक इस्त्रायलने इराणवर हल्ला करण्याचे काहीच कारण नव्हते.पॅलेस्टाईन,हमास व हिजबुल्लाह यांना इराण,सीरिया,येमेन व तुर्कस्तान,या देशाकडून आर्थिक व संरक्षण साहित्याची मदत करण्यात येते.त्यामुळे इस्त्रायल व अमेरिका ही दोन राष्ट्रे या मुस्लिम देशांना सतत पाण्यात पाहत असतात.अमेरिका हा एक व्यापारी देश असून तो आपला व्यापार वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जात असतो.इराण,इराक कुवेत व सौदी अरेबिया,तुर्कस्तान,इजिप्त व जॉर्डन ही राष्ट्रे तेलसंपन्न राष्ट्रे असून,जगातील एकूण तेल उत्पादनापैकी ४० % तेलउत्पादन इराणमध्ये होत असते.तर इराण व इराक आपले तेल रशिया,चीन,उत्तर…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा – भिवंडी रस्त्याची दुरावस्था, भिवंडी- वाडा – मनोर महामार्गाची दुरवस्था ; रिक्षा चालकांमध्ये संताप, भिवंडी – वाडा – मनोर महामार्गाचे गेल्या सात महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.सध्या खड्ड्यातून एक दिशेने वाहतूक सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना तोंड द्यावे लागत आहे.रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. वाहनचालक व प्रवाशांना कंबर दुखी,पाठ दुखी असा असा त्रास सुरू झाल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भिवंडी- वाडा- मनोर या ६४ कि.मी.अंतराच्या महामार्गासाठी ८०३ कोटी रु.चा निधी देण्यात आला आहे.या कामाचा ठेका ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीकडे आहे. या कंपनीकडून एका बाजूचे काम सुरू असून,तेही…

Read More

दीपक मोहिते, बकासुर उपायुक्त,नराधमाच्या भूमिकेत, भ्रष्ट व्यवस्थेला आम्ही प्रश्न विचारणारच, आम्ही व्यवस्थेवर प्रहार करतो, त्यांना प्रश्न विचारतो,त्यामुळे मूठभर भ्रष्ट राजकीय नेत्यांचे पित्त खवळते.त्यांचं ” पित्त खवळणं,” ही आमच्यासाठी एकप्रकारची पोचपावतीच असते.जेंव्हा त्यांचा संताप होतो,त्यावेळी आमचा घाव त्यांच्या वर्मी बसल्याचे आम्ही मानतो.ज्यावेळी आमच्यावर राजकीय नेत्यांचे फंटर्स तोंडसूख घेतात,त्यावेळी तर आम्हाला असुरी आनंदच होत असतो. व्यवस्थेतील गैरप्रकार व भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणण्याकामी आम्हाला वेगळीच ऊर्जा मिळत असते. एसटीपी प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात एका राजकीय नेत्याने,तुमच्या – आमच्या तीनशे कोटी रु.चा कसा चुराडा केला ते लवकरच वाचा.तर एका बिल्डर समूहाने गोरगरीब रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्थेची अतिरिक्त जमीन बळकावून टोलेजंग इमारत कशी बांधली.यावर लवकरात लवकर आमचे…

Read More

दीपक मोहिते, वसई विरार मनपाच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदारराजा काय करणार ? महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत विरार,नवघर – माणिकपूर,वसई,नालासोपारा, नायगाव जुचंद्र,पेल्हार,सातिवली वालीव व कामण,या भागात कशा लढती होतील ? याविषयी ढोबळ अंदाज, १ ) विरार – बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप, २ ) नवघर माणिकपूर – बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप/ शिंदे गट,क्रमांक ३ वर शिवसेना ( उबाठा ) ३ ) वसई – भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी, ४ ) नालासोपारा – भाजप/ शिवसेना ( शिंदे गट ) विरुद्ध शिवसेना ( उबाठा ) बहुजन विकास आघाडी, ( येथे बविआने नविन चेहऱ्यांना संधी दिल्यास थोडेफार यश मिळू शकेल.तेही पक्षातील अंतर्गत मतभेद व…

Read More

वसई,पालघर,विक्रमगड,तलासरी,जव्हार, पालघर जिल्ह्यात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, काल वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विक्रमगड,जव्हार,तलासरी, तालुक्यात “आंतरराष्ट्रीय योग दिन,” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ” योग सत्राचे,” आयोजन करण्यात आले होते. योग सत्रामध्ये योग प्रशिक्षक व सहकारी प्रशिक्षकांतर्फे विविध प्रकारची योगासने सादर करण्यात आली.उपस्थित मान्यवर, मनपा अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांनीही योगासने करीत त्यास उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Read More

मनिष धानू,डहाणू बुलेट ट्रेन ; लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एन.एच.एस.आर.सी.एल) ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मी.लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या नुकताच बसवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मार्ग १५६ कि.मी.लांब असून त्यामध्ये खालील टप्प्याचा समावेश आहे. • वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स ( मुंबई उपनगर ) येथे एक भुयारी स्थानक, • मुंबईतील वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्याच्या शिळफाटा दरम्यान २१ कि.मी.लांबीचा बोगदा • शिळफाटा ते झरळी गाव ( महाराष्ट्र-गुजरात सीमा,) पर्यंत १३५कि.मी.उंचावरील मार्गिकेचा समावेश आहे अ.१२५ कि.मी.लांबीचा व्हायाडक्टचा समावेश आहे • १०३ कि.मी.लांबीचा…

Read More

वसंत भोईर,वाडा संरक्षक भिंतीच्या बांधकामात केला दगडांचा वापर ; भिंत पाडण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश वाडा नगरपंचायत हद्दीत कवटेपाडा रस्त्यालगत नगरपंचायतीतर्फे सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामात ठेकेदाराने सर्रास दगडांचा ( डबर ) वापर करत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे. याविरोधात तक्रारी झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने हे संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडण्याचे आदेश ठेकेदाराला बजावले आहेत. त्यामुळे विकासकामांतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे. वाडा नगरपंचायत हद्दीतील कवटेपाडा मधील बांबेरे यांच्या घरालगत संरक्षक भिंत बांधणे, हे सुमारे ९० लाख रु. अंदाजपत्रकीय तरतूद असलेले काम माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले होते.या ठेकेदाराने संरक्षक भिंतीचे बांधकाम करताना राजरोसपणे दगडांचा ( डबर ) वापर केल्याचे वृत्त दैनिक…

Read More

दीपक मोहिते, बविआशी ” साथसंगत नको रे बाबा,” काँग्रेसजनांची प्रखर भूमिका, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली वसई विरार जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक टिळक भवनात नुकतीच पार पडली.या बैठकीला प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.राज्यातही पक्षाची प्रचंड वाताहत झाली.त्यामुळे नाना पटोले याना पक्षश्रेष्टींनी डच्चू दिला व त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लावली.पण गेल्या सहा महिन्यांच्या काळात सपकाळ हे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू…

Read More