- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा, वाडा – वडवली हद्दीतील टायर कंपन्या उठल्या शेतकऱ्यांच्या मुळावर, तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील मुसारणे पाडा व चिंचघरपाडा येथील टायर कंपन्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. त्यांच्या मातीभरावाने येथील शेतकऱ्यांची भातशेती पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहॆ.त्यामुळे परिसरातील शेतजमिनी नापीक होणार आहेत.येथील शेतकरी आता देशोधडीला लागणार आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय या कंपन्यानी येथील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून पाण्याचा मार्ग बदलला आहे व नालाही अरुंद केल्याने नाल्याच्या पाण्याचा निचरा होणार नाही.त्यामुळे शेतजमिनीची नासाडी होणार होईल,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहॆ.या नाल्यात रसायन मिश्रित दूषित पाणी सोडले जात असल्यामुळे नागरिकांसह गुराढोरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.या कंपन्या इतरत्र…
दीपक मोहिते, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून लवकरच वसई – विरारचा पाणीपुरवठा सुधारणार, वसई विरार शहरातील पाणी वितरण व्यवस्था आता लवकर सुधारणार असून शहरांसोबतच महापालिकेत समाविष्ट गावांनाही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.अमृत २.o अभियानांतर्गत शहरातील जल वितरण व्यवस्था बळकट आणि विस्तारित करण्यासाठी पालिका क्षेत्रात ९५ कि.मी. मुख्य जलवाहिन्या,४८७ किमी वितरण जलवाहिन्या आणि १० जलकुंभ उभारले जाणार आहेत.यासाठी प्रत्यक्ष कामाला डिसें. २०२४ पासून जलवाहिन्या अंथरण्याचे काम ठेकेदारांतर्फे सुरु करण्यात आले आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितिज ठाकूर आणि माजी आ.राजेश पाटील यांनी वसई विरारचा पाणीवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश येत शासनाकडून अमृत २.o पाणीपुरवठा योजना मंजूर करून शासनाने…
प्रकाश मेहेर,सातपाटी, पालघर – शिरगांव येथे ड्रोन प्रणालीचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, सीमाभागातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील ७ जिल्ह्यांतील ९ समुद्रकिनाऱ्यांवरून एकाचवेळी ड्रोनद्वारे देखरेख विशेष प्रणालीचे आज मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मुंबई येथील मत्स्य आयुक्त कार्यालय येथे उद्घाटन झाले. त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील शिरगाव या समुद्रकिनाऱ्यावरून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ड्रोन उडवण्यास प्रारंभ केला. राज्यातील ७ जिल्ह्यांतील ९ समुद्र किनाऱ्यांवरून एकाचवेळी ड्रोनद्वारे देखरेख प्रणालीचे प्रात्यक्षिक यावेळी झाली. यासाठी मत्स्य आयुक्त कार्यालय येथे कंट्रोल रूम उभारण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी कंट्रोल रूममध्ये…
संजय परब,पालघर तलासरी येथे भव्य शेतकरी मेळावा आणि प्रशिक्षण शिबिर संपन्न, आज तलासरी पंचायत समिती सभागृह येथे जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा व पशुपालक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आला होता.जिल्हा परिषद पालघर कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती संदिप पावडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य राजेश खरपडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी समिती सदस्य विजय उराडे,जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा, पंचायत समिती सदस्य भरत कडू,जयवंती गोरखना यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले. सभापती संदीप पावडे यांनी कृषिप्रधान देशाच्या शेतकरी राजाने कोरोना सारख्या संकटामध्ये देशातील जनतेला…
सुरेश काटे,तलासरी, परुळेकर महाविद्यालयात ॲनिमियामुक्त भारत अभियान, कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे भारत विकास परिषद कोकण प्रांत तसेच माझगाव डॉक, महाविद्यालयाचे महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय रक्त चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात भारत विकास परिषद महाराष्ट्र कोकण प्रांत यांच्यातर्फे डॉ.हेमंत बेहेरे , भूषण साळुंखे,पूजा गवळे, नितीन जावीर आणि राहुल पवार अशी टीम पाठवण्यात आली होती. प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी विद्यार्थिनींना रक्ताच्या चाचणीचे महत्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. डॉक्टर हेमंत बेहेरे यांनी विद्यार्थ्यांना ॲनिमियाविषयी माहिती दिली आणि ॲनिमिया नियंत्रित करण्याचे उपाय सांगितले. सदर रक्त चाचणी शिबिरामध्ये…
जव्हार प्रतिनिधी, ” राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची, ” याविषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. युवक,ही देशाची खरी ताकद असून,त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश संपादन करून देशाचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवावा,असे प्रतिपादन जिल्हा परिषद शाळा नवीवाडीचे प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांनी केले.ते मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला,वाणिज्य व बीएमसी महाविद्यालयाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात बोलत होते. ” राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका,” या विषयावर मार्गदर्शन करताना नितीन आहेर यांनी यादवकालीन, शिवकालीन,स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील युवकांची भूमिका विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडली.त्यांनी दिलेली उदाहरणे,इतकी प्रभावी होती की प्रत्येक प्रसंग जिवंतपणे अनुभवल्याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. नितीन आहेर यांनी सांगितले की,युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून, योग्य ध्येय निश्चित करून…
वसंत भोईर,वाडा, सरपंच हत्येच्या निषेधार्थ वाड्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद, बीड जिल्हातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी त्यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेने पुकारलेल्या बंदला वाडा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांशी ग्रामपंचायतींनी कामकाज बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला. वाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्व.संतोष देशमुख यांना श्रध्दांजली वाहून कार्यालय बंद ठेवून निषेध नोंदवला.सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली.या आंदोलनात सरपंच, उपसरपंच,सदस्य कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.
दीपक मोहिते, महिला मेळावा व लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, आज एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पालघर अंतर्गत महिलांसाठी विशेष मेळावा व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वेढी हद्दीतील वीट भट्टीवर करण्यात आले.या कार्यक्रमात महिला व बालकल्याणाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या सरिता सुतार,पंचायत समिती सदस्या रेखा तरे, वेढी गावचे सरपंच नचिकेत पाटील,उपसरपंच अभिजीत पाटील,तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वीटभट्टी व गावातील सुमारे १०० महिला,बालके आणि किशोरी मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांनी केले.मुख्यसेविका सुरेखा सूरवसे यांनी…
दीपक मोहिते, हागणदारी मुक्त अधिक व स्वच्छतेची शाश्वतता टिकविण्यासाठी लोकचळवळ जिल्ह्यात कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे,नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे,त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना, कुटूंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये १ ते २० जाने. २०२५ या कालावधीत स्वच्छ माझे आंगण अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन,पालघर जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहॆ. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा – २ अंतर्गत स्वच्छतेची विविध कामे करण्यात येत आहेत. १ ते २० जाने.या कालावधीत या अभियानाची…
सुरेश काटे,तलासरी, तलासरी येथे ” रेझिंग डे, ” उपक्रम संपन्न, तलासरी पोलीस ठाणे येथे ” रेझिंग डे,”च्या निमित्ताने शेतकी शाळा तलासरी पाटीलपाडा येथील विद्यार्थ्यांसाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय मुतडक तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याना एस.एल.आर. रायफल,कार्बाइन,३ नॉट ३, टीयर गॅस गन,आदी अत्याधुनिक शस्त्रांची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणार्थ करावयाच्या उपायोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.पोलिसांच्या या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. नव्या पिढीला आपल्या संरक्षण व्यवस्थेतील महत्वाच्या साहित्य व उपकरणाची माहिती असायला हवी,असा हेतू हा उपक्रम राबवण्यामागे होता.
