सुरेश काटे,तलासरी,
तलासरी येथे ” रेझिंग डे, ” उपक्रम संपन्न,
तलासरी पोलीस ठाणे येथे ” रेझिंग डे,”च्या निमित्ताने शेतकी शाळा तलासरी पाटीलपाडा येथील विद्यार्थ्यांसाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय मुतडक तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याना एस.एल.आर. रायफल,कार्बाइन,३ नॉट ३, टीयर गॅस गन,आदी अत्याधुनिक शस्त्रांची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणार्थ करावयाच्या उपायोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.पोलिसांच्या या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. नव्या पिढीला आपल्या संरक्षण व्यवस्थेतील महत्वाच्या साहित्य व उपकरणाची माहिती असायला हवी,असा हेतू हा उपक्रम राबवण्यामागे होता.

