सुरेश काटे,तलासरी,
परुळेकर महाविद्यालयात ॲनिमियामुक्त भारत अभियान,
कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे भारत विकास परिषद कोकण प्रांत तसेच माझगाव डॉक, महाविद्यालयाचे महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय रक्त चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात भारत विकास परिषद महाराष्ट्र कोकण प्रांत यांच्यातर्फे डॉ.हेमंत बेहेरे , भूषण साळुंखे,पूजा गवळे, नितीन जावीर आणि राहुल पवार अशी टीम पाठवण्यात आली होती.
प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी विद्यार्थिनींना रक्ताच्या चाचणीचे महत्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
डॉक्टर हेमंत बेहेरे यांनी विद्यार्थ्यांना ॲनिमियाविषयी माहिती दिली आणि ॲनिमिया नियंत्रित करण्याचे उपाय सांगितले.
सदर रक्त चाचणी शिबिरामध्ये कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी, आदिवासी प्रगती मंडळ संचलित कनिष्ठ महाविद्यालय तलासर आदिवासी प्रगती मंडळ संचलित मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक च्या एकूण ६८८विद्यार्थिनींनी तसेच ३० महिला सहभागी झाल्या होत्या.
अशाप्रकारे एकूण ७१८ हुन अधिक महिलांनी आणि विद्यार्थिनींनी सदर रक्त चाचणीचा लाभ घेतला
हिमोग्लोबिन कमी आढळलेल्या विद्यार्थिनींना व महिलांना दोन महिन्यांचा औषधोपचार देण्यात आला.तसेच सहभागी सर्व विद्यार्थिनी आणि महिलांना रक्तवाढीसाठी गुळ आणि चण्याचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर ज्या विद्यार्थिनी आणि महिलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले, त्या सर्वांना दोन महिन्यांच्या उपचारानंतर पुन्हा रक्त चाचणी करण्याबाबत समुपदेशन करण्याचे आश्वासन डॉक्टरांच्या टीमतर्फे देण्यात आले.

