वसंत भोईर,वाडा,
सरपंच हत्येच्या निषेधार्थ वाड्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद,
बीड जिल्हातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी त्यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेने पुकारलेल्या बंदला वाडा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांशी ग्रामपंचायतींनी कामकाज बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला.
वाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्व.संतोष देशमुख यांना श्रध्दांजली वाहून कार्यालय बंद ठेवून निषेध नोंदवला.सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली.या आंदोलनात सरपंच, उपसरपंच,सदस्य कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.

