दीपक मोहिते,
हागणदारी मुक्त अधिक व स्वच्छतेची शाश्वतता टिकविण्यासाठी लोकचळवळ
जिल्ह्यात कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे,नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे,त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना, कुटूंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये १ ते २० जाने. २०२५ या कालावधीत स्वच्छ माझे आंगण अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन,पालघर जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहॆ.
ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा – २ अंतर्गत स्वच्छतेची विविध कामे करण्यात येत आहेत.
१ ते २० जाने.या कालावधीत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.२१ ते २४ जाने.या कालावधीत ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने वैयक्तिक स्तरावर शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांची पडताळणी करून कुटूंबांची निवड करायची आहे.ज्या कुटूंबाची निवड करावयाची आहे.त्यांच्याकडे किंवा परिसरात घरगुती खतखड्डा,परसबाग,वैयक्तिक शोषखड्डा,पाझर खड्डा, वैयक्तिक शौचालय,घरगुती कचराकुंड्या आदी सुविधा असणे आवश्यक आहे.उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना २६ जाने.२०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र,श्रीफळ, पुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.” स्वच्छ माझे अंगण,” अभियान अंमलबजावणी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सर्व पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार व सभा करण्यात आला आहॆ.गावस्तरावर स्वच्छ माझे अंगण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले.
स्वच्छ माझे आंगण अभियानाची उद्दीष्टे,:-
• वैयक्तिक शौचालयांचा नियमित वापर करणे,
• शौचालयाची दैनंदिन स्वच्छता व शाश्वत स्वरूपात कुटुंबातील सर्व सदस्यांकडून वापर करणे,
• कुटूंबस्तरावर दैनंदिन घनकचऱ्याचे वर्गीकरण करणे कुटुंबस्तरावरावर ओला व सुका कचरा कुंड्यामध्ये वर्गीकरण करणे,
• वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा निर्मिती करून कचऱ्याचे घर किंवा घराच्या परिसरातच व्यवस्थापन करणे,
• सांडपाणी व्यवस्थापन, शोषखड्डा याद्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन घर किंवा घराच्या परिसरातच करणे,
स्वच्छ भारत मिशन ( ग्रा. ) व शासनाच्या विविध योजनाच्या माधमातून ग्रामीण भागात वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या स्वच्छतेच्या सुविधांचा नियमित वापर व देखभाल करून स्वच्छतेची अंगीकृत करण्यासाठी यापुढे लोकचळवळ करण्याच्या उद्देशाने “ स्वच्छ माझे आंगण,” अभियान राबवण्यात येत आहे.जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहॆ.
भानुदास पालवे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर,

