- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
अमन शेख,मनोर अंगणवाडी सेविकांचे प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना या विषयावर विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मनोर येथे संपन्न झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) चंद्रशेखर जगताप प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास विभाग,प्रवीण भावसार यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.सदर योजना पूर्वी आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत होती,मात्र आता ती महिला…
मनिषा जोशी,पुणे कॅन्टोनमेंट, पोलिसाच्या डोक्यात दगड घालणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड, पुणे जिल्ह्यातील भेकराईनगर येथे बाईकस्वाराने रागाच्या भरात वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घालून पळ काढला होता.त्या आरोपीची पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत.सासवड रस्त्यावर ही घटना घडली होती.या घटनेत पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक ( वय ४७ ) हे गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला धाराशिव येथून जेरबंद केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी येथील कार्यक्रमात पुण्यामध्ये क्राईम रेट सतत वाढतो आहे. पोलिसांनी अशा आरोपीची धिंड काढून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.वाहतूक पोलिसांला मारहाण करुन जखमी करणार्या बबलु मासाळ ( वय २५,मुळ…
सुशीला फातरपेकर, नालासोपारा, नालासोपारा ” फनस्ट्रीट,” उपक्रमाला बालगोपाळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, वसई-विरार महानगरपालिका क्रीडा विभाग,जागरूक नागरिक संस्था ( वसई ) आणि नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ फन स्ट्रीट,” हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लहानपण परत येत नाही,मात्र त्याच्या आठवणी पुन्हा जगता येतात,याचा अनुभव आज नालासोपारा शहरातील नागरिकांनी घेतला.महानगरपालिका व अन्य संस्थाच्या सहकार्याने आज शहरात ” फनस्ट्रीट,” ला या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शहरातील बाळगोपाळ व तरुण / तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सकाळी मोठ्या उत्साहात या रनला सुरुवात झाली.या उपक्रमामुळे बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला,यामध्ये सहभागी झालेल्याना खेळ, मनोरंजन आणि…
दीपक मोहिते, भाजपचे लक्ष आता बिहार व प.बंगाल या दोन महत्वाच्या राज्यावर…. दिल्ली काबीज केल्यानंतर १५ राज्यात भाजपाकडे इकहाती सत्ता आहे.एवढेच नव्हे तर देशाची राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर एनडीएकडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता हाती आली आहे.यानंतर भाजपचे लक्ष आता बिहार व प. बंगाल या दोन राज्यावर आहॆ.देशाचा दक्षिण भाग वगळता भाजपने काही किरकोळ अपवाद वगळता उत्तर,मध्य,उत्तरपूर्व, दक्षिणोत्तर भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहॆ.आजच्या घडीला देशातील पाच मोठ्या राज्यांपैकी यूपी,महाराष्ट्र व बिहार,तीन राज्यात रालोआचे सरकार आहे.युपी आणि महाराष्ट्रात भाजपाचा स्वत:चा मुख्यमंत्री आहे.तर बिहारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूचे नितीश कुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाचे सुकाणू आहॆ. उत्तर-पूर्व भागातील सात पैकी सहा राज्यात एनडीएचा…
शुभांगी शिंदे,नाशिक, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा टपाल तिकिटास मंजुरी, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून ” अतुल्य भारत,” संकल्पनेतून २०२७ च्या वार्षिक अंक कार्यक्रमात नाशिक कुंभमेळा टपाल तिकिटास मंजुरी मिळाली आहे.त्याबद्दल छगन भुजबळ यांनी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा,हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम नाही तर त्याला सांस्कृतिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि ” अतुल्य भारत,” संकल्पनेतून जागतिक पातळीवर नाशिकचा गौरव करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्यावर स्मारक टपाल तिकिट जारी करावे,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार २०२७ च्या वार्षिक अंक कार्यक्रमात या…
संजय लांडगे,वाडा, कुडूस येथे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी, भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखा व बोधीवृक्ष छाया मंडळ,रमाई महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडुस येथील समाज हाॅल येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी,त्यागमुर्ती माता रमाई यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात पालघर जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि उपस्थित धम्म उपासक – उपासिका यांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन,तसेच सुत्तपठण घेवुन करण्यात आले. याप्रसंगी माजी श्रामणेर, बौध्दाचार्य सिध्दार्थ गायकवाड यांनी त्यागमुर्ती,माता रमाई यांचा जीवन प्रवास याविषयी मार्गदर्शन केले.तसेच मंगेश भोईर यांनी रमाई गीत गायनाच्या माध्यमातुन उपस्थितांचे प्रबोधन केले. सदर कार्यक्रमासाठी भारतीय बौध्द महासभा वाडा…
शुभम सावंत,विरार वसई – विरार मनपा क्षेत्रातील बेवारस वाहनांवर कारवाई होणार, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दूतर्फा शेकडो बेवारस वाहने धूळ खात पडून असल्याचे दिसून आले आहे.अशा बेवारस वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो व रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असते.परिणामी त्याचा त्रास वाहनांमधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो.तसेच सदर बेवारस वाहने एकाच जागी अनेक दिवसापासून पडून राहील्यामुळे त्यावर धुळ साचते व या धुळीचा नागरिकांना त्रास होत असतो. या वाहनांच्या आजुबाजुच्या परिसरात रस्ता सफाई कर्मचाऱ्यांना रस्त्याची साफसफाई करताना अडचणींचा सामना करावा लागतो.कचरा साचुन वातावरणात दुर्गंधी पसरते.या सर्व बाबींचा विचार करुन महानगरपालिकेचे आयुक्तानी या बेवारस वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला…
दीपक मोहिते, ” परिसराचा विनाश अटळ,” प्रस्तावित वाढवण बंदर परिसरात आकाराला येणार नवीन शहर : भुमाफियांसाठी पर्वणी, देशातील सर्वांत मोठे बंदर म्हणून ओळख असलेल्या ” वाढवण,” पंचक्रोशी परिसरात आणखी एक शहर वसवण्याचचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.सरकारच्या या हालचालाची कुणकुण भुमाफियाना लागल्यानंतर त्यांनी या परिसरातील जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहॆ.या गोरखधंद्यात अनेक मंत्री,आमदार व भुमाफियांचे साटेलोटे असून गेल्या काही महिन्यात शेकडो हे.जमिनीचे खरेदी-विक्री झाली आहॆ. या प्रस्तावित बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेत राज्य सरकारने १३ गावातील ३३.८८ चौ. किमी क्षेत्रामध्ये विकास केंद्र ( ग्रोथ सेंटर ) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता महाराष्ट्र…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेड सोईल हॉटेल,जव्हार येथे कार्यशाळा पार पडली.सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके,पोलीस निरीक्षक किशोर मानभाव,राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण अमित मोतीराम भोये, टीटीएसएफ पालघर जिल्हाध्यक्ष विलास बेलकर, लेखक व आदिवासी साहित्यिक चंद्रकांत घाटाळ, मास्टर ट्रेनर दिलीप राठोड आणि पेसा व्यवस्थापक मनोज कामडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतिकारक प्रतिमापूजन करून करण्यात आले. सदर कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी सायबर गुन्हेगारी,वाहतूक नियम…
बोईसर प्रतिनिधी, बोईसर – चिल्हार रस्त्यावर होणारे अपघात : आदिवासी संघटनेचा रास्ता रोको, बोईसर – चिल्हार मार्गांवर सतत होणारे अपघात व त्या अपघातामध्ये बळी पडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन जनसामर्थ्य आदिवासी संघटनेचे महेश धोडी यांनी काल खैरेपाडा रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हे आंदोलन करण्यात आले. तारापूर – बोईसर एमआयडीसीमध्ये होणारे सर्वसामान्यांचे अपघात या अशा ज्वलंत समस्येकडे लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,मंत्री,अविनाश संखे,उप कार्यकारी अभियंता, बोईसर,एमआयडीसी प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आल्याचे सांगण्यात आले.नवीन उपअभियंता कामावर रुजू झाल्यापासून एमआयडीसीमध्ये बरेचसे अवैद्य धंदे स्थानिक माफियांकडून राजरोसपणे सुरू असून जनतेकडून करण्यात येत असलेल्या तक्रारींना स्थानिक एमआयडीसी कार्यालयाकडून केराची…
