दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मुद्दा योग्य असला तरी ” औलादी,” या शब्दाचे समर्थन होऊ शकत नाही…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे अद्याप पडसाद उमटत आहे.त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र जोरदार टीका झाली.मनसे नेते राज ठाकरे यांनीही तीव्र संताप व्यक्त करत भय्याजी जोशी यांना याविषयी खडे बोल सुनावले.त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर ऍड.सदावर्ते गुणरत्ने यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.ते
एवढ्यावरच थांबले नाहीत,तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली.
टीका करताना ते म्हणाले,राज ठाकरे ज्याप्रकारे व्यक्त झाले, मला खरोखर त्यांची कीव येते.राज ठाकरे,मला सांगा तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या ? स्वतःची लेकरे कॉन्व्हेंट व आयबीपीडीमध्ये शिकवणारी माणसे, दुसऱ्याला सांगतात,ही भाषा शिका,ती भाषा शिका,अशा भाषेत त्यांनी घणाघाती हल्ला चढवला.सदावर्ते यांनी उपस्थित केलेल्या मुद्दा योग्य असला तरी त्यांनी जी भाषा वापरली.त्यावरून आता गदारोळ उठला आहे.मनसेचे प्रवीण महाजन यांनी अँट्रोसिटी कायद्याचे संरक्षण असल्यामुळे कसही वागणे चुकीचे आहे,असे मत व्यक्त केले आहे.सदावर्ते आजवर अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरले आहेत.प्रतिक्रिया देण्यासाठी चॅनेलसमोर आले की त्यांचा संयम सुटत जातो व पुढे अनर्थ घडतो.” नेत्यांची मुले कॉन्व्हेंट व इतर भाषिक शाळेत शिकतात,त्यांनी इतरांना मराठी भाषेचे ज्ञान व आवश्यकता हे सांगू नये.सदावर्ते यांचा हा मुद्दा योग्य असला तरी त्यांनी केलेला ” औलादी,” या शब्दाचे कदापि समर्थन होऊ शकत नाही.

