अमित जोशी, विरार,
नरेडको महाराष्ट्र होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ सुरू,
बहुप्रतिक्षित वसई-विरार होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ च्या भव्य शुभारंभासह नरेडको महाराष्ट्रने वसई-विरार परिसराच्या रिअल इस्टेट क्षेत्राला एका नवीन उंचीवर नेले आहे.७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान वाईएमसीए ग्राउंड, माणिकपूर, वसई पश्चिम येथे होणारा हा तीन दिवसीय भव्य कार्यक्रम घरखरेदीदार,गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून घेत आहे.या एक्स्पोमुळे वसई-विरार क्षेत्राच्या वाढत्या महत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या एक्स्पोमध्ये ४० नामांकित विकासक,व्यवसायिक युनिट्स आणि २,५०० पेक्षा जास्त औद्योगिक युनिट्स यांचा सहभाग असून, हा वसई-विरारमधील सर्वात मोठा आणि व्यापक रिअल इस्टेट शोकेस आहे. परवडणाऱ्या घरे ते आलिशान निवासस्थानांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे, हा कार्यक्रम इच्छुक घरखरेदीदार आणि अनुभवी गुंतवणूकदार यांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देतो.
याशिवाय,या एक्स्पोमध्ये १५ हून अधिक तज्ज्ञ व्याख्याते, १० रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित विषय आणि ५हून अधिक चर्चासत्रे होणार आहेत. बाजारातील ट्रेंड्स,❤️ पुनर्विकासाच्या संधी आणि घर खरेदीबाबत धोरणात्मक निर्णय कसे घ्यावेत यासंदर्भात उपस्थितांना मौल्यवान माहिती मिळणार आहे.
नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी या एक्स्पोचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, ” वसई-विरार हे मुंबई महानगर प्रदेशातील एक वेगाने विकसित होणारे केंद्र म्हणून उदयास येत आहे.येथे घरखरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी अपार संधी उपलब्ध आहेत. एक्स्पोच्या माध्यमातून निवासी व व्यावसायिक मालमत्तांचे भरगच्च पर्याय एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वास वाढवणे हे आमचे ध्येय असून, हा एक्स्पो त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
इम्पिरियल लाइफस्टाइल प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक रमेश मुकुंद यांनी या एक्स्पोचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, ” वसई-विरार होमथॉन २०२५ हे घर खरेदीदार आणि व्यवसायिकांसाठी एक अभूतपूर्व संधी आहे.मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये नव्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.या एक्स्पोमुळे उद्योग आणि समुदायाच्या विकासावर सखोल चर्चा होणार असून, संपूर्ण क्षेत्राच्या प्रगतीस चालना मिळणार आहे.”
या एक्स्पोबद्दलची उत्सुकता विकेंडच्या काळात शिगेला पोहोचेल,अशी अपेक्षा आहे. हजारो उपस्थित ग्राहकांना विशेष खरेदी प्रोत्साहन योजना मिळणार आहेत,जसे की निवडक बुकिंगवर पेड इंटरनॅशनल ट्रिप किंवा क्लब महिंद्र व्हाउचर्स जिंकण्याची संधी त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
ऑनलाइन उपलब्ध अहवालांनुसार,पुढील पाच वर्षांत वसई-विरारमधील मालमत्ता दर २५-३०% वाढण्याची शक्यता आहे. वाढती मागणी आणि पायाभूत सुविधांचा विकास यामुळे येत्या काळात गुंतवणूकदारांसाठी हा परिसर अधिक फायदेशीर ठरणार आहे.
वसई-विरार हे एक महत्त्वाचे रिअल इस्टेट हॉटस्पॉट बनत असताना, होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ या क्षेत्राच्या विकासात ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.पहिल्याच दिवशी झालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर येत्या विकेंडला आणखी मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.ज्यामुळे हा एक्स्पो वसई-विरारमधील सर्वात प्रतिष्ठित रिअल इस्टेट कार्यक्रम म्हणून नोंदवला जाणार आहे.

