सचिन परब,विरार
वसई विरार शहर मनपाचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर,
वसई विरार शहर महानगरपालिकेचा सन २०२४-२५ च्या सुधारित अर्थसंकल्पासह सन २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे मा. आयुक्त यांच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आला.
सन २०२४-२५ चा सुधारीत अर्थसंकल्प रु.३ हजार ५३८ कोटी व सन २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प रु.३ हजार ९२६ कोटींचा ( रु. २.४० कोटी शिलकेसह ) आहे. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये पाणीपुरवठा योजना व मलःनिस्सारण योजना यासाठी भरीव तरतुदी केल्या आहेत.
सदर अंदाजपत्रक सादर करतेवेळी महानगरपालिकेचे अन्य विभागांचे विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

