- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, नवनिर्वाचित निवडणूक आयुक्तांकडून मतदारांना फार मोठ्या अपेक्षा, भारताचे २६ वे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी नव्याने नियुक्त झालेले हे १९८८ च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत.राज्य व केंद्रीय स्तरावर त्यांनी अनेक पदावर काम केले असून केंद्रीय गृहमंत्रालयात काम करताना त्यांनी अनेक महत्वाच्या विषयी त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली होती.३७० कलम रद्द केल्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये ज्ञानेश कुमार यांचे फार मोठे योगदान होते.त्यांची प्रशासकीय वाटचाल लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांची राममंदिर ट्रस्टच्या सदस्यपदी निवड केली होती.असे हे ज्ञानेशकुमार,यांनी तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्याकडून नुकतीच सूत्रे हाती घेतली. आपल्या देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग हा गेल्या दहा वर्षात एक…
जव्हार प्रतीनिधी जव्हार नांदगाव येथे शिवजयंती निमित्त अनोखा उपक्रम, आज मौजे नांदगाव- जव्हार,येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त आदिवासी उत्सव समिती, ग्रामस्थ आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) संयुक्त विद्यमाने एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला पंचायत समिती, जव्हारचे रोहयो अधिकारी राहुल भोये,ग्रामपंचायत सरपंच रमेश कोरडे,पोलीस पाटील सुनंदा गवारी,रोजगार सेवक सुदाम मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ आणि रोजगार हमी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक भास्कर गवारी,हणुमंत देहाडे, गणेश गवारी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमातून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे…
जव्हार प्रतिनिधी, आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहात शिवजयंती उत्साहात साजरी. आज आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, नवीन जव्हार येथे शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विविध सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात रांगोळी स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,गीतगायन स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेने झाली. विद्यार्थीनींनी या सर्व स्पर्धांमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतला आणि सुंदर रांगोळ्या काढून,चित्रांद्वारे शिवचरित्राचे दर्शन घडवले.शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख वक्त्यांमध्ये शिवश्री कृष्णा मुरमे,मनोज कामडी आणि प्रतिभा मुरमे यांनी विद्यार्थिनींना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन,विचार आणि शौर्य यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राणी दिनेश गावीत हीने उत्कृष्ट पद्धतीने केले.कु. नेहाली विजय राऊत हिने माँसाहेब…
शुभम सावंत विरार, विरारमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी, राजा छत्रपती शिवाजी चौक विरार पश्चिम येथे सकाळी ८. ०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरू झालेल्या या शिवजयंती उत्सवामध्ये शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोवाडे शिवगर्जना आदींनी येथील वातावरण शिवमय झाले होते.शिवरायांचा लढा हा मानवतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी होता.राज्यातील शेतकरी,महिला व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर चरित्र हे आपल्या सर्वांसाठी महान आदर्श आहे,असे प्रतिपादन यावेळी महापौर राजीव पाटील यांनी केले.या समारंभाला माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती अजीव पाटील व माजी नगरसेवक विलासबंधू चोरघे,माजी नगरसेवक हार्दिक राऊत,माजी…
सुरेश काटे, तलासरी तलासरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तलासरीत मोठ्या उत्सहात शिवप्रेमी नागरिकांतर्फे साजरी करण्यात आली. आज सकाळी ११. ०० वाजता श्रीराम मंदिरापासून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.यावेळी तलासरी तहसीलदार अमोल पाठक,माजी आ.श्रीनिवास वनगा,पोलीस निरीक्षक विजय मूतदक,नगराधक्ष सुरेश भोये, तलासरी नगरपंचायतचे नगर सेवक,विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक,उपस्थित होते,यात बाल शिवाजीची वेषभुषा केलेली बालके तसेच शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला आश्वारुढ कलाकार,हे मिरवणूकीचे विशेष आकर्षण होते, मिरवणूकीची सुरुवात श्रीराम मंदिर पासून सुरु होऊन बाजार पेठेतून तलासरी नाका, सुतारपाडा येथून तलासरी नाका उड्डाणपुलाखाली तीची सांगता झाली.
वसंत भोईर,वाडा समर्थनचे अध्यक्ष डॉ.अशोक येंडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थ मंडळावर नियुक्ती, अर्थसंकल्पावर काम करणाऱ्या समर्थन संस्थेचे अध्यक्ष अँड. ( डॉ. ) अशोक येंडे यांची,सर्वोच्च न्यायालयाच्या विधी व सेवा समितीच्या अधीन असलेल्या मध्यस्थी केंद्राच्या पॅनलवर मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विधी व सेवा समितीचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ न्यायमूर्तीद्वारे त्यांची नियुक्ती झाली आहे.एका संवेदनशील आणि वंचित घटकांच्या वेदनांची जाणीव असणाऱ्या व्यक्तीची ही नियुक्ती असून न्यायप्रक्रियेत अन्यायग्रस्त दुर्बल घटकाचे योग्य प्रतिनिधित्व डॉ.अशोक येंडे करतील,असे गौरोद्वागार समर्थन आणि श्रमजीवी संघटना संस्थापक तथा राज्य स्तरीय आढावा समिती अध्यक्ष ( मंत्री दर्जा ) विवेक पंडित यांनी काढले, व डॉ.अशोक येंडे यांचे…
दीपक मोहिते, स्वयंतक पाटील याने अर्नाळा ते वसई अंतर पोहून करून केले पार, महाराष्ट्र साहसी क्रीडा प्रकारातील खाडी पोहणे,या क्रीडा प्रकाराचा महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात समावेश केलेला आहे.या क्रीडा प्रकारांतर्गत शिवछत्रपतींच्या जयंतीचे पवित्र औचित्य साधून,उमेळमानचा कुमार स्वयंतक पंकज पाटील याने आज अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला हे सुमारे २२ कि.मी. अंतर पोहून पार केले आहे. ” महाराष्ट्र स्टेट ॲमेचर एक्वेटिक असोसिएशन,” च्या देखरेखीखाली हा साहसी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जलतरणाची सुरुवात पहाटे ७.००वाजता अर्नाळा किल्ला येथून झाली,तर शेवट दुपारी १ वाजून. २५ मिनिटांनी वसई किल्ला येथे झाला. त्याने हे अंतर अवघ्या ६ तास २१ मिनिटांमध्ये पार केले.यावेळी…
अनंत भोईर,पालघर पालघर येथे भव्य ” जय शिवाजी जय भारत,” पदयात्रेतून शिवजयंती उत्साहात साजरी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये भव्य ” जय शिवाजी जय भारत पदयात्रा,” काढण्यात आली.ही पदयात्रा तहसील कार्यालय,पालघर येथून जिल्हाधिकारी कार्यालय,पालघरपर्यंत निघालेल्या या भव्य पदयात्रेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,तहसीलदार सचिन भालेराव,शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) संगीता भागवत तसेच अधिकारी,कर्मचारी, सामाजिक संस्था,शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. या पदयात्रेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा…
सुरेश वैद्य सफाळे, जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी, आज जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवाजी शहाजी भोसले ( १९ फेब्रुवारी, १६३० – ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध,हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.इ.स.१६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरी केला जातो. अशा…
शुभम सावंत,विरार महानगरपालिकातर्फे आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग, ” जय शिवाजी जय भारत, ” च्या जयघोषाने संपूर्ण वसई शहरात आज जल्लोषाचे वातावरण होते.निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीचे… वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी वसईतील हुतात्मा बाळा सावंत स्मारक ते नरवीर चिमाजी आप्पा स्मारक,वसई किल्ला या मार्गावर ” जय शिवाजी जय भारत,” या सुमारे साडेपाच कि.मी.पदयात्रेचे आयोजन केले होते.या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक,पदाधिकारी, विद्यार्थी,अधिकारी कर्मचारी,पोलिस विभाग व विविध कला सादर करणारे पथके सहभागी झाली होती. वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित व आयुक्त अनिलकुमार पवार यांचे शुभहस्ते हुतात्मा…
