वसंत भोईर,वाडा
वाडा तालुक्यातील जाळे गावात फुलला सूर्यफुलांचा मळा,
शेतीची आवड, दांडगी इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर वाडा तालुक्यातील जाळे या खेडेगावातील तरुण शेतकऱ्याने यावर्षी आपल्या शेतीत किलबिया देणाऱ्या सूर्यफुलाचे उत्तम पीक घेतले आहे.
शेतीची आवड असलेल्या जाळे येथील प्रदीप गोरे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला.नंतर सुशिक्षित बेरोजगार म्हणून कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय ही सुरू केला.अपार मेहनतीने त्यांचे हे दोन्ही व्यवसाय सध्या उत्तम प्रकारे सुरू असून,या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी कुडूस बाजारपेठेत आता दूध डेअरी सुरू केली.
खरीप हंगामात भातशेती व रब्बी हंगामात हरभरा,वाल, तूर,मुग,अशा विविध धान्याचे पीक घेणाऱ्या प्रदीप गोरे यांनी यावर्षी रब्बी हंगामात तेलबिया देणाऱ्या सूर्यफुलाचे उत्तम पीक घेतले आहे.सध्या नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी शेतीकडे अधिक लक्ष देऊन नवनवीन नगदी उत्पादन देणारी पिके घेतली तर नोकरी करून मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक पैसे मिळू शकतात, असे प्रदीप गोरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

