Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” मागच्या दाराने आणीबाणीची चाहूल,” येणार काळ,माध्यमाच्या अस्तित्वाच्या लढाईचा….. गेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४, मांडण्यात आले होते.पण विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधामुळे ते मंजूर होऊ शकले नाही. सध्या हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असलेल्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले आहे.या विधेयकातील तरतुदी बद्दल बोलताना सरकारने विधिमंडळात स्पष्ट केले कि व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित वेकायदेशीर कृत्याचा प्रभावीपणे करण्यासाठी आणि तत्सबंधित किंवा अनुषंगिक बाबीसाठी तरतूद करण्यासाठी हे विधेयक आणण्यात येत असल्याचे सांगितले.या विधेयकमध्ये बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या संघटनाविरोधात कारवाई करण्याची तरतूद देखील आहे.हे विधेयक अत्यंत धोकादायक असे असुन सरकार कोणत्याही गोष्टीसाठी गुन्हा दाखल करू शकते. यामध्ये लोकशाही…

Read More

दिपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” राष्ट्रीय संकटप्रसंगी भारत सरकार व विरोधी पक्षांची एकजूट, पाकिस्तान,गेल्या सात दशकापासून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करत आला आहे.दहशतवाद्याना पैसा व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देऊन तो दहशतवादाला सतत खतपाणी घालत आला. काश्मीरच्या प्रश्नावरून दोन्ही देशात आजवर चार युद्धे झाली.या सर्व युद्धात आपल्या देशाने पाकिस्तानला चारीमुंड्या चित केले.पण पाकिस्तानची खुमखूमी काही कमी झाली नाही.अधूनमधून कुरापती काढण्याचे त्याचे काम सुरूच आहे.उरी व पुलवामा घटनानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना चांगलाच दणका दिला होता. पण त्यातून शहाणे न होता, त्यांनी दहशतवाद्याना रसद पुरवणे सुरूच ठेवले आहे. तीन दिवसापूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतर भारताने…

Read More

नदीम शेख,पालघर २६ एप्रिल रोजी पालघर येथे माध्यमिक शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ( टीडीएफ ) यांचे राज्यस्तरीय अधिवेशन २६ एप्रिल रोजी पालघर शहरातील स.तू.कदम विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के. थोरात तर स्वागताध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष नरसू पाटील आहेत.या अधिवेशनाचे आयोजक म्हणून पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जबाबदारी पार पाडणार आहे. शिक्षकांच्या अडीअडचणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांची भूमिका या अधिवेशनातून मांडण्यात येणार आहे.यावेळी साधारण चार ते पाच हजार शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहेत.अशी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री शिंदे यांची पहलगाम भेट ; महायुती सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर, जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यावरून महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती निवारण व पुनर्वसनमंत्री गिरीश महाजन यांना पाठवल्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये दाखल झाल्यामुळे खा.संजय राऊत यांनी सरकारला चांगलेच घेरले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.त्यामुळे सरकारवर खुलासा करण्याची पाळी आली आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद हुकल्यामुळे नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधून मधून आपली नाराजी वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्याना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसतात.शिंदे…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे राष्ट्रीय पंचायतराज दिन उत्साहात साजरा, लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा सन्मान आणि ग्रामविकासाची नवी दिशा देणारा २४ एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिन पंचायत समिती, जव्हार येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात ग्रामपातळीवरील लोकसहभाग,योजनांची अंमलबजावणी आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश देण्यात आला. सदर कार्यक्रमास पंचायत समिती जव्हार प्रशासक तथा गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते,सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,कृषी अधिकारी प्रशांत पाटील, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत मनोहर उमतोल व सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी,महिला अधिकारी, कर्मचारी आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय पंचायतीराज दिनाच्या प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) टप्पा-२…

Read More

नालासोपारा येथे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि श्रद्धांजली, काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.याप्रसंगी शेकडो नागरिकांनी भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी लोकसभा संघटक पंकज देशमुख,जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर,उप जिल्हा संघटक भारती गावडे, विधानसभा संघटक राज सिंग, प्रणब खामकर,शहर शहर संघटक पवित्रा चंदा,युवा सेनेचे रोहन चव्हाण,प्रतीक जाधव,ऍड.रोहन पाठारे अनेक शाखाप्रमुख,विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.या निदर्शनात पाकिस्तानच्या विरोधात निदर्शकांनी जोरदार घोषणा दिल्या व दहशतवाद्याना योग्य धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली.

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात महाविकास आघाडीतर्फे संतप्त निदर्शने, पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यानी हल्ला करून ठार मारले.या घटनेचे देशभरात त्याचे पडसाद उमटले. या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांनी आपला जीव गमवला असून या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे वाडा शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी निदर्शकांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली. या निषेध आंदोलनात काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील,तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे,तालुकाप्रमुख निलेश पाटील,वाडा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष गितांजली कोळेकर,भरत गायकवाड,जनार्दन भेरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी…

Read More

सुरेश वैद्य,पालघर मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न, आगामी मान्सून काळात संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू असून आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे करण्यात आले यावेळी पालकमंत्री नाईक बोलत होते. या बैठकीस खा.डॉ.हेमंत सावरा,आ.स्नेहा दुबे,आ.राजन नाईक,आ.हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, खत्री,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका, आरोग्य, जलसंपदा,सार्वजनिक बांधकाम,महावितरण तसेच रेल्वे,पोलीस व इतर संबंधित यंत्रणांचे…

Read More

दीपक मोहिते, ग्राउंड रिपोर्ट, पहलगाम दहशतवादी हल्ला ; जगभरात निषेधाचा सूर, काश्मीरच्या पहलगाम या निसर्गरम्य परिसरात दहशतवाद्यानी अंधाधुंद गोळीबार करत सुमारे २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यातील चार तरुण हे ” द रेसिस्टंन्ट्स फ्रंट ( टीआरएफ ) या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी आहेत.काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दशकापासून पाक पुरस्कृत हा दहशतवाद असुन त्यामध्ये ५ प्रमुख कट्टरतावादी संघटना सहभागी आहेत. १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद्यांची घुसखोरी आणि कट्टरतावाद याला खतपाणी घालण्यास सुरुवात केली.सर्वप्रथम या दहशतवाद्यानी काश्मीरमधून हुसकावून लावण्याचे तंत्र अवलंबले. त्यानंतर काश्मिरी पंडितांचं पलायन सुरू झाले.काश्मिरामधील कट्टरतावाद्यांनी पुढची अनेक वर्षं भारत सरकारविरुद्ध आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सशस्त्र कारवाया सुरू ठेवल्या. बॉम्बहल्ले,अपहरण,…

Read More

प्रतिनिधी जव्हार, जव्हार येथे ” जागतिक पुस्तक दिन,” मोठ्या उत्साहात साजरा, आज जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा काळीधोंड येथे ” वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कार रुजावेत व ज्ञानात भर पडावी,असा उद्देश बाळगून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध वाचनप्रेरक उपक्रम राबवण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक भाऊसाहेब शेटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यांनी गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्याकडून प्रेरणा घेत कार्यक्रम राबवला. यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर,गोष्टी वाचन,कथाकथन, विज्ञानविषयक अशा विविध स्वरूपाचे वाचन प्रकार करून घेण्यात आले.तसेच,जागतिक स्तरावर विविध प्रांतांची भाषिक समज विकसित व्हावी याकरिता हिंदी,इंग्रजी,…

Read More