वाडा, प्रतिनिधी,
वाडा येथे रॅलीचे आयोजन,
वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाडा उपविभाग येथे विद्युत सुरक्षा व वीज बचत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत प्रवीण सुटे कार्यकारी अभियंता वसई यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कटकवार यांनी रॅलीचे उद्घाटन केले. उपविभागातील शाखाधिकारी वाडा शहरचे नागेश कांबळे, वाडा ग्रामीणचे राहुल शिंदे, खानवली शाखेचे तसंव्वर मंसूरी व वाडा उप विभागाचे गुण नियंत्रक प्रयास मांडवे व शाखा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आज सकाळी वाडा उपविभाग ते परळी नाकामार्गे तहसील कार्यालय ते खंडेश्वरी नाका अशी रॅली काढली.

