दीपक मोहिते,
” सत्तेचे राजकारण,”
बिहार विधानसभा निवडणुक ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे सुरू झाले, यावेळी सत्तापालट होण्याची शक्यता,
येत्या नोव्हें.महिन्यात बिहार व मे २०२६ मध्ये आसाम,केरळ,तामिळनाडू व प.बंगाल या चार राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.बिहार राज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून गेल्या महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहार राज्याचे दौरे सुरू झाले आहेत.या राज्यात भाजप व नितीशकुमार यांच्या पक्षाचे संयुक्त सरकार आहे.आसाममध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे.केरळ,तामिळनाडू व प.बंगालमध्ये अनुक्रमे मार्क्स.कम्यु.द्रमुक व तृणमूल काँग्रेस,हे तिन्ही पक्ष गेली अनेक वर्षे सत्तेत आहेत.भाजपने गेल्या काही वर्षांपासून दक्षिणेत आपले पाय रोवण्याचे प्रयत्न केले.पण कर्नाटक वगळता त्यांना इतर राज्यात जनतेचा फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही.बिहार राज्यातही त्यांना मतदारांचा कौल मिळाला नाही,पण त्यानी नीतिशकुमार यांना गळाला लावले व सत्तेत भागीदारी मिळवली.उत्तर प्रदेश व बिहार,या दोन राज्याच्या सत्तेत असणे म्हणजे केंद्रातील सरकार मजबूत असणे,होय.त्यामुळे या दोन्ही राज्यावर भाजपचे विशेष लक्ष असते.पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील अशीच रणनिती आखत असे.
गेल्या १५ वर्षापूर्वी बिहारचे सर्वेसर्वा,अशी ओळख असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यात नितीशकुमार यशस्वी ठरले व लालूप्रसाद यादव हे बिहारच्या राजकारणातील वादळ कायमचे थंडावले.आज त्यांचा मुलगा तेजस्वी यादव,त्यांचा वारसा पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे.संयुक्त पुरोगामी आघाडीच्या माध्यमातून नितीशकुमार यांना रोखण्याचे त्याचे प्रयत्न सुरू आहेत.गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री नितीशकुमार यांची अनेक प्रकरणात प्रतिमा डागाळली असून येणाऱ्या निवडणुकीत नितीशकुमार यांना धोका होऊ शकतो.मध्यंतरी नितीशकुमार व भाजपमधील संबंध ताणले गेले होते.नितीशकुमार अधून मधून भाजपविरोधात बेताल वक्तव्ये करू लागल्यामुळे मोदी व शहा हे दोघेही सावध झाले व त्यांनी बिहारच्या दौऱ्यात वाढ केली. नितीशकुमार यांची धरसोड वृत्ती पाहून हे दोघे जमलच तर नितीशकुमार यांना साईडट्रॅक करून एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करतील,अशी चर्चा बिहार राज्यात सर्वत्र होऊ लागली आहे.पण बिहारचे मतदार हे समाजवादी विचारसरणीकडून हिंदुत्वाकडे वळतील,अशी शक्यता फार कमी आहे.उलट भाजपशी साथसंगत केल्यामुळे या निवडणुकीत नितीशकुमार यांना दगाफटका होण्याची शक्यता अधिक आहे.या राज्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केल्यास आपली
डाळ शिजणार नाही,हे माहीत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी यादवना बळ देण्यास सुरुवात केली आहे.या सर्व राजकीय हालचाली लक्षात घेऊन नरेंद्र मोदी व अमित शहा या दोघांनी नितीशकुमार यांच्या
मदतीने प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याचे ठरवले आहे.
दरम्यान,केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात वाढती महागाई,बेरोजगारी,
शेतमालाला किमान आधारभूत भाव न देणे,अल्पसंख्यांक समाजाच्या अनुदानात कपात करणे,वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी विधेयक मंजूर करणे,अल्पसंख्यांक समुदायाच्या घरावर व
प्रार्थनस्थळांवर बुलडोझर चालवणे,जीएसटीमध्ये भरमसाठ वाढ करून सर्वसामान्य लोकांचे जगणं मुश्किल करणे व सार्वजनिक उपक्रम धनंदांडग्यांच्या घशात
घालणे,असे चुकिचे निर्णय घेतल्यामुळे बिहारी लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक आश्वासने
दिली,मात्र त्यांची सारी वक्तव्ये व आश्वासने प्रत्यक्षात उतरली नाहीत.त्यांची वक्तव्ये व आश्वासनावर एक नजर टाकल्यास ती सारी वक्तव्ये व आश्वासने ” खोटे बोल,पण रेटून बोल,” अशा पठडीतील होती,हे आपल्या लक्षात येते.
चला,पाहूया ती आश्वासने व वक्तव्ये काय होती ती..
● मुझे माँ गंगाने बुलाया है,
● मेरा बिहारसे बचपनका नाता है,
● मै देशका चौकीदार हुं,
● खातेमे पंधरा लाख जमा होंगे,
● विपक्ष मुझसे जलते है,इसलीये मुझसे सवाल पूछते है,
● मै गरीब हुं,चाय बेचता था,
● ७० सालसे कॉग्रेसने कुछ नही किया,
● मुझे पाच साल दो,मै बिहारको बदल दुगा,
● बिहारका बेटा आपके साथ है,
● मुझे कुर्सीका मोह नही है,
● २०२५ साल,बिहारको बदलनेका साल है,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहार विधानसभा निवडणुकीची ही स्क्रिप्ट आहे.

