- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
सुनीता जोशी, मुंबई, उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला न्यायालयाने परवानगी नाकारली, उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.त्यामुळे बंद झाल्यास कारवाई करण्याच्या नोटीसा पोलिसानी विरोधकांना बजावल्या आहेत. बदलापूर बलात्कार प्रकरणी सरकार,संबधित शाळा व्यवस्थापन व पोलीस यांच्या बेजबाबदारपणा विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून उद्धव ठाकरे यांनी विकृती विरुद्ध संस्कृती अशी ही लढाई असून या बंदमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.दरम्यान महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारल्यानंतर आज ऍड.गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर झालेल्या सूनावणीमध्ये न्यायालयाने बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी,असे आदेश दिले आहेत.राजकीय…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटील यांची दबक्या पावलाने महायुतीला धक्का देण्याची रणनिती, आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा व ओबीसी समाजाच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत.ओबीसी नेत्यानी या निवडणुका लढवणार कि नाही,याविषयी अद्याप तोंड उघडलेले नाही.तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी मात्र मराठा समाजाच्या तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली आहे.त्यांच्या उमेदवारांना या निवडणुकीत फारसे यश मिळणार नसले तरी त्यांचे उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवाला कारणीभुत ठरू शकतात.उत्तर प्रदेशचे नेते दिवंगत कांशीराम यांचे निवडणुकीचे एक सूत्र होते.” पहिल्यांदा हरायचे,दुसऱ्यावेळी हरवायचे व तिसऱ्यावेळी जिंकायचे,” जरांगे यांनीही सध्या हेच सूत्र स्विकारले आहे.पण त्यांना जिंकायचे नाही,त्यांना सत्ताधाऱ्याना केवळ पाडण्यात रस आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळीच शहाणे व्हावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी खोटे बोलण्याची जणू स्पर्धाच सुरू केल्याचे पाहायला मिळतंय.बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर महायुतीचे हे दोन नेते पार बावचळून गेले आहेत.आपण काय बोलतो आहोत,याचे जराही भान न ठेवत ते धडधडीत खोटं बोलू लागले आहेत.विरोधकांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हचा आधार घेत मतदारांची दिशाभूल केली,त्यामुळे आमचा पराभव झाल्याचे ते निकालानंतर ओरडून सांगत होते.वास्तविक २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी याच फेक नरेटिव्हचा बेमालूम वापर करत सत्ता मिळवली होती.ते हत्यार आता बुमरँगसारखे त्यांच्यावर उलटले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसल्यानंतर त्यांच्या वागण्यात सुधारणा होईल,अशी…
दीपक मोहिते, सूर्यातीर रणसंग्राम, पालघर जिल्हा ; पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय गंभीर, एकेकाळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेला हा परिसर कालांतराने पालघर लोकसभा ( अनु.ज. ) म्हणून नावारूपाला आला.या मतदारसंघात वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता पालघर,डहाणू,मोखाडा, बोईसर व विक्रमगड हे पाचही मतदारसंघ अनु.जमातीसाठी आरक्षित आहेत.वसई,नालासोपारा,पालघर,बोईसर व डहाणू हे पाच तालुके रेल्वे व रस्त्यांनी जोडले गेल्यामुळे गेल्या वीस वर्षांत या परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला.नागरीकरणाच्या प्रचंड वेगामुळे नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणांचा अक्षरशः बोजवारा उडाला.पाणी,आरोग्य,शिक्षण,पर्यावरण,प्रदूषण,वैद्यकीय सेवा,रस्ते,वीज व अन्य समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केले.तर दुसरीकडे डोंगरी विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोखाडा व विक्रमगड या तालुक्यातील नागरिकांना अश्मयुगातील जीवन जगावे…
दीपक मोहिते, सूर्यातीर,विधानसभा रणसंग्राम-२०२४, १) १२८-डहाणू विधानसभा मतदारसंघ -अनु.ज. डहाणू विधानसभा ; भाजप – मार्क्स.कम्यु.अशीच लढत होणार, १२८-डहाणू विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे.महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेला हा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे.पूर्वी हा मतदारसंघ तलासरी विधानसभा म्हणून ओळखला जायचा,२००९ साली झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये तलासरीचा परिसर डहाणू मतदारसंघाला जोडून नवीन डहाणू विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.पूर्वीच्या तलासरी विधानसभा मतदारसंघावर मार्क्स.कम्यु.पक्षाचे कायम वर्चस्व राहिले.त्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने ९० च्या दशकात मार्क्स.कम्यु.पक्षाशी जोरदार संघर्ष केला.भाजपचे नेते कै. गोपीनाथ मुंडे यांचे या मतदारसंघावर कायम लक्ष असायचे.मार्क्स.कम्यु.व भाजपच्या कार्यकर्त्यात अनेकदा तुफान हाणामाऱ्या झाल्या.पण अनेक वर्षे भाजपची डाळ शिजू शकली नाही.२०१४ साली मात्र भाजपने या…
दीपक मोहिते, उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर जोरदार हल्ला, मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ” महाराष्ट्र बंद ,” च्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद बोलावली होती.या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.यावेळी त्यानी मुख्यमंत्री शिंदे हे विकृत मानसिकतेचे असल्याचा आरोप केला. बदलापूर येथे शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले,या दुर्देवी घटनेमुळे लोकांमध्ये संताप असून यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.तर पोलीस व शाळेचे संस्थाचालक यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे.तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला.त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बदलापूरकरानी रस्त्यावर उतरून…
संजय निपाणे,जळगाव, ….तर महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबू शकते, पाणीटंचाई व दुष्काळ ही दोन्ही संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत.दरवर्षी ग्रामीण भागातील जनता या दोन्ही संकटाचा कायम मुकाबला करत आली आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिला व लहान मुले पाहिली की हृदय पिळवटून निघते. ग्रामीण भागात असे चित्र कायम पहावयास मिळते,ते आजवर बदलण्याचे प्रयत्न झाले खरे,परंतु या प्रयत्नामध्ये प्रामाणिकपणा नव्हता.त्यामुळे आजही ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.ग्रामीण भागातील पाणीटंचाई संपुष्टात यावी,यासाठी अनेक योजना आल्या.हजारो कोटी रु.खर्च झाले.परंतु परिस्थिती ” जैसे थे,” च राहिली,ती आपण बदलू शकलो नाही.आजही ग्रामीण भागात डोंगरमाथ्यावरुन दररोज कोसळणारे अब्जावधी द.ल.लि.पाणी वाया जात असते,ते पाणी अडवण्यासंदर्भात सरकारने पावले उचलली…
अनंत साटम, कोकणातील ३०० गांवे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल,यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिध्द केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका- ४४,खेड – ८५, लांजा-५०,राजापूर- ५१ व संगमेश्वर तालुक्यातील ८१ अशी एकूण पाच तालुक्यातील ३११ गावे पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.या अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी जीवनावर परिणाम होणार आहे,अशा ग्रामस्थांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड,नवी दिल्ली यांच्याकडे आपला अभिप्राय नोंदवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर चे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पोलिसांनी निदान आता तरी वामन म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अखेर बदलापूरच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर पोलिसांनी अँट्रोसिटी व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस टाळाटाळ करत होते.मात्र या प्रकरणी सदर महिला पत्रकाराने असभ्यपणे वागणाऱ्या वामन म्हात्रे याना धडा शिकवण्याचे ठरवल्यामुळे पोलीस पुन्हा अडचणीत आले होते. अखेर त्यानी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४,७९ व अनु.जाती व अनु.जमाती ( अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३ ( १ ) ( ब ) ( २ ) व कलम ३ ( २ )…
