अनंत साटम,
कोकणातील ३०० गांवे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित,
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल,यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिध्द केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका- ४४,खेड – ८५, लांजा-५०,राजापूर- ५१ व संगमेश्वर तालुक्यातील ८१ अशी एकूण पाच तालुक्यातील ३११ गावे पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.या अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी जीवनावर परिणाम होणार आहे,अशा ग्रामस्थांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड,नवी दिल्ली यांच्याकडे आपला अभिप्राय नोंदवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर चे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना केंद्रीय पर्यावरण,वने व वातावरण बदल,मंत्रालयाची अधिसूचना व पत्र प्राप्त झाले आहे.त्यानुसार चिपळूण,खेड,राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार चिपळूण,खेड, लांजा,राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना पाठवण्यात आली आहे.त्यांनी ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिध्द करुन अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्यासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.

