दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पोलिसांनी निदान आता तरी वामन म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करावी,
अखेर बदलापूरच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर पोलिसांनी अँट्रोसिटी व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस टाळाटाळ करत होते.मात्र या प्रकरणी सदर महिला पत्रकाराने असभ्यपणे वागणाऱ्या वामन म्हात्रे याना धडा शिकवण्याचे ठरवल्यामुळे पोलीस पुन्हा अडचणीत आले होते. अखेर त्यानी
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४,७९ व अनु.जाती व अनु.जमाती ( अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३ ( १ ) ( ब ) ( २ ) व कलम ३ ( २ ) अशा कलमाखाली म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.म्हात्रे यांनी केलेले गुन्हे हे अजामीनपात्र असल्यामुळे त्यांना त्वरित अटक करण्यात यावी,अशी मागणी राज्यातील विविध पत्रकारांच्या संघटनांनी केली आहे.त्यामुळे बदलापूर पोलीस अटकेची कारवाई कधी करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वास्तविक स्थानिक आ.किसन कथोरे व एकनाथ शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनी जमावाला शांत करण्याची व समजूत काढण्याची भूमिका पार पाडायला हवी होती.पण या दोघांनी ते न करता आगीत तेल टाकणारी वक्तव्ये केली.त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.बदलापूर पोलिसांनी अटकेची कारवाई केली नाही तर लोकांमध्ये चुकीचे संकेत जातील व विरोधकांच्या हाती कोलीत मिळेल,अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

