Author: दीपक मोहिते

नदीम शेख,पालघर १५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या लाखो रु.च्या निधीच्या दुरुपयोग, १५ व्या वित्त आयोगातर्फे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था मूलभूत सेवा पुरवण्यासाठी मिळालेल्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप कुडणवासियांनी केला आहे.या निधीचा वापर स्वच्छता,पाणीपुरवठा आणि पाण्याचा पुनर्वापर,यांसारख्या कामांसाठी केला जातो.परंतु प्रशासनच्या उदासीनतेमुळे ठेकेदारांकडून नित्कृष्ट दर्जाची कामे केल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत, असाच एक प्रकार पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळाला आहे. कुडण ग्रामपंचायत हद्दीतील “अ,” प्रभागात पंधरा वित्त आयोग योजनेतून सोलर पंप योजना,बोअरवेल व पाणी टाकी,यासाठी यंत्रणा राबवण्याच्या नावाखाली राज एंटरप्राइजेस या ठेकेदाराकडून रु.४ लाख ६८ हजार १२० रु. रकमेचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले होते. या कामात शासनाच्या…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण ; सरकारने सर्वप्रथम बंद पडणाऱ्या सरकारी शाळा वाचवाव्या… राज्याचा शिक्षण विभाग सध्या हेलकावे खात असून या विभागाच्या दिशाहीन धोरणामुळे आपल्या शिक्षण विभागाचा सध्या पार बट्ट्याबोळ झाला आहे.शिक्षणमंत्री अधूनमधून नवीन योजना जाहीर करत असतात,पण त्याचा फारसा उपयोग होत नाही.महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी विषय सुरू करण्याचे जाहीर केले होते.ती योजना किती यशस्वी झाली,कळायला मार्ग नाही.आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्राथमिक. सैनिकी प्रशिक्षण देणार असल्याचे जाहीर केले आहे.राज्यात अडीच लाख माजी सैनिक असून त्यांच्या सहकार्याने हे धोरण राबवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.भुसे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही…

Read More

सुरेश वैद्य,पालघर, ” नाविन्यपूर्ण उपक्रम,” पालघर जिल्ह्यात ५० लाख बांबू वृक्षलागवडीचा शुभारंभ, बांबू लागवडीसाठी पालघर जिल्हा हा उपयुक्त असा जिल्हा आहे.येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या लागवडीतून जिल्ह्यातून होणारे स्थलांतर देखील रोखता येणे शक्य आहे.बांबूचे उत्पन्न,आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून मार्केट लीकेज आणि प्रक्रिया उद्योगाला जोडण्याचे पुढील तीन ते पाच वर्षात प्रयत्न करणार आहोत.शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवडीतून आपले जीवन बदलावे,असे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोग व कार्यकारी मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज धानिवरी ता.डहाणू येथे केले. जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना महाराष्ट्राच्या दुर्गम पालघर जिल्ह्यातील धानिवरी…

Read More

दीपक मोहिते, सुखद दिन, आजच्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. ६ जून १६७४ रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून औपचारिक राज्याभिषेक झाला.हिंदवी स्वराज्याचे प्रणेते व थोर मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यभरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.याच दिनी भारतात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. छत्रपती शिवाजी महाराज,हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत.राष्ट्र निर्माता असलेल्या या महापुरुषाच्या, लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच राज्याभिषेक दिन होय.हे रयतेचे राज्य शाश्वत चिरंतन रहावे,म्हणून महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व शिवाजी महाराज,छत्रपती झाले,याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या सदरेवरून घोषित…

Read More

सुरेश काटे,तलासरी, मान्सूनपूर्व खरेदीसाठी आठवडा बाजारात शेतकऱ्यांची झुंबड, पावसाची चाहूल लागताच मान्सूनपूर्व खरेदीला लोकांनी सुरवात केली आहे. परिसरातील आदिवासीं शेतकऱ्यांची आठवडा बाजारात सध्या झुंबड उडाली आहे. तलासरी तालुक्यातील आजूबाजूच्या गाव खेड्यापाड्यावरील आदिवासी बांधव व शेतकरीवर्ग शेतीपूर्व कामाला लागतो.त्यामुळे त्याला तीन ते चार महिने बाजारहाट करता येत नाही. पावसाळ्यात शेती हंगाम सुरु झाल्यावर बाजारहाटासाठी जावून खरेदी करण्यास वेळही मिळत नाही.त्यामुळे तो मान्सूनपूर्व चौमासाची ( पावसाळ्याच्या हंगामात ) खरेदी करून ठेवतो.या चौमासासाठी सुकी मासळी, मसाले,कडधान्ये,डाळी,हळद, कांदे,बटाटे,चिंच,कोकम, फाटी,जनावरांसाठी पेंढा,शा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून तीन ते चार महिने पुरेल,इतका साठा करून ठेवतो. तलासरी तालुक्यात तलासरी, झरी,आमगाव,उधवा,कोचाई- बोरमाळ,दापचरी,धुंदलवाडी, अशा ठिकठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारात…

Read More

नदीम शेख,पालघर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य वृक्षारोपण मोहीम, खावडा ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण पर्यावरणीय उपक्रम राबवण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.हा उपक्रम पर्यावरणीय शाश्वततेबाबतच्या प्रकल्पाच्या कटिबद्धतेचे निदर्शक आहे, जो भारताच्या वीज प्रेषण पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या त्यांच्या मुख्य उद्दिष्टासोबत असा सुसंगत आहे. या वृक्षारोपण मोहिमेत स्थानिक समुदायांचा, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत सामायिक जबाबदारीची भावना निर्माण झाली.विक्रमगड तालुक्यातील उटवली गावाच्या आदर्श विद्यालयात १०० रोपांची लागवड करण्यात आली, ज्यामध्ये ३० विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले.विद्यार्थ्यांना रोपे देखील देण्यात आली. जेणेकरून त्यांनी त्यांची काळजी घेत पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना कळावी.…

Read More

जव्हार प्रतिनिधी, १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सिल्वर मेडल, ज्ञानराज इंग्लिश मिडीयम स्कूल,आळे,ता.जुन्नर,जि.पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या ८ वीचा विद्यार्थी कु.भाग्येश संतोष रजपुत याने इंटरनॅशनल इंडो-नेपाळ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये १०० मी.धावण्याच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर मेडल पटकावले आहे.या उल्लेखनीय यशासाठी भाग्येशला त्याचे आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक, प्रशिक्षक व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कठोर मेहनत,सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. या यशामुळे त्याचे जव्हार तालुक्यातील ग्रामस्थ,शिक्षक, मित्रमंडळी व कुटुंबीयांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून,भाग्येश हा भविष्यातील एक आशादायक खेळाडू म्हणून पुढे येतो आहे, याबाबत संपूर्ण परिसरात अभिमान व्यक्त होत आहे.समस्त ग्रामस्थ जव्हार यांच्यातर्फे कु.भाग्येश रजपुत याचे मनःपूर्वक…

Read More

वाडा, प्रतिनिधी, वाडा येथे रॅलीचे आयोजन, वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाडा उपविभाग येथे विद्युत सुरक्षा व वीज बचत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रवीण सुटे कार्यकारी अभियंता वसई यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कटकवार यांनी रॅलीचे उद्घाटन केले. उपविभागातील शाखाधिकारी वाडा शहरचे नागेश कांबळे, वाडा ग्रामीणचे राहुल शिंदे, खानवली शाखेचे तसंव्वर मंसूरी व वाडा उप विभागाचे गुण नियंत्रक प्रयास मांडवे व शाखा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आज सकाळी वाडा उपविभाग ते परळी नाकामार्गे तहसील कार्यालय ते खंडेश्वरी नाका अशी रॅली काढली.

Read More

दीपक मोहिते, ” सत्तेचे राजकारण,” बिहार विधानसभा निवडणुक ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे सुरू झाले, यावेळी सत्तापालट होण्याची शक्यता, येत्या नोव्हें.महिन्यात बिहार व मे २०२६ मध्ये आसाम,केरळ,तामिळनाडू व प.बंगाल या चार राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.बिहार राज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून गेल्या महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहार राज्याचे दौरे सुरू झाले आहेत.या राज्यात भाजप व नितीशकुमार यांच्या पक्षाचे संयुक्त सरकार आहे.आसाममध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे.केरळ,तामिळनाडू व प.बंगालमध्ये अनुक्रमे मार्क्स.कम्यु.द्रमुक व तृणमूल काँग्रेस,हे तिन्ही पक्ष गेली अनेक वर्षे सत्तेत आहेत.भाजपने गेल्या काही वर्षांपासून दक्षिणेत आपले पाय रोवण्याचे प्रयत्न केले.पण कर्नाटक वगळता त्यांना इतर राज्यात जनतेचा फारसा प्रतिसाद मिळू शकला…

Read More