- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ४१ अनधिकृत इमारती : अनधिकृत बांधकामे करणारे व मनपा अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करा – आम आदमी पार्टी, नालासोपारा पूर्व भागात ४१ अनधिकृत इमारती बांधून रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या २०० कुटुंबाच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करा.तसेच या अनधिकृत इमारती उभारणारा समाजकंटक व मनपा अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करा,अशी मागणी आम आदमी पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहॆ. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नालासोपारा पूर्व आचोळे येथील ४१ इमारती तोडण्याची कारवाई,वसई विरार शहर महानगरपालिकेने सुरू केली आहे व ती ३१ जाने.२०२५ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महानगरपालिकेने आपली यंत्रणा पूर्ण ताकदिनीशी वापरण्यास सुरुवात…
दीपक मोहिते, जिल्ह्यात शासकीय कृषी व मत्स्य महाविद्यालय सुरू होणार – माजी आ.राजेश पाटील, पालघर जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात असलेले शासकीय कृषी आणि शासकीय मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी माजी आ.राजेश पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची २८ जाने.रोजी मंत्रालयात भेट घेतली.यावेळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य विनायक काशिद उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांसाठी संशोधन केंद्रे आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन कल्पना विकसित करण्यावर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. वसईची प्रसिद्ध केळी,जुनी लाल केळी,सफेद वेलची,आणि मोगरा यांसारख्या पिकांसाठी विशेष संशोधन व मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्यावर चर्चा झाली. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट प्रचंड तणावाखाली, विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) ग्रहमान फिरले असून या गटाला चारी बाजूने दाबण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला चांगलाच वेग आला आहे.पालघर,ठाणे,रायगड व नाशिक जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचे चांगले वर्चस्व असताना देखील ठाणे वगळता उर्वरित जिल्ह्याची पालकमंत्रीपदे त्यांना मिळू शकली नाहीत.यापूर्वी निवडणुकीत तिकीतवाटप,निवडणुका जिंकल्यानंतर मंत्रीपदे,खाते व पालकमंत्रीपदे वाटप प्रक्रियेत भाजप व अजित पवार गटाने त्यांची चांगलीच कोंडी केली आहे. आता तर ठाणे जिल्ह्यातील शिंदे यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांना ठाण्याच्या मैदानात उतरवले आहे.गणेश नाईक व एकनाथ शिंदे या दोघांमध्ये विळ्याभोपळ्याचे नाते आहे.गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव…
संजय लांडगे, वाडा, वडवली येथे कंपनीला भीषण आग ; दोन जखमी वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील एम.डी. कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून दोघा जखमी कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाडा नगर पंचायतची अग्नीशमन वाहन घटनास्थळी पोहोचली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.आग मोठ्याप्रमाणात पसरली असून आगीचे लोळ व धूर दूरवरून पाहायला मिळत आहेत.
सचिन परब, वसई विरार महापालिकेच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद, वसई विरार महापालिकेने स्वच्छ भारत अभियान 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांचे विजेते जाहीर करण्यात आले आहे. या विजेत्यांना मंगळवारी पार पडलेल्या सोहळ्यात मा.आयुक्तांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ वसई विरार अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्वच्छता चॅम्पियन लघुपट, पथनाट्य, चित्रकला, स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आदी विविध स्पर्धांचा समावेश होता. शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात जनजागृती व्हावी तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थी…
मनिष म्हात्रे, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यासाठी क्रिडा स्पर्धा, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ विरार तर्फे अर्नाळा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस या स्पर्धा अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या मैदानावर होत आहेत. आज सकाळी मिरा भाईंदर वसई विरार परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या उपस्थीतीत या क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नालासोपारा विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पुरभे, पोलीस उप निरीक्षक साईप्रसाद पवार,…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका : पुढील सुनावणी २५ फेब्रू.रोजी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली आहे.आता ही सुनावणी पुढील महिन्याच्या २५ तारखेला होणार आहे.या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे.कारण गेली चार वर्षे या निवडणुका रखडल्या आहेत.लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत.याविषयी दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती.परंतु त्या दिवशीही पदरी निराशाच पडली.आता २५ फेब्रु.रोजी होणाऱ्या सूनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रु.रोजी ठेवण्यात येणार होती,परंतु दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख पुन्हा पुढे ढकलली गेली आहे.मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली…
सुशील भोईर, वसई, शिवछाया मित्रमंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७ वा वर्धापनदिन साजरा, नवयुगनगर,दिवाणमान,वसई पश्चिम येथे शिवछाया मित्र मंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७ वा वर्धापन व साई उत्सव नुकताच विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला, १६ ते २३ जाने.दरम्यान श्री साईसच्चरित पारायण सप्ताह व सांयकाळी साईबाबांच्या पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक साईबाबांचा देखावा,लेझीम पथक,धुर्म्रवर्ण ढोल पथक,बेंजो,जगदगुरू श्री नरेंद्र महाराज भजन मंडळ,सुंदर रांगोळ्या,गुलाब फुलांची पुष्पवृष्टी,रंगीबेरंगी फटाके आतषबाजी,पालखीचे मानकरी हरिलाल जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,माणिकपूर पोलिस स्टेशन व प्रशांत लांगी,पोलिस निरीक्षक,वाहतूक शाखा,वसई परिमंडळ-२,संदेश जाधव व मंडळाचे पदाधिकारी,महिला साई भक्त पारंपरिक वेशभूषेत नाचत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.दुसऱ्या दिवशी महिलांचा जल्लोष कार्यक्रमात,निवेदिका मोनिका यांनी…
अनिल वैद्य,नाशिक, अंमलीपदार्थ विक्री विरोधात कठोर कारवाई करावी – गृहराज्यमंत्री योगेश कदम, अंमली पदार्थ विक्रेत्यांबरोबरच सेवन करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करतानाच याविरोधात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.त्यामध्ये पालकांना सहभागी करून घ्यावे,असे निर्देश राज्याचे गृह ( शहरे ), महसूल,ग्रामविकास व पंचायतराज,अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी येथे दिले.ते आज नाशिक पोलिस आयुक्तालयात आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,मोनिका राऊत,चंद्रकांत खांडवी यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री कदम म्हणाले की, अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे.शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी,अंमली पदार्थ…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” देशमुख कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल,असे वाटत नाही…. गेल्या दोन महिन्यांपासून कराड पुराण सुरू असून महायुतीचे सरकार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे,हे आता लपून राहिलेले नाही.संतोष देशमुख यांचे बंधू,कन्या व बीडवासीय न्याय मिळावा,यासाठी राज्यसरकारकडे सातत्याने मागणी करत आहेत,पण फडणवीस सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही.दोन महिने उलटून गेल्यानंतरही हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांना सापडत नाहीत.त्यामुळे बीड जिल्हा पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक असून पोलिसांवर दबाव असल्यामुळे कराड याला सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत,असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केला आहे.मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा,यासाठी दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…
