मनिष म्हात्रे,
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यासाठी क्रिडा स्पर्धा,
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस
आयुक्तालय परिमंडळ ३ विरार तर्फे अर्नाळा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवस या स्पर्धा अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या मैदानावर होत आहेत.
आज सकाळी मिरा भाईंदर वसई विरार परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या उपस्थीतीत या क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नालासोपारा विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पुरभे, पोलीस उप निरीक्षक साईप्रसाद पवार, पोलीस उप निरीक्षक गोकुळ महानवर,आगाशी येथील पोलीस पाटील चंदु पाटील , मुंबई पोलीस दलातील पोलीस निनाद पाटील तसेच अर्नाळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
या क्रिडा स्पर्धांचे यंदाचे दुसरे वर्ष असून गतवर्षी नव्याने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन बदली झालेल्या विजय पाटील यांनी या क्रिडा स्पर्धा सुरु केल्या होत्या.मुलांनी मोबाईलचा अतीरेक टाळावा,तरुणांनी अमली पदार्थांपासून दुर रहावे, मैदानी खेळांकडे वळावे,असा जनजागृती संदेश यावेळी देण्यात आला.वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील हे उत्कृष्ट फुटबाॕलपटू असून त्यांचे खेळामध्ये विशेष प्राविण्य आहे.पोलीस ठाण्यातील ६० कर्मचा-यांनी रोजच्या कामाच्या तणावातुन बाहेर पडून तणावमुक्त व्हावे, यासाठी ते कर्मचा-यांना व्हाॅलबाॕल खेळण्यासाठी प्रोत्साहीत करीत असतात.
या क्रिडा स्पर्धेत परीमंडळ ३ अंतर्गत मांडवी,विरार पुर्व व पश्चीम , नालासोपारा,आगाशी,अर्नाळा आदी परीसरातील ४५ शाळांमधील १५०० हुन अधिक मुले -मुली सहभागी झाले आहेत.व्हाॕलीबाॕल, कबड्डी,खोखो,लांब उडी,गोळा फेक,थाळी फेक, ०० मिटर, १५०० मिटर व ३००० मिटर धावणे,अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
शुक्र. क्रिडा स्पर्धांच्या समारोप प्रसंगी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे,क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड,भारतीय हाॕकीपटू रमेश पिल्ले,विरार येथील आयर्नमॕन हार्दीक पाटील उपस्थित रहाणार आहेत.

