संजय लांडगे, वाडा,
वडवली येथे कंपनीला भीषण आग ; दोन जखमी
वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील एम.डी. कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून दोघा जखमी कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाडा नगर पंचायतची अग्नीशमन वाहन घटनास्थळी पोहोचली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.आग मोठ्याप्रमाणात पसरली असून आगीचे लोळ व धूर दूरवरून पाहायला मिळत आहेत.

