- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- एकनाथ शिंदे आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार का ?
- … तर वेगळे चित्र दिसले असते,
- कथित ५०० कोटीचे प्रकरण ; शिंदे गट सध्या पीछेहाटीवर…
- अरुणाचलमध्ये चीनची पून्हा घुसखोरी ; आपले शौर्यदल भिडले,
- आणखी चार बँकांची लवकरच विक्री,
- पालघर जिल्ह्यात ८ हजार ३२० पात्र शेतकऱ्यांना ४७.३७ कोटीचा लाभ,
- जरांगे यांना ताकद देणारे कोण ? शिंदे सेना संभ्रमावस्थेत…
- महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, अजून वेळ गेलेली नाही… देवेंद्र फडणवीस व हितेंद्र ठाकूर यांनी लवकरात लवकर भाकरी फिरवायला हवी…. राज्य मंत्रिमंडळातील सात ते आठ बदनाम मंत्र्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याच्या निर्णयाप्रत मुख्यमंत्री फडणवीस आले असून ते आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत.तसे संकेत घटक पक्षाच्या प्रमुखांना त्यांनी दिले आहेत.राज्यातील जनतेच्या नाराजीचा फटका महायुतीला बसू नये,यासाठी फडणवीस यांनी आपल्या शर्टाच्या बाह्या वर करण्यास सुरुवात केली आहे.काही मंत्र्यांचा अतिरेकपणा सतत वाढत असल्यामुळे भाजपच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे फडणवीस यांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यांना केंद्रीय नेत्यांकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला आहे.त्यामुळे या सर्वांची गच्छंती अटळ आहे. भारतीय राजकारणात जनता ही बदनाम…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” सरकारला सुचले शहाणपण, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, ७/११ च्या मुंबई बॉम्बस्फ़ोट प्रकरणातील आरोपीना निर्दोष सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.मात्र हे सर्व आरोपी सध्या तरी तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने दाखल केलेल्या फौजदारी अपिलावर काल सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित प्रमाणात स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अनिल किलोर व न्या.शाम चांडक यांच्या खंडपिठाने २१ जुलै रोजी रोजी सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत या १२ आरोपीना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली होती.सरकारी पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करू शकला नाही.तसेच महाराष्ट्र एटीएसने तपासाच्या वेळी काही आरोपिंचा छळ केल्याचे निरीक्षण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सूडाच्या राजकारणामुळे राज्याची वाटचाल अराजकाच्या दिशेने… राज्याचे राजकारण सध्या मंत्र्यांचे बेलगाम वागणे, मराठी भाषेचे संवर्धन व संरक्षण,अशा दोन विषयाभोवती फिरत आहे.मंत्र्यांच्या मुजोरपणाला पायबंद बसायलाच हवा,याबद्दल दुमत नाही आणि मायबोली मराठी भाषेचा अपमान जर कोणी करत असेल तर त्याला मराठी माणसाचा हिसका कसा असतो,हे दाखवायलाच हवे.पण त्याचबरोबर राज्यात अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत.त्या समस्यांना प्राधान्य मिळायला हवे.पण त्याकडे तथाकथित नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.सत्ताधारी बेधुंद वागणे,राज्याच्या प्रगतीवर विपरीत परिणाम करणारे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या,रोजगार,ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडणे,विस्कळीत आरोग्य व वैद्यकीय सेवा,पायाभूत सोयी – सुविधांचा अभाव,वाढती महागाई,जीएसटीचा कहर, उद्योगधंदे वाढीचा मंदावलेला वेग,शेतमालाला योग्य…
विश्वनाथ ठाकरे,शहापूर प्रदीप चव्हाण यांच्या ऋणानुबंध कविता संग्रहाचे प्रकाशन, प्रदीप चव्हाण यांच्या ” ऋणानुबंध, ” या कविता संग्रहाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला . या कार्यक्रमात योगेश जोशी, नेहाते,संजीवनी चव्हाण, प्रथमेश चव्हाण,आर्या चव्हाण शांताराम चव्हाण,सहकारी अधिकारी श्रेणी 1 सहकारी संस्था शहापूर, अरुण पाटील उपाध्यक्ष ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षणाधिकारी शहापूर, रामचंद्र विशे, गटशिक्षणाधिकारी शहापूर हिराजी वेखंडे, संगीता माळी , संगीता पवार केंद्रप्रमुख नडगाव,विजय चोघांळा सर अध्यक्ष पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत प्रशांत जाधव प्राचार्य शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल वासिंद,सचिन ढमणे,दिलीप ठाकरे,आहेर या सर्वांच्या सहकार्याने हे पुस्तक पूर्ण करू शकलो,असे प्रदीप चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले व त्यांचे…
वसंत भोईर,वाडा भिती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी – पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे लैंगिक शोषण असो की अन्य कोणीही त्रास देत असल्यास मुली व महिलांनी भिती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी,असे आवाहन वाडा पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ” जनविश्वास,” सप्ताह साजरा करण्यात येत असून या अंतर्गत पालघर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार यांच्यातर्फे वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना दत्तात्रेय किंद्रे यांनी महिला कायदे व सायबर क्राईम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने परळी…
वसंत भोईर,वाडा, चिंचघर – देवघर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बि-हाड मोर्चाचे आयोजन, तालुक्यातील चिंचघर-देवघर या रस्त्याची दुरावस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्यांची भीतीने गाळण उडत असते.रस्त्याच्या अशा दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थी व रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा सोम.२८ जुलै रोजी धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली बि-हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याबाबत वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून त्याला केराची…
जव्हार प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेची श्रावणी सोमवार विशेष सेवा, पालघर विभाग रा.प. महामंडळाच्या जव्हार आगारातर्फे श्रावणी सोमवार निमित्त भाविकांसाठी खास “ जव्हार – नाशिक दर्शन,” विशेष बस फेरीची घोषणा करण्यात आली आहे. ही बस फेरी शनिवार व रविवार वगळता प्रत्येक श्रावणी सोमवारसाठी उपलब्ध होणार आहे.सदर प्रवासात जव्हार-त्र्यंबकेश्वर-नाशिक-वणी ( सप्तशृंगी गड )- रेणुका माता मंदिर-शिर्डी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे.या दर्शन फेरीचे एकूण तिकीट दर केवळ रु. ९४६/- इतके असून,भाविकांना ही सेवा परवडणारी आहे. प्रवाशांसाठी खास सवलती: ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा, “ महिला प्रवासी सन्मान योजना,” अंतर्गत सर्व महिलांना तिकीट दरात ५० %…
दीपक मोहिते, वसई – विरार मनपा निवडणूक ; जागावाटपात भाजप शिंदे गटावर कुरघोडी करण्याच्या तयारीत… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप १२६ जागांपैकी ११० जागा लढवण्याच्या तयारीत आहे.तर शिंदे गटाला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.शिंदे गटाला ४० ते ५० जागांची अपेक्षा आहे,पण भाजप त्या देतील,असे वाटत नाही. या निवडणुकीत भाजप शिंदे गटाशी युती करून निवडणूक लढवेल,अशी शक्यता फार कमी आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसची ( अजित पवार ) ताकद नगण्य असल्यामुळे ते ही निवडणूक लढवण्याच्या फंदात पडतील,असे वाटत नाही.वसई तालुक्यात त्यांचा पक्ष औषधाला देखील नाही,त्यामुळे भाजप व शिंदेची शिवसेना त्यांना विचारात घेणार नाही.गेल्या २५ वर्षात एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यातील…
सचिन पाटील,विरार विरार येथे ” साईक स्पेक्ट्रम २०२५” डिजिटल स्पर्धेचे आयोजन, युवा पिढीच्या मानसशास्त्राचे सखोल आकलन करणे,हे त्यांचे कल्याण आणि सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.मानसिक आरोग्य ते डिजिटल,वित्त आणि सामाजिक गतिशीलता यांसारख्या प्रचलित ट्रेंडबद्दल जागरूकता निर्माण केल्यामुळे तरुणांना या विश्वाशी जोडण्यास मदत होते. ” साईक स्पेक्ट्रम २०२५” या आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेने विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विवा महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाने ” साईक स्पेक्ट्रम २०२५” या अभिनव आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.या स्पर्धेप्रसंगी विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा,उप प्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका रश्मी…
दीपक मोहिते, मुख्यमंत्री फडणवीस मंत्रीमंडळातील चौघांना बाहेरचा रस्ता दाखवणार ; आ. स्नेहा दुबे पंडीत यांची वर्णी लागणार… राज्य मंत्रीमंडळातील चार मंत्र्यांच्या डोक्यावर सध्या हकालपट्टीची तलवार लटकत आहे.संजय शिरसाठ,माणिकराव कोकाटे,योगेश कदम व संजय राठोड,या चार मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश आहे.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याला सध्या राज्यमंत्री नाही,त्यामुळे तीन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशी पाच पदे भरावी लागणार आहेत.त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाची फेररचना करतील,अशी शक्यता आहे.या फेररचनेत वसई तालुक्याला राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.त्यासाठी सुशिक्षित व अभ्यासू आमदार अशी ओळख असलेल्या वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांचे नाव आघाडीवर आहे.राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.त्यांचे वडील विवेक पंडित…
