दीपक मोहिते,
वसई – विरार मनपा निवडणूक ; जागावाटपात भाजप शिंदे गटावर कुरघोडी करण्याच्या तयारीत…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप १२६ जागांपैकी ११० जागा लढवण्याच्या तयारीत आहे.तर शिंदे गटाला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.शिंदे गटाला ४० ते ५० जागांची अपेक्षा आहे,पण भाजप त्या देतील,असे वाटत नाही.
या निवडणुकीत भाजप शिंदे गटाशी युती करून निवडणूक लढवेल,अशी शक्यता फार कमी आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसची ( अजित पवार ) ताकद नगण्य असल्यामुळे ते ही निवडणूक लढवण्याच्या फंदात पडतील,असे वाटत नाही.वसई तालुक्यात त्यांचा पक्ष औषधाला देखील नाही,त्यामुळे भाजप व शिंदेची शिवसेना त्यांना विचारात घेणार नाही.गेल्या २५ वर्षात एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या साध्या निवडणुका लढवता आल्या नाहीत.उमेदवारच नसल्यामुळे त्यांचे एक दोन पदाधिकारी निवडणुकापासून कायम दूर राहिले.आजही त्यांची तशीच परिस्थिती आहे,त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीपासून दूर राहतील,असे वाटते.भाजप व शिंदे गट हे दोघेही युती न करता या निवडणुका ” मैत्रीपूर्ण लढत,” या गोंडस नावाखाली लढवतील अशी शक्यता आहे.शिंदे गटाने १५ जागा मान्य केल्या तर मात्र हे दोघे ही निवडणूक एकत्रितपणे लढतील.
विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत भाजप व शिंदे गट गुजराती,मारवाडी व उत्तर भारतीय या तीन समाजाची मोट बांधून सोशल इंजिनियरिंगच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील.आगरी व सामवेदी समाज याही निवडणुकीत भाजपला डोक्यावर घेण्याची शक्यता आहे.वसईतील ख्रिस्ती समाजाची मते ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडीमध्ये विभागली जातील.हा धोका लक्षात घेऊन हे दोन्ही पक्ष समझोता करून निवडणुका लढवतील,असा अंदाज आहे.या दोघांमध्ये समझोता झाला तरी बहुजन विकास आघाडी काँग्रेसला १० ते १५ जागापेक्षा अधिक जागा देणार नाहीत.अपेक्षेनुसार त्यांना जागा मिळाल्या नाहीत तर काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढेल.त्याचा फायदा मात्र भाजपला होणार आहे.काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी सोबत ही निवडणूक लढण्यास तयार नाहीत.उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील त्याच मतांची आहे.एकेकाळी नालासोपारा शहरात त्यांच्या पक्षाची बऱ्यापैकी ताकद होती.पण अडीच वर्षांपूर्वी पक्षात फूट पडली व पक्ष क्षीण होत गेला.आजही पक्षाची अवस्था अत्यंत बिकट अशीच आहे.पक्षाकडे खंबीर नेतृत्व नसल्यामुळे त्यांचा पक्ष गेल्या दहा वर्षात खंगत गेला,तो आजतागायत….

