Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी, सूर्या धरणामुळे संपर्क तुटलेल्या बेंडेपाडाला होडीचा आधार, पावसाळा सुरु झाला की बेंडेपाडा गावावर संकट येत असते. सूर्या धरण व धामणी ही दोन धरणे भरल्यावर गावाचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो.आजारी व्यक्ती, गर्भवती महिला,विद्यार्थी, वयोवृद्ध,असे सर्वच जण अडचणीत येत असतात.दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते. यंदा मात्र तिलोंड्याचे माजी सरपंच परशुराम पाटारा यांचे सुपुत्र विजय पाटारा यांनी या प्रकरणात लक्ष घातले.त्यांनी थेट आ. हरिश्चंद्र भोये यांच्याशी संपर्क साधत या गंभीर परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले.गावकऱ्यांची अडचण ओळखून,आ.हरिश्चंद्र भोये यांनी तातडीने होडीसाठी आर्थिक निधी मंजूर केला.या मदतीमुळे आता बेंडेपाडा गावासाठी होडीची सुविधा उपलब्ध झाली आहे.त्यामुळे विद्यार्थी आता…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरीत हॉटेल मालकांना मराठी पाट्या लावण्यासंदर्भात समज, मुंबई अहमदाबाद महामार्गांवर अनेक गुजराती – मारवाडी लोकांची हॉटेल्स असून या हॉटेल्सच्या मालकांनी आपल्या हॉटेलवरील पाट्या या गुजराती भाषेत लावल्या आहेत.महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना हॉटेलच्या पाट्या मराठीत लावण्याबाबत त्यांच्यामध्ये प्रचंड उदासीनता होती. या हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलच्या पाट्या मराठीत न लावल्यास खळखट्याकचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शांतता व एकोपा राहण्यासाठी आज सकाळी या हॉटेल मालकांना तसेच तलासरीतील मनसे कार्यकर्त्यांना तलासरी पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी उभयतांमध्ये सामंजस्य घडवून आणले. सदर बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यानी गुजराती पाट्या असलेल्या हॉटेल्सनी सात दिवसांमध्ये मराठी पाट्या लावाव्यात तसेच मेनू कार्डही मराठीमध्ये ठेवावेत.…

Read More

दीपक मोहिते, अजून वेळ गेलेली नाही… देवेंद्र फडणवीस व हितेंद्र ठाकूर यांनी लवकरात लवकर भाकरी फिरवायला हवी…. राज्य मंत्रिमंडळातील सात ते आठ बदनाम मंत्र्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याच्या निर्णयाप्रत मुख्यमंत्री फडणवीस आले असून ते आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत.तसे संकेत घटक पक्षाच्या प्रमुखांना त्यांनी दिले आहेत.राज्यातील जनतेच्या नाराजीचा फटका महायुतीला बसू नये,यासाठी फडणवीस यांनी आपल्या शर्टाच्या बाह्या वर करण्यास सुरुवात केली आहे.काही मंत्र्यांचा अतिरेकपणा सतत वाढत असल्यामुळे भाजपच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे फडणवीस यांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यांना केंद्रीय नेत्यांकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला आहे.त्यामुळे या सर्वांची गच्छंती अटळ आहे. भारतीय राजकारणात जनता ही बदनाम…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” सरकारला सुचले शहाणपण, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, ७/११ च्या मुंबई बॉम्बस्फ़ोट प्रकरणातील आरोपीना निर्दोष सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.मात्र हे सर्व आरोपी सध्या तरी तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने दाखल केलेल्या फौजदारी अपिलावर काल सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित प्रमाणात स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अनिल किलोर व न्या.शाम चांडक यांच्या खंडपिठाने २१ जुलै रोजी रोजी सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत या १२ आरोपीना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली होती.सरकारी पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करू शकला नाही.तसेच महाराष्ट्र एटीएसने तपासाच्या वेळी काही आरोपिंचा छळ केल्याचे निरीक्षण…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सूडाच्या राजकारणामुळे राज्याची वाटचाल अराजकाच्या दिशेने… राज्याचे राजकारण सध्या मंत्र्यांचे बेलगाम वागणे, मराठी भाषेचे संवर्धन व संरक्षण,अशा दोन विषयाभोवती फिरत आहे.मंत्र्यांच्या मुजोरपणाला पायबंद बसायलाच हवा,याबद्दल दुमत नाही आणि मायबोली मराठी भाषेचा अपमान जर कोणी करत असेल तर त्याला मराठी माणसाचा हिसका कसा असतो,हे दाखवायलाच हवे.पण त्याचबरोबर राज्यात अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत.त्या समस्यांना प्राधान्य मिळायला हवे.पण त्याकडे तथाकथित नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.सत्ताधारी बेधुंद वागणे,राज्याच्या प्रगतीवर विपरीत परिणाम करणारे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या,रोजगार,ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडणे,विस्कळीत आरोग्य व वैद्यकीय सेवा,पायाभूत सोयी – सुविधांचा अभाव,वाढती महागाई,जीएसटीचा कहर, उद्योगधंदे वाढीचा मंदावलेला वेग,शेतमालाला योग्य…

Read More

विश्वनाथ ठाकरे,शहापूर प्रदीप चव्हाण यांच्या ऋणानुबंध कविता संग्रहाचे प्रकाशन, प्रदीप चव्हाण यांच्या ” ऋणानुबंध, ” या कविता संग्रहाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला . या कार्यक्रमात योगेश जोशी, नेहाते,संजीवनी चव्हाण, प्रथमेश चव्हाण,आर्या चव्हाण शांताराम चव्हाण,सहकारी अधिकारी श्रेणी 1 सहकारी संस्था शहापूर, अरुण पाटील उपाध्यक्ष ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षणाधिकारी शहापूर, रामचंद्र विशे, गटशिक्षणाधिकारी शहापूर हिराजी वेखंडे, संगीता माळी , संगीता पवार केंद्रप्रमुख नडगाव,विजय चोघांळा सर अध्यक्ष पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत प्रशांत जाधव प्राचार्य शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल वासिंद,सचिन ढमणे,दिलीप ठाकरे,आहेर या सर्वांच्या सहकार्याने हे पुस्तक पूर्ण करू शकलो,असे प्रदीप चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले व त्यांचे…

Read More

वसंत भोईर,वाडा भिती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी – पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे लैंगिक शोषण असो की अन्य कोणीही त्रास देत असल्यास मुली व महिलांनी भिती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी,असे आवाहन वाडा पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ” जनविश्वास,” सप्ताह साजरा करण्यात येत असून या अंतर्गत पालघर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार यांच्यातर्फे वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना दत्तात्रेय किंद्रे यांनी महिला कायदे व सायबर क्राईम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने परळी…

Read More

वसंत भोईर,वाडा, चिंचघर – देवघर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बि-हाड मोर्चाचे आयोजन, तालुक्यातील चिंचघर-देवघर या रस्त्याची दुरावस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्यांची भीतीने गाळण उडत असते.रस्त्याच्या अशा दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थी व रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा सोम.२८ जुलै रोजी धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली बि-हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याबाबत वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून त्याला केराची…

Read More

जव्हार प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य परिवहन  सेवेची  श्रावणी सोमवार विशेष सेवा, पालघर विभाग रा.प. महामंडळाच्या जव्हार आगारातर्फे श्रावणी सोमवार निमित्त भाविकांसाठी खास “ जव्हार – नाशिक दर्शन,” विशेष बस फेरीची घोषणा करण्यात आली आहे. ही बस फेरी शनिवार व रविवार वगळता प्रत्येक श्रावणी सोमवारसाठी उपलब्ध होणार आहे.सदर प्रवासात जव्हार-त्र्यंबकेश्वर-नाशिक-वणी ( सप्तशृंगी गड )- रेणुका माता मंदिर-शिर्डी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे.या दर्शन फेरीचे एकूण तिकीट दर केवळ रु. ९४६/- इतके असून,भाविकांना ही सेवा परवडणारी आहे. प्रवाशांसाठी खास सवलती: ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा, “ महिला प्रवासी सन्मान योजना,” अंतर्गत सर्व महिलांना तिकीट दरात ५० %…

Read More

दीपक मोहिते, वसई –  विरार मनपा निवडणूक ; जागावाटपात भाजप शिंदे गटावर कुरघोडी करण्याच्या तयारीत… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप १२६ जागांपैकी ११० जागा लढवण्याच्या तयारीत आहे.तर शिंदे गटाला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.शिंदे गटाला ४० ते ५० जागांची अपेक्षा आहे,पण भाजप त्या देतील,असे वाटत नाही. या निवडणुकीत भाजप शिंदे गटाशी युती करून निवडणूक लढवेल,अशी शक्यता फार कमी आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसची ( अजित पवार ) ताकद नगण्य असल्यामुळे ते ही निवडणूक लढवण्याच्या फंदात पडतील,असे वाटत नाही.वसई तालुक्यात त्यांचा पक्ष औषधाला देखील नाही,त्यामुळे भाजप व शिंदेची शिवसेना त्यांना विचारात घेणार नाही.गेल्या २५ वर्षात एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यातील…

Read More