सुरेश काटे,तलासरी
तलासरीत हॉटेल मालकांना मराठी पाट्या लावण्यासंदर्भात समज,
मुंबई अहमदाबाद महामार्गांवर अनेक गुजराती – मारवाडी लोकांची हॉटेल्स असून या हॉटेल्सच्या मालकांनी आपल्या हॉटेलवरील पाट्या या गुजराती भाषेत लावल्या आहेत.महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना हॉटेलच्या पाट्या मराठीत लावण्याबाबत त्यांच्यामध्ये प्रचंड उदासीनता होती.
या हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलच्या पाट्या मराठीत न लावल्यास खळखट्याकचा इशारा देण्यात आला होता.
त्यामुळे शांतता व एकोपा राहण्यासाठी आज सकाळी या हॉटेल मालकांना तसेच तलासरीतील मनसे कार्यकर्त्यांना तलासरी पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी उभयतांमध्ये सामंजस्य घडवून आणले.
सदर बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यानी गुजराती पाट्या असलेल्या हॉटेल्सनी सात दिवसांमध्ये मराठी पाट्या लावाव्यात तसेच मेनू कार्डही मराठीमध्ये ठेवावेत. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारानी गिऱ्हाइकांशी मराठीत बोलले पाहिजे,असे सांगितले.यावेळी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हॉटेल मालक व चालक यांना मराठी पाटी,मराठी भाषा, मेनू कार्ड,याबाबत सूचना दिल्या. तसेच मनसे पदाधिकाऱ्यानी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत प्रशासनास सहकार्य करावे,असे स्पष्ट केले.

