- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, पुनर्विकास मार्गदर्शन शिबीर ; जनजागृतीसाठी एक चांगला उपक्रम, वसई विरार भागात पुनर्विकासाचे आता वारे वाहू लागले आहेत,याविषयी जनतेला माहिती मिळावी,यासाठी पुनर्विकास समितीतर्फे ” स्वयं:पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.वसईत होणाऱ्या या मार्गदर्शन शिबिराच्या निमंत्रकपदी वसईच्या आ.स्नेहा दुबे या आहेत. वसई व नालासोपारा या दोन शहरात गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.नालासोपारा शहरातील ४१ अनधिकृत इमारतीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.समाजकंटकांनी आरक्षित जमिनीवर या इमारती उभारल्या व त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेने दोन महिन्यापूर्वी जमिनदोस्त केल्या.त्यामुळे सुमारे ४०० कुटुंबे बेघर झाली आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर आ.राजन नाईक व आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रकरणी पुढाकार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एकनाथ शिंदे व अजित पवार,या दोघांना खूप काही सहन करावे लागणार…. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यांना एकनाथ शिंदे व अजित पवार गटाची फारशी आता गरज उरलेली नाही.त्यामुळे या दोन्ही गटाला दिल्ली दरबारी मिळणारा मानमरातब सध्या उतरणीला लागला आहे.आपल्याला हल्ली सतत डावलण्यात येत असल्यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्या गावी शेतीत रमत असतात तर अजित पवार हे मुकाट्याने ” तोंड बांधून,बुक्क्याचा मार,” सहन करत आहेत.या दोघांना सत्तेशिवाय श्वास घेता येत नाही.भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून ते नाराज आहेत,पण दिल्लीतील नेत्यासमोर आपले काही चालणार नाही,हे माहीत असल्यामुळे त्यांनी स्वस्थ बसणे,यामध्येच आपले…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज यांचे वक्तव्य ; शिवसेना व मनसेमध्ये संभ्रमाचे वातावरण, उद्धव व राज हे ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर शिवसेना व मनसे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र येऊन लढवतील,असे अंदाज व्यक्त झाले होते.पण काल राज ठाकरे यांनी युतीविषयी संभ्रम निर्माण होईल,असे वक्तव्य केल्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.जाहीर सभा पार पडल्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकारी व सैनिकांनी युतीबाबत बाहेर चर्चा करू नये,असे आदेश दिले होते.त्यानंतर काल त्यांनी ती जाहीर सभा केवळ मराठी मुद्द्यासाठी होती.युतीसंदर्भात नोव्हे.डिसें.नंतर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया वर गेल्या आहेत.यापूर्वीही राज ठाकरे यांनी आपली भूमिका वारंवार बदलल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर…
वसंत भोईर वाडा, शेतकऱ्यांचे खासदारांना साकडे, तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर रिसायकलिंग कंपन्या चिंचघरपाडा, मुसारणे( पाटील पाडा ) या गावातील परंपरागत वहिवाटीच्या नैसर्गिक नाल्यात टायर कंपनी मालकाने संरक्षक भिंत बांधली आहे.त्यामुळे नाल्याचे संपूर्ण पाणी नजीकच्या भातशेतीत गेल्यामुळे पेरणी केलेले संपूर्ण पीक वाया गेले आहे . या संदर्भात निवेदन देऊनही कार्यवाहीसाठी चालढकल होत होती.अखेर येथील शेतकऱ्यांनी पालघरचे खा.डॉ. हेमंत सावरा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. परंपरागत चालत आलेला नैसर्गिक नाला बंद केल्यामुळे या दोन गावातील शेतकऱ्यांचे २५ ते ३० हेक्टर क्षेत्र बाधित होऊन येथील संपूर्ण भात शेती नापीक होणार असल्याचे खा. डाॅ.हेमंत सवरा यांच्या निदर्शनास आणले.…
जव्हार प्रतिनिधी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यांत्रिक भातशेतीच्या दिशेने वाटचाल, जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आदिवासी असले तरी बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवत आहेत.कृषी विज्ञान केंद्र,कोसबाड यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आता भातशेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. भात लागवडीसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर, भात ट्रे रोपवाटिका,मॅट पद्धत, राबविरहित लागवड,टोकन पद्धत,सगुणा तंत्रज्ञान,अशा विविध उपाय करून शेतकऱ्यांनी शेतीची दिशा बदलली आहे.२०२५-२६ मध्ये भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. गेल्या सहा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे शास्त्रज्ञ भरत कुशारे हे यंत्राद्वारे भातलागवड,ट्रे रोपवाटिका व यांत्रिक पद्धतीने शेती या संकल्पनांचा प्रचार व प्रसार करत आहेत.त्यांच्या प्रयत्नातून कोसबाड,जव्हार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; उमेदवारी देताना पक्षाच्या वरिष्ठांना करावी लागणार तारेवरची कसरत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांची युती झाल्यास वसई तालुक्यातील लढतीचे चित्र कसे असू शकेल ? याविषयी राजकीय विश्लेषकामध्ये मतांतर आहे.काहींच्या म्हणण्यानुसार भाजप व एकनाथ शिंदे गटाला काही अंशी फटका बसू शकतो.तर काहींनी मनसेमुळे बहुजन विकास आघाडीची नालासोपारा शहरात काही प्रमाणात पीछेहाट होऊ शकते.गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने नालासोपारा विधानसभा मतदारसंघात लक्षणीय मते घेतली होती.मनसे व प्रहार जनशक्ती या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी सुमारे तीस हजार मते घेतल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा या लढतीत मोठ्या फरकाने पराभव झाला होता.त्यामुळे…
दीपक मोहिते, ” समाधानाची बाब,” विधानसभा सभागृहात वसई व नालासोपारा दिसू लागले,लोकांमध्ये समाधानाचे वातावरण, हल्ली विधानसभा सभागृहात वसई व नालासोपारा मतदारसंघाचे आ.स्नेहा दुबे व राजन नाईक सतत आपल्या मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न,समस्या व लोकांच्या अडचणीबाबत प्रश्न मांडत असतात,ही एक समाधानाची बाब तर आहेच,पण लोकामध्येही चांगले संकेत जात आहेत.गेल्या सहा महिन्यात त्यांनी अधिवेशनात या दोन्ही मतदारसंघाच्या प्रश्नाकडे सरकारचे वारंवार लक्ष वेधले.सरकारही त्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे. आजवर विधानसभा सभागृहात या दोन्ही मतदारसंघाचे प्रश्न व समस्या कधीही हिरिरीने मांडले गेले नव्हते.त्यामुळे सरकारने देखील या भागाच्या विकासाकडे आजवर कधीच लक्ष दिले नाही.त्यामुळे मंत्रालयापासून अवघ्या ४०…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” प्रदीर्घ काळानंतर जरांगे पाटील पुन्हा रणांगणात,पण डाळ शिजेल का ? गेले वर्षभर निवांत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत.” सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर त्यांना सळो की पळो करून सोडतो,” अशी सिंहगर्जना त्यांनी केली आहे.२९ ऑगस्टच्या आत आरक्षण द्या,अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्यास सरकार जबाबदार राहील,असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.यापूर्वीही जरांगे पाटलांनी अनेकदा सरकारला असे निर्वाणीचे इशारे दिले होते.पण सरकारच्या दूताकडून वारंवार समोर आलेले सरबताचे ग्लास तोंडाला लावण्यात जरांगे पाटील दंग राहिल्यामुळे दोन दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्याची सरकारने फारशी दखल घेतलेली नाही. मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे…
दीपक मोहिते, राज्याची विनाशाकडे वाटचाल, बहिणी लाडक्या झाल्या,आता सरकार भावोजीना” बेवडे,” करण्याच्या तयारीत… वर्षभरापूर्वी राज्य सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागावा,यासाठी ” लाडकी बहीण,” योजना आणली.या बहिणीच्या माध्यमातून महायुतीने विधानसभा निवडणुका जिंकल्या.आता मात्र त्याच सरकारने,आपल्या भावोजीना ” बेवडे,” बनवण्यासाठी नवीन मद्य धोरण अमलात आणले आहे.महिलांच्या मतासाठी सरकारने आपल्या तिजोरीतील पैसा अक्षरशः लुटला.त्यामुळे आज राज्याच्या डोक्यावर १० लाख कोटींचे कर्ज आहे.आज ना उद्या या कर्जाचे व्याज देणे,देखील सरकारला शक्य होणार नाही.आपले राज्य आर्थिक व उद्योग क्षेत्रात क्रमांक १ वर असल्याचा ढोल सतत वाजत असतो.पण प्रत्यक्षात आपले राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. राज्य सरकारचे अनेक विभागाकडे आजच्या घडीला निधीची कमतरता असल्यामुळे…
जव्हार प्रतिनिधी, हिवताप व हत्तीरोग नियंत्रण विभागाचे कर्मचारी हक्कांपासून वंचित, पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन तब्बल १० वर्षे पूर्ण होत आली,तरीही हिवताप हत्तीरोग नियंत्रण विभागाचा आर्थिक व प्रशासकीय कारभार अद्याप ठाणे येथूनच चालवला जात आहे.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जवळपास २५० आरोग्य कर्मचारी आजही आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. सध्या पालघर जिल्ह्यात हिवताप विभागांतर्गत १७८ आरोग्य सेवक,४२ आरोग्य सहाय्यक,१२ तालुका पर्यवेक्षक व १४ कार्यालयीन कर्मचारी असे कर्मचारी कार्यरत आहेत.हे कर्मचारी आदिवासी व डोंगराळ भागात मलेरिया,डेंग्यू,चिकनगुनिया, जपानी मेंदूज्वर,यासारख्या कीटकजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेहनत घेत आहेत.मात्र,त्यांच्या सेवा नोंदी, वेतन,रजा,वैद्यकीय बिले तसेच पदोन्नतीशी संबंधित सर्व प्रक्रिया ठाणे कार्यालयातून पार पडत असल्यामुळे त्यांना वेळेवर लाभ मिळत नाहीत.या…
