Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यातील सुमारे ४० गावांना सतर्कतेचा इशारा.. पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस होत पालघर,डहाणू, वाडा,विक्रमगड,या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.पावसाच्या संततधारेने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सूर्या प्रकल्पा अंतर्गत धामणी धरणात २२८ दशलक्ष घ.मी. ( ८२ % ) पाणीसाठा निर्माण झाला असून धरणातील पाण्याची पातळी स्थिर राखण्यासाठी तीन दिवसांपूर्वी धरणाचे तीन दरवाजे ४० सें.मी.ने उघडण्यात आले असुन सूर्या नदीपात्रात १४ हजार ३३७ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढला असून मागील २४ तासात २५४ मि.मी.पाऊस पडला.धरण प्रकल्प क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण १ हजार ५३०…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कितीही बदल होवो,पण वसईकरांचे हाल काही थांबत नाहीत, गेल्या काही दिवसापासून पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून वसई/विरार अनेक परिसर पाण्याखाली गेले आहेत.” नेमेची येतो पावसाळा,” उक्तीप्रमाणे यंदाही वसई विरार महानगरपालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत.नालेसफाईची बोगस कामे सुरू असताना त्या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणाऱ्या लोकप्रतिनिधीवर आता तोंड लपवण्याची पाळी आली आहे. सात महिन्यापूर्वी वसई तालुक्यात सत्ताबदल झाल्यानंतर वसईकरांनी आपल्याला सुगीचे दिवस येतील,अशी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली होती.पण तालुक्यातील सद्यस्थिती पाहिल्यानंतर त्यांची ही स्वप्ने ” मुंगेरीलालके हसीन सपने,” ठरली आहेत.यंदाही नालेसफाईच्या कामात ठेकेदार व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले हात. चांगलेच धुवून घेतले आहेत. गेल्या चार दिवसात झालेल्या…

Read More

दीपक मोहिते, ग्रामीण जनतेची दैन्यावस्था, देवाभाऊ ” अजब तुझे सरकार आणि बेधुंद तुमचा कारभार,” हिंदीची सक्ती प्रकरणी ठाकरे बंधूनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे फडणवीस सरकार अक्षरशः तोंडावर पडले.मराठी भाषा,आम्ही बोलणार नाही,असे उर्मटपणे बोलणाऱ्या अन्य भाषिकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्यानंतर त्याचे अन्य राज्यात जोरदार पडसाद उमटत आहेत.ही आग आता अन्य राज्यातही पसरण्याची शक्यता आहे.सरकारला या प्रश्नी माघार घ्यावी लागल्यामुळे सेना – मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.तर दुसरीकडे विजयी मेळाव्याला मराठी भाषिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपच्या नेत्यांच्या पोटातील जळजळ सतत वाढत आहे.स्था.स्व.संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.मात्र,मराठी व अन्य भाषिकांना…

Read More

वसंत भोईर, वाडा येथे आषाढीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या पालख्या व दिंड्या, वाडा शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शनिवारी टाळ – मृदुंगाचा गजर करत पालखी व दिंडीचे सोहळे आयोजित केले होते. वाडा शहरात व ग्रामीण भागात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.वारकरी संप्रदाय,महाराष्ट्राची संतपरंपरा,महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख मुलांना लहान वयातच व्हावी,या हेतूने शाळेतर्फे दरवर्षी आषाढी एकादशीला दरवर्षी हा उपक्रम साजरा करण्यात येत असतो . तालुक्यातील मौजे खानिवली येथील संगिता पाटील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खानिवली गावातून पायी दिंडी आयोजित केली होती.या पायी दिंडीतील विठ्ठल – रुखमाई यांचा पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, युवा अध्यक्षपदी संदीप माळी तर युवती अध्यक्षपदी सुवर्णा रावते यांची सर्वानुमते निवड, सालाबादप्रमाणे ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदाही जव्हार शहरात युवा आदिवासी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.या कार्यक्रमाचे नियोजन भक्कम आणि प्रभावी करण्यासाठी युवा आदिवासी संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड सभा काल हनुमान पॉईंट,जव्हार येथे पार पडली. या निवड सभेला कोर कमिटी सदस्य,विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेत सर्वानुमते संदीप माळी यांची युवा अध्यक्षपदी,तर सुवर्णा रावते यांची युवती अध्यक्षपदी आणि सोनाली महाले यांची युवती कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार विक्रमगड विधानसभा आ.हरिश्चंद्र भोये यांच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महानगरपालिका निवडणुका ; स्वच्छ चारित्र्य व प्रतिमा असलेल्या व्यक्तींना संधी न दिल्यास पुन्हा कपाळमोक्ष होण्याची शक्यता, भाजपचा उधळलेला अश्वमेघ घोडा रोखण्यासाठी ठाकरे बंधू यांनी काल गळ्यात गळा घालत मराठी माणसाच्या इच्छा व आकांक्षेवर फुंकर मारली.तर शरद पवार व अजित पवार हे दोघे काका – पुतण्या देखील अधून मधून एकत्र येण्याची भाषा करत आहेत.राज्यातील अनेक राजकीय कुटुंबे भाजपच्या कटकारस्थानामुळे गेल्या काही वर्षात दुभंगली गेली.वर्षानुवर्षे सत्तेची अनेक पदे उपभोगणारे एकनाथ शिंदे याना ईडीची भिती दाखवून भाजपने आपल्या गळाला लावले.अशी अनेक उदाहरणे गेल्या तीन ते चार वर्षात आपल्याला पहायला मिळाली.” सत्तेसाठी काय पण,” असे धोरण राबवत भाजपने अनेक…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ठाकरे बंधुचे मनोमिलन ; राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार… ज्या विजयी मेळाव्याची मराठी भाषिक जनतेला प्रतिक्षा होती,तो ऐतिहासिक मेळावा काल वरळी येथे मोठ्या उत्साहातकाल पार पडला.ठाकरे बंधूनी एकत्र यावे व महाराष्ट्राला वाचवावे,अशी जी अपेक्षा मराठी माणसाकडून व्यक्त करण्यात येत होती.त्यावर या विजयी मेळाव्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.या मेळाव्याला मराठी भाषिकांनी ” न भूतो,न भविष्यती,” अशी गर्दी केली होती.यावेळी राज ठाकरे यांनी या मेळाव्यानंतरही ” आम्ही एकत्रच राहणार आहोत,”अशी ग्वाही दिल्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.दुसरीकडे मात्र या ऐतिहासिक मेळाव्यामुळे भाजप नेत्यांच्या पोटात मळमळ सुरू झाली आहे.शिंदे गटाने मात्र या मेळाव्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.एकनाथ शिंदे,उदय सामंत व प्रताप सरनाईक…

Read More

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल, तालुक्यातील निंबवली – पालसई या रस्त्याची पार दुरावस्था झाली असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना पाठदुःखीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्यांची भीतीने गाळण उडत आहे.तर,मिनी डोर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.त्यांना आठ कि.मी. अंतराचा प्रवास पायी करावा लागतो.त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका सचिव सागर पाटील यांनी बांधकाम प्रशासनाला दिला आहे. निंबवली- पालसई हा रस्ता १७ कि.मी.अंतराचा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न, भारती विद्यापीठ प्रशाला ज्युनिअर कॉलेज जव्हार येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तरवारे के.पी.यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या पालखीचे व तुळशीचे पूजन करण्यात आले.यावेळी तरवारे के.पी. यांनी श्री पांडुरंगाच्या आषाढी एकादशीचे महत्त्व वारकरी परंपरेची पार्श्वभूमी,वारीचे महत्त्व,संतांनी जपलेली परंपरा अनेकविध संतांनी समाजाला दिलेली शिकवण,सामाजिक प्रबोधन समजून घेण्यासंदर्भात सविस्तर विवेचन केले.त्यानंतर श्री विठ्ठलाच्या नामस्मरणाचा गजर करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री पांडुरंग व रखुमाई यांची वेशभूषा साकारली व संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत चोखामेळा,संत मुक्ताबाई,संत जनाबाई व वारकरी भक्त मंडळी यांची पारंपारिक वेशभूषा साकारली. भारती विद्यापीठ प्रशाला व…

Read More

वसंत भोईर,वाडा खानिवली येथे मोरीला भगदाड, तालुक्यातील खानिवली-कंचाड मार्गावरील आनंद लक्ष्मण चंदावरकर हायस्कूल जवळ असलेल्या खानिवली येथील मोरीला दोन भगदाड पडले असून हा रहदारीचा मार्ग बंद पडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.आंबिस्ते,पालसई, गौरापूर,देवघर,बोरांडा, घोडमाळ,रावाचा पाडा, आसनस कलंभई,खरीवली, भोपिवली,देवळी,आपटी, तसेच आजूबाजूच्या २५ गाव पाड्यांतील ग्रामस्थांचा दररोज ये-जा करण्याचा एकमेव हा रस्ता आहे.हा मार्ग पुढे कंचाड वरून वाडा- मनोर महामार्गाला जोडला जातो. तेथून तो घोडमाळमार्गे दुर्वेश वरून अहमदाबाद महामार्गाला जोडतो.ही मोरी फार जुनी असुन या मोरीचा पाईप पूर्णपणे फुटला आहे. त्याला सध्या दोन मोठे भगदाडे पडली आहेत.त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता…

Read More