Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, फ्रंटलाईन – संपादकीय लेख, प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक…. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात अनेक निवडणुका पार पडल्या, सत्तेच्या या रणधुमाळीत अनेक पक्ष नव्याने सामील झाले तर अनेक पक्षांची वाताहात झाली. आजच्या घडीला अस्तित्वात असलेल्या पक्षांची संख्या लक्षात घेता,” पायलीला पन्नास, ” असं वर्णन केल्यास ते चुकीचे ठरु नये. प्रादेशिक पक्षाची झालेली वाढ व त्यांना सोबत घेतल्याशिवाय ” सत्तेची पाऊलवाट, ” सापडत नाही,अशी स्थिती सध्या आपल्या देशात निर्माण झाली आहे. सन १९९० च्या दरम्यान प्रादेशिक पक्षांच्या संख्येत वाढ होत गेली.तत्पुर्वी अकाली दल, डीएमके, अण्णाडीएमके,शिवसेना,तेलगू देशम व ईशान्येकडील काही राज्यात प्रादेशिक पक्ष सक्रिय होते. आज ही संख्या दुपट्टीने…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली, इराण व अमेरिका – इस्त्रायल यांच्यामध्ये सध्या युद्धविराम झाला असला तरी या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. इराण हा अमेरिकेच्या तुलनेत अतिशय लहान देश असताना त्यांनी अमेरिका व इस्रायलची दादागिरी झुगारून लावली.” आम्ही मरण पत्करू, पण मान झुकवणार नाही,” अशी भूमिका इराणने घेतली व त्यांचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. इराणने गेल्या काही वर्षात जी काही लष्करी तयारी केली,त्याचा थांगपत्ता त्यांनी अमेरिकेच्या सीआयए व इस्रायलच्या मोसाद या नावाजलेल्या गुप्तहेर संस्थांना लागू दिला नाही.त्यामुळे दोघांचे अतोनात नुकसान झाले.लष्काराच्या वाढीव खर्चासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना आता काँग्रेससमोर जावे लागणार आहे.पण…

Read More

दीपक मोहिते, ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार,कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी घेतलेला हा पवित्रा त्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीमुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशावेळी भाजप,आपले सरकार कसे स्थापन करू शकते ? संविधानातील कलम १६४ आणि ३५६ अंतर्गत कोणते पर्याय उपलब्ध आहेत ? यावर संविधान तज्ञ सध्या अभ्यास करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय झाला असून तृणमूल काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. या पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आम्ही निवडणूक हरलो नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच…

Read More

दीपक मोहिते, कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की नालेसफाई,रेल्वेचे कॅल्व्हर्टस,नैसर्गिक नाले,पावसाळी पाणी खाडीत जाण्यासाठी असलेल्या मार्गातील अडथळे दूर करणे, इ.कामाना महानगरपालिका प्रशासन प्राधान्य देत असते. पण,वसई, नालासोपारा व नवघर – माणिकपूर ही तीन शहरे गेली अनेक वर्षे पाण्यात बुडत असतात. हे दुष्टचक्र गेली अनेक वर्षे तहहयात सुरूच आहे. यंदाही तीच परिस्थिती निर्माण होणार आहे.खाड्या बुजवून जी बांधकामे उभारण्यात आली आहेत,ती या अस्मानी संकटाला आमंत्रण देणारी ठरली आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाली किंवा समुद्राला भरती आली की या उपप्रदेशात हाहाकार उडतो. भरतीचे पाणी व पावसाळी पाणी अडते व संपूर्ण परिसर पाण्यात बुडतो. नायगाव खाडी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महाराष्ट्राला ” जाणता राजा,” नकोय, तर जागता पहारेकरी,” हवा, काल राज्याचा वर्धापनदिन आपण मोठ्या उत्साहात साजरा केला. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आपण आणला. त्यासाठी १०५ हुतात्म्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली व तत्कालीन केंद्र सरकारला लोकभावनेसमोर आपली मान झूकवावी लागली. ज्यानी या राज्याच्या उभारणीसाठी आपले सर्वस्व वेचले, स्वत;च्या संसाराची होळी केली, तो महाराष्ट्र गेल्या सहा दशकाच्या वाटचालीनंतर नेमका कुठे उभा आहे ? याचा शोध घेणे गरजेचे आहे,म्हणून हा लेखप्रपंच… चला बघूया समकालीन समाजधुरीणानी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी किती खस्ता खाल्या. २१ नोव्हे. १९५६ रोजी सकाळी फ्लोरा फाउंटन परिसरात प्रचंड तणावाचे…

Read More

दीपक मोहिते, सोशल मीडिया शाप की वरदान ? देशातील महत्वाच्या निवडणुका गेल्या वर्षभरात पार पडल्या. गेले वर्षभर धडाडणाऱ्या तोफा आता पुढील पुढील निवडणुकापर्यंत आता थंडावल्या आहेत. एकमेकांच्या उखाळ्या – पाखाळ्या ऐकण्यात आपले आपले वर्ष कधी निघून गेले, ते कळले देखील नाही. या निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावरील करामतीमुळे तर मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले. निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडिया, हे आता सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे आणि लोकानी ते मनापासून स्विकारले आहे. पूर्वी पक्षांची मुख्यालये, ही निवडणुक प्रक्रियेतील महत्वाची केंद्रे म्हणून ओळखण्यात येत असत, आता त्याची जागा सोशल मीडियाच्या वॉररुमने घेतली आहे. या वॉररुम आता अत्यंत प्रभावी ठरू लागल्या आहेत. ” होत्याचे नव्हते…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, मिशन लोटस पुन्हा सक्रिय, राजकारणात कोणी कोणाच नसतं, हे नुकत्याच घडलेल्या घडामोडीवरून सिद्ध झाले आहे. गेल्या आठ दशकात भारतीय राजकारणात अनेक स्थित्यंतरे आपण पाहिली. केवळ स्थित्यंतरेच नव्हे तर स्वार्थी राजकारणामुळे कुटुंबेच्या कुटुंबे कशी फुटली हे देखील आपण अनुभवले. त्यामुळे भारतीय राजकारणात आता स्वार्थीपणाला अक्षरशः उत आला आहे. राजकारणात एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी होत आहे, त्याचा जनतेत बोलबाला वाढत चालला आहे, हे दिसायला लागले की त्याचे पंख कापण्याचे षडयंत्र सुरू होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून या प्रक्रियेला वेग आला व आज या प्रक्रियेला राजमान्यता मिळाली आहे. भाजप सत्तेत आल्यापासून त्यांनी अशा आयाराम – गयारामाना चांगलाच राजाश्रय…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, बलाढ्य अमेरिकेला अखेर गुडघे टेकावे लागले … अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला गुडघ्यावर आणणाऱ्या इस्लामिक इराणची जगभरातून प्रशंसा करण्यात येत आहे. मध्यपूर्वेतील आखाती देशावर गेली अनेक स्वतःची दहशत निर्माण करणाऱ्या अमेरिकेला या युद्धात जेरीला आणून इराणच्या राज्यकर्त्यांनी आपला कणखर बाणा दाखवून दिला आहे. इस्त्रायलच्या नादाला लागून ट्रम्प यांनी स्वतःवर नामुष्की ओढवून घेतली आहे. युद्धविराम व्हावा, यासाठी ट्रम्प यांची सध्या केविलवाणी धडपड सुरु असून इराणचे राज्यकर्ते मात्र त्यांना धूप घालत नाहीत. स्वतःला महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेची इभ्रत ट्रम्प यांनी पार धुळीला मिळवली आहे. दुसरीकडे इराण मात्र ही लढाई एकट्याच्या जीवावर लढत आहे. कोणत्याही देशाकडे त्यांनी मदतीसाठी याचना केली नाही व…

Read More

दीपक मोहिते, न्यूजलाईन, इस्रायलच्या वागण्यामुळे युद्धविराम दृष्टिक्षेपात नाही… अमेरिका – इराण दरम्यान झालेले युद्ध आता दोन आठवड्यासाठी थांबले असून या दोन्ही देशाचे प्रतिनिधी आज युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शहरात दाखल होत आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हेन्स, हे आपल्या सहकाऱ्यांसह पाकिस्तानात पोहोचले आहेत, पण इराणच्या प्रतिनिधी मंडळाचे विमान अद्याप तेहरानवरून निघाले नसल्याचे कळते. २ आठवड्याची शस्त्रसंधी झाल्यानंतरही अमेरिकेचा जिगरी दोस्त इस्त्रायलने इराणचा कट्टर समर्थक असलेल्या लॅबेनॉनवर प्रखर बॉम्बहल्ले चढवले. या बॉम्बहल्ल्यात सुमारे अडीचशे ते तीनशे नागरिक मारले गेले. त्यामुळे इराणचा संताप झाला आणि खुली केलेली होर्मुझ सामुद्रधुनी त्यांनी पुन्हा बंद केली. अशा तणावपूर्ण वातावरणात इस्लामाबादमध्ये होत असलेल्या द्विपक्षीय बैठकीत…

Read More

दीपक मोहिते, न्यूजलाईन, पक्षांतरबंदी कायदा ; कायद्यातील परिच्छेद ४ चा पुनर्विचार होणे गरजेचे…. सध्या राजकारणात नैतिकतेची चाड नसलेले अनेक राजकारणी लोक सतत पक्षांतर करत असतात. आमदार, खासदारांच्या पक्षांतरामुळे सरकारचे संख्याबळ खाली येत असते. त्यामुळे गेल्या सात दशकात अनेक सरकारांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याचे आपण पाहिले. अशा अनैतिक घडामोडीमुळे अनेक सरकारांना बऱ्याचदा सत्तांतराला सामोरे जावे लागले. ५२ व्या घटनादुरुस्ती अन्वये इ.स. १९८५ साली भारतात अशा वारंवार होणाऱ्या पक्षांतरांना लगाम घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा तयार करण्यात आला. त्यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरवण्याची तरतूद करण्यात आली. तसेच यासंदर्भात विस्तृत असे १० वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा…

Read More