- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १३ वी राष्ट्रीय वसई – विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा १३ डिसें. २०२६ रोजी होणार,
- पालघर जिल्ह्याला दुष्काळ यादीतून का वगळले ? शेतकऱ्यांचा आक्रोश,
- राज्याच्या धरणातील पाण्याची स्थिती चिंताजनक,
- आपण कुठे निघालो आहोत ?
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांची निवड,
- शिवसेना नांव बाव चिन्हाचा वाद ; न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच,
- संसदेत घटनादुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण ; हट्टीपणामुळे आरक्षणाची लढाई भरकटली,
- सरकारने समंजसपणा दाखवायला हवा ; चर्चेचे दरवाजे त्वरित उघडायला हवेत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, कॉक्रोच आंदोलन ; सर्वोच्च न्यायालयात सरकार पराभूत, कॉक्रोच जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना सरकारने गजाआड केले असले तरी तरुणाचे आंदोलन अद्याप थांबलेले नाही. तुम्ही आमच्यावर कितीही अन्याय करा, पण हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देईपर्यंत चालूच राहणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक काळ चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या कृतीवर कडक ताशेरे ओढले आहेत.त्याला उत्तर देतांना केंद्र सरकारचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. सरकारच्या दडपशाही विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली असता सरन्यायधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या व न्या. व्ही. मोहाना यांच्या खंडपीठाने सरकारच्या कृतीवर नाराजी व्यक्त…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तरुणासोबत वकिलही उतरले रस्त्यावर ; साडेतीन हजार तरुण व १०० वकील अटकेत, देशात दुसऱ्या आणीबाणीची चाहूल लागली असून आज दिल्ली पोलिसांनी माध्यमाच्या प्रतिनिधीना जंतरमंतर वरून हाकलून दिले. पोलिसांची ही कृती नव्या आणीबाणीला आमंत्रण देणारी असल्याचे मानण्यात येत आहे. तरुणांनी जंतरमंतरवर होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामील होऊ नये, यासाठी मोदी सरकार आता साम, दाम दंङ व भेद अशी निती वापरू पाहत आहे.आज सकाळपासून होणाऱ्या या आंदोलनाचे वृत्तसंकलन करण्यासाठी मैदानावर गोळा झालेल्या मीडियाच्या प्रतिनिधीना दिल्ली पोलिसांनी अक्षरशः हाकलून दिले. तर दुसरीकडे आंदोलनस्थळी येणाऱ्या तरुणांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी संविधानाने दिलेले हक्क व अधिकार पायदळी…
दीपक मोहिते, मोदी सरकारची घाबरगुंडी, अभिजित दिपके व त्याचे सहकारी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीच्या धसक्याने मोदी सरकारने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत पोलीसराज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके याला दिल्ली विमानतळावर विमानातून ताब्यात घेतले. तसेच अभिजित दिपके याचे सहकारी सौरव दास, आशुतोष राका व युट्युबर ध्रुव राठी यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. अभिजित दिपके याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस विमानात शिरले असता अभिजित याने संताप व्यक्त करत ” आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे ? इंदिरा गांधी यांनीही असं कधी केले नव्हते. तुमच्या या कारवाईला आम्ही घाबरत नाही.असे पोलिसांना सुनावले.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्याची घसरण सुरु झाली आहे, दुसरीकडे गुजरात अग्रेसर होतोय, राजकीय नेते सार्वजनिक पैश्याची कशी उधळपट्टी करतात, हे दाखवायचे झाल्यास फडणवीस सरकारकडे बोट दाखवता येईल. गैरप्रकार, आर्थिक गैरव्यवहार व दिशाभूल कारभार करणारे फडणवीस सरकार हे यासंदर्भात रोलमॉडेल ठरले आहे. २०१८ – १९ साली राज्यावर ४.०७ लाख कोटीचे कर्ज होते, ते २०२५ – २६ मध्ये ९.७३ लाख कोटीवर गेले. पुढील आर्थिक वर्षात ते ११.०२ लाख कोटी वर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कर्जाच्या व्याजापोटी सरकारला दरवर्षाला ६४ हजार ६५९ कोटी रु. मोजावे लागतात. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सुमारे ९७ हजार ७०६ कोटीच्या मागण्या मांडण्यात आल्या.…
दीपक मोहिते, पाच दशकांचा वनवास संपला ; प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मालकी हक्क, सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणासाठी विस्थापित होऊन पालघर तालुक्यातील हनुमाननगर आणि चंद्रनगर येथे स्थायिक झालेल्या कुटुंबांचा तीन पिढ्यांचा संघर्ष आज संपला. या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांच्या स्वाधीन केली. राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत हनुमाननगर येथे हा कार्यक्रम झाला. धामणी धरणासाठी विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सन १९६८ मध्ये सुरू झाली. सन १९७८ पर्यंत या कुटुंबांचे येथे स्थलांतर करण्यात आले आणि सन १९८२ मध्ये पुनर्वसन पूर्ण झाल्याचे जाहीर झाले. मात्र जमिनीची मोजणी, आखणी आणि अभिलेख अधिकार यांची पूर्तता न झाल्याने…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” आगामी काळ मोदी सरकारला त्रासदायक ठरणारा, २०१४ ते २०२६ या बारा वर्षाच्या वाटचालीत सुरुवातीचा काळ वगळता मोदी सरकारची वाटचाल कठीण अशीच राहिली. २०१४ साली सत्तेत आलेले मोदी सरकार व सध्या २०२६ मध्ये हवालदिल झालेले मोदी सरकार मधील फरक, आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्यासाठी प्रत्यक्षात असलेली आकडेवारी व निर्माण झालेली परिस्थिती, याच्यावर आधारित मूल्यमापन करण्याची गरज आहे. २०१४ साली भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २८२ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. सोबत असलेल्या मित्रपक्षाच्या ५४ जागा अशा एकूण ३३६ जागा जिंकल्या. तब्बल ३० वर्षाने पहिल्यांदाच एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. १९८४ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या…
सुनील अरोरा दिल्ली, ५७ मेट्रो स्थानके बंद,सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त, राजधानी दिल्लीमध्ये उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वी सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोच्या तब्बल ५७ स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे पोलीस यंत्रणा व केंद्र सरकार अडचणीत आले आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानके बंद ठेवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करताना, आंदोलनाचे आयोजक प्रत्यक्षात उपस्थित नसतानाही…
दीपक मोहिते, ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून ग्रामीण आरोग्याला मिळणार नवी दिशा, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्राधान्य देणे आणि लोकसहभागातून निरोगी गावांची निर्मिती करणे, अशा उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव,’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बालविकास ) व्यंकटराव हुंडेकर आणि माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वैदेही माळवी उपस्थित होते. यावेळी सरपंच,…
दीपक मोहिते, वाहने वाढली, पण रस्ते तेवढेच, करदाते भोगताहेत मरणयातना… वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर व डहाणू शहरासह लगत असलेल्या परिसरात गेल्या काही वर्षात प्रचंड नागरिकरण झाले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामध्ये पाणी, आरोग्य,शिक्षण, वाहतूककोंडी व अन्य पायाभुत सुविधाचा अभाव इ. चा समावेश आहे. आज या सर्व शहरामधील वाढती वाहतूककोंडी ही सर्वाधिक त्रासदायक ठरली आहे. रस्त्यामध्ये वाढ झाली नाही, मात्र वाहनाच्या संख्येचा वेलू मात्र गगनावर गेला आहे. भाग १ : शहरनिहाय कोंडीचे हॉटस्पॉट १) वसई,हॉटस्पॉट : वसई फाटा, भुईगाव फाटा, स्टेशन रोड मूळ कारण : मुंबई-अहमदाबाद हायवे ( राष्ट्रीय महामार्ग – ४८ ) वरील जड वाहनांचा शहरात शिरकाव. सकाळी…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” राज्य दुष्काळाच्या छायेत ; केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर, राज्यात पडलेल्या दुष्काळाची तीव्रता तपासण्यासाठी केंद्र सरकारचे केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. ८ ते ११ ऑक्टो. असे एकूण चार दिवस हे केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त जिल्ह्यात फिरून तीव्रता तपासणार आहे. यंदा राज्यात प. महाराष्ट्र, मराठावाडा, विदर्भ या महसूल विभागात दुष्काळ पडला आहे. या विभागात अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, बीड, नागपूर, यवतमाळ,हे जिल्हे व लगत असलेले टंचाईग्रस्त भागाचा ते दौरा करणार आहेत.काल या पथकाने छ. संभाजीनगर जिल्ह्यात शेंद्रा, जालन्यातील नानेगाव – किनगाव – जामखेड, बीडमधील गेवराई – अर्धमसला येथे बांधावर जाऊन पाहणी केली. आज १० ऑक्टो. रोजी…
