Author: दीपक मोहिते

सूर्यातीर- दीपक मोहिते ” शिक्षणाच्या आयचा घो,”. माझ्या या लेखाचे हेडिंग वाचून तुम्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला असेल,साहजिकच आहे.पण आपल्या शिक्षण व्यवस्थेची सध्याची अवस्था लक्षात घेता,माझ्या या लेखासाठी हेच हेडिंग समर्पक असल्याचे वाटले आणि मी ते देवून टाकले. पुढे तुमच्या वाचनात येणाऱ्या या लेखात हे हेडिंग मी का दिले,याचा उलगडा तुम्हा वाचकांना होईल. गेल्या काही वर्षात आपल्या शिक्षण व्यवस्थेने कात टाकली आहे.कालानुरूप प्रत्येक क्षेत्रात बदल होत असतो,हा निसर्गाचा नियम आहे.व तो मानवी जीवनाशी निगडीत आहे.त्याच पार्श्वभूमीवर आपल्या शिक्षण व्यवस्थेतही अमुलाग्र बदल होत गेले.आमच्या काळातील प्रचलित शिक्षण व्यवस्था व सध्याची यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.बालवाडी,बिगरी, ज्युनीयर-सीनियर के.जी,हे सर्व आता भूतकाळात जमा झाले…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीला परिणाम भोगावे लागतील, बदलापूर बलात्कार व मालवण-राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,या दोन घटनांमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत.शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर काल सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा,त्याची निंदा करावी तेवढी थोडीच….या राड्याच्या वेळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक हे दोन अधिकारी अत्यंत बेजबाबदारपणे वागले.महाविकास आघाडीचे नेते मालवण मध्ये येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर काही तरी गडबड होणार,हे लक्षात घेऊन त्यांनी घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवायला हवा होता.तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी जाण्यासाठी दुसरी वेळ द्यायला हवी होती.पण या दोघांनी काहीही न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली.जिल्हाधिकारी तर राडा सुरू झाल्याबरोबर गायब झाले.पोलीस अधीक्षक…

Read More

दीपक मोहिते, पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा काळवंडला.. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र नासवला, आज मालवण-राजकोट येथे घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी खा.विनायक राऊत व जयंत पाटील मालवणात आले असता भाजपच्या समर्थकांनी जो गोंधळ घातला तो अत्यंत लाजिरवाणी असाच होता.यावेळी झालेल्या हाणामारीकडे पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.तर जिल्हाधिकारी अक्षरशः पळून गेले.पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे पाहून आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. विरोधी पक्षाचे नेते पाहणीसाठी आले असता खा.नारायण राणे व माजी खा.निलेश राणे हे दोघेपण त्याठिकाणी आले.त्यांच्या सोबत भाजपचे कार्यकर्तेही दाखल झाले.भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी येऊ का दिले ? असा प्रश्न आता विचारण्यात…

Read More

दीपक मोहिते, महाराष्ट्राचे दुर्देव, आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच ” वाईटातून चांगलं,” निर्माण होणार आहे.. दोन दिवसापूर्वी मालवण-राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे,पण सत्ताधारी मंडळींना त्याचे बिलकुल सोयरसुतक नाही.आता केंद्र सरकारने राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.पुतळ्याची जबाबदारी पार पाडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.तर राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुतळ्याच्या अवशेषांची पाहणी करून या पुतळ्याचे नटबोल्ट गंजलेले आहेत,असा धक्कादायक अहवाल दिला.या राज्यात कधी काहीही घडू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर काय म्हणतात ते पहा..मुख्यमंत्री म्हणाले,या समुद्रिकिनारी ४५…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर-निवडणुक वार्तापत्र -२०२४, १३० पालघर विधानसभा मतदारसंघ अनु.ज. पालघर विधानसभा ; शिवसेना ( उबाठा ) पुन्हा वर्चस्व राखणार, पालघर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघर मतदारसंघावर २००९ चा अपवाद वगळता एकसंघ शिवसेनेचा अभेद्य असा गड होता.मात्र २००९ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र गावित हे मतविभागणीचा फायदा मिळवून विजयी झाले होते.पण त्यानंतर मात्र गावित यांना ही जागा जिंकता आली नाही.२०१४ साली ही जागा शिवसेनेने पुन्हा खेचून घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आ.कृष्णा घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन येथे सेनेतर्फे निवडणूक लढवली व केवळ ५१५ मताधिक्याने ही जागा जिंकली.यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत कृष्णा घोडा यांना ४६ हजार १४२ तर तर राजेंद्र गावित…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर निवडणूक वार्तापत्र २०२४, १३३- वसई विधानसभा मतदारसंघ, वसई विधानसभा निवडणूक ; पुन्हा आ.हितेंद्र ठाकुरच, या मतदारसंघावर गेली तीन दशके आ.हितेंद्र ठाकूर यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.त्यांना पराभूत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विरोधकांनी जंग जंग पछाडले,पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरात अपयश पडले.२००९ ची एकमेव विधानसभा निवडणुक वगळता आ.ठाकूर यांनी १९९० पासून सलग सहा निवडणुका एक हाती जिंकल्या.विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या मताधिक्यात वाढ होत गेली.२००९ साली त्यांनी स्वतः निवडणूक न लढवता आपले विश्वासू सहकारी नारायण मानकर यांना उभे केले होते,पण मानकर याना अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.हा एकमेव अपवाद वगळता १९९०,१९९५,१९९९,२००४,२०१४ व २०१९ या सहा निवडणुका…

Read More

दीपक मोहिते, न्यूजलाईन, शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांत प्रदीर्घ बैठक, शरद पवार व भाजपचे हर्षवर्धन पाटील भेट.या भेटीत नेमकी काय चर्चा? याविषयी प्रश्न विचारत आहे. कमाल घटक यांनी अजित पवार यांना विधान केले आहेत. राखी यांनी नमूद केले आहे की, हर्षवर्धन पाटील मनस्थिती लोकसभा मतदारसंघातून चलबिचल होती. अकस्मात पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यात असलेले खासदार-भोपलेचे नाते लक्षात ठेवलेल्या नेता या व्यक्तीमध्ये बोलल्याच्या तोंडावर दिलजमाईला यश मिळू शकले नाही. उल्लिखित अज पवार यांच्या पत्नी सुनेत्राफे पवार हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रापूर निवडणुकीत बहुमत पीछेहाट गो. गेल्या गेल्या काल अजित पवार यांनी निवडून कसा कसा ? अशी भीमगर्ज करून हर्षवर्धन पाटलांच्या मनात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाविकास आघाडीच्या नेत्यांना अवदसा आठवली, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे अभूतपूर्व यश मिळाले,ते यश त्यांच्या नेत्यांना पचवता येत नसल्याचे आघाडीत चालु झालेल्या कुरबुरीवरून स्पष्ट झाले आहे.आघाडीत सध्या मुख्यमंत्रीपद कोणाला ? यावरून नळावरचे भांडण सुरू झाले आहे.शरद पवार हे एकमेव नेते वगळता इतर घटक पक्षांच्या नेत्यांना आता एकमेकांची ऍलर्जी होऊ लागली आहे.जो तो आम्हीच मोठे,अशा आविर्भावात वावरू लागला आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण/ बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाचेही नाव जाहीर करावे,त्याला माझा पाठींबा राहील,असे जाहीर करून वादाला तोंड फोडले होते.त्यांच्या या…

Read More

दीपक मोहिते, सुर्यातीर,निवडणूक वार्तापत्र, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ- या मतदारसंघावर बविआचेच वर्चस्व राहणार… १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ असून येथे विविध जाती धर्माचे लोक राहतात.सन २००० नंतर या मतदारसंघात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व हे शहर पालघर जिल्ह्यात लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक १ चे शहर बनले.लोकसंख्या वाढीच्या तुलनेत पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.मात्र गेल्या चार ते पाच वर्षात परिस्थितीमध्ये बदल होत गेला.२००९ साली मतदारसंघाच्या फेररचनेत नव्याने या विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली.२००९,२०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विद्यमान आ.क्षितिज ठाकूर यांनी बाजी मारली.त्यांच्या मतांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली.या सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांनी त्यांच्या विरोधात हवा निर्माण केली होती.मात्र…

Read More

दीपक मोहिते, कशासाठी केला आम्ही ” स्वराज्याचा अट्टाहास ? ” तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ओडीशा राज्यात घडलेल्या एका घटनेने देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते.या एका घटनेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या भारतीय संविधानाची राज्यकर्ते व नोकरशाहीने कशी मोडतोड केली आहे,हे आपल्याला पाहायला मिळाले.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करताना समता,सामाजिक बंधुभाव व समान न्याय यांस सर्वोच्च प्राधान्य दिले होते.त्यांच्या त्या दुरदृष्टीला छेद देणारी ती घटना होती.त्या दिवशी ” दाना माझी,” या व्यक्तीला आर्थिक चणचणीमुळे आपल्या पत्नीचा मृतदेह स्वतःच्या खांद्यावर वाहून न्यावा लागला.१२ कि.मी.अंतरावर असलेल्या स्मशानात तो व त्याची दहा वर्षाची मुलगी पायी चालत गेले.त्याच्या पत्नीचे प्रेत…

Read More