- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, आ.हितेंद्र ठाकूर यांच्या निर्णयाकडे जिल्हावासीयांचे लक्ष, गेल्या काही दिवसात वसई-विरार उपप्रदेशात घडलेल्या घडामोडीमुळे आ.हितेंद्र ठाकूर यांच्याविषयी सहानुभूतीच्या त्सुनामीची लाट उसळली आहे.वसईकर जनतेने त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड दबाव आणला आहे.त्यांनी ही निवडणूक लढवावी,हे सांगण्यासाठी दररोज वसई तालुक्यातील नागरिकांचे लोंढेच्या लोंढे विवा महाविद्यालयामधील त्यांच्या कार्यालयावर धडकत आहेत.आ.हितेंद्र ठाकूर,हे जनतेच्या विनंतीला मान देऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात कि वेगळी खेळी करतात,हे येणाऱ्या १५ दिवसात स्पष्ट होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी यापुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.त्यांच्या त्या म्हणण्यावर ते आजही कायम आहेत.पण जिल्ह्याचे राजकारण आता वेगळ्या वळणावर आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी किंबहुना त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या…
दीपक मोहिते, वसई व नालासोपारा ; शरद पवार यांचा कल बविआला पाठिंबा देण्याकडे…. आ.हितेंद्र ठाकूर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांमध्ये नुकताच झालेल्या संवादामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भुवया वर झाल्या आहेत.जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण तयार होण्याच्या शक्यतेमुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये धडकी भरली आहे.आ.हितेंद्र ठाकूर यांनी जिल्ह्यातील सहाही जागा आम्ही लढवत आहोत,अशी घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण आता वेगळ्या वळणावर आले आहे.महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. वसई व नालासोपारा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद नगण्य असल्यामुळे या दोन्ही जागा महाविकास आघाडीने लढवू नये,असा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.याविषयी पवार हे उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, आ.राजेश पाटील चांगले मताधिक्य घेत विजयी होतील, १३१ बोईसर ( अनु.ज.) विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.राजेश पाटील यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.आ.राजेश पाटील यांचा कमी वयात राजकारणात प्रवेश झाला गेल्या तीस वर्षात विविध महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले.त्यांची या काळात झालेली यशस्वी राजकीय वाटचाल पाहून आ.हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत बोईसर विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली.त्यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे विलास तरे यांच्यावर विजय मिळवला. तत्पूर्वी,त्यांनी पंचायत समिती सभापती,जिल्हा परिषद सदस्य,ठाणे मध्य.सह.बँकेचे संचालक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,मजूर संस्थेचे अध्यक्ष अशा विविध महत्वाच्या पदावर काम केले.व्यवसायाने शेतकरी असलेल्या आ.राजेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न…
दीपक मोहिते, उच्च विद्याविभूषित आ.क्षितिज ठाकूर यंदा मताधिक्याचा विक्रम करणार… नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार आ.क्षितिज ठाकूर यांनी चौथ्यांदा बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे.ते उच्च विद्याविभूषित असून त्यांनी २००९ मध्ये राजकारणात प्रवेश केला व आज सलग १५ वर्षे नालासोपाऱ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.यंदाची त्यांची ही चौथी टर्म असून यावेळीही ते नक्कीच बाजी मारतील,यात तिळमात्र शंका नाही.गेल्या निवडणुकीत विरोधकांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता,पण तो फुसका बार निघाला.त्यांच्या सुतळी बॉम्बची वातच पेटली नाही.त्या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर यांनी अगोदरच्या दोन निवडणुकीत घेतलेल्या मताधिक्याहून अधिक मते घेत विजय मिळवला.केवळ विरोधाला विरोध करून यश मिळत नसते,तर जनाधार असायला हवा असतो,हे त्यांनी दाखवून दिले.पण…
दीपक मोहिते, रणनिती, पालघर जिल्ह्याच्या राजकारणात लवकरच ट्विस्ट, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ.हितेंद्र ठाकूर हे लवकरच धक्कादायक खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत.पालघर जिल्ह्यातील राजकारणावर असलेली त्यांची पकड लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे वरिष्ठ नेते,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बाळासाहेब थोरात,हे त्यांच्या संपर्कात आहेत.पण आ.हितेंद्र ठाकूर हे सध्या ” वेट अँड वॉच,” च्या भूमिकेत आहेत.भाजप,जिल्ह्याच्या राजकारणात कशी खेळी करते,याकडे त्यांचे लक्ष आहे.आ.ठाकूर यांच्या पक्षाने दोन वर्षांपूर्वी महायुती सरकारला सहयोगी पक्ष म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला आहे.महायुतीला सरकार बनवताना आमदारांची गरज असताना आ.ठाकूर यांनी हा पाठिंबा देऊ केला होता.त्यामुळे भाजप वसई,नालासोपारा व बोईसर या तीन जागांबाबत काय निर्णय घेते,याकडे…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत, पालघर जिल्ह्यात शह-काटशहच्या राजकारणाला प्रचंड उधाण आले आहे.कोण कोणासोबत आहे,या विषयावर सतत चर्चा रंगू लागली आहे.पण कोणताही निर्णय दृष्टीक्षेपात येत नसल्यामुळे अनेक राजकीय नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते आता संभ्रमावस्थेत सापडले आहेत.दररोज वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यामुळे प्रत्येक जण सध्या आपण काय करायचे ? अशा विवंचनेत सापडला आहे. समाजमाध्यमे मात्र या परिस्थितीचा फायदा घेत आग लावण्याचे काम करत आहेत.मुलाखती घेण्याच्या नावाखाली अनेक पत्रकार या सर्व घडामोडींना हवा देत आहेत.त्यामुळे समज व गैरसमज वाढू लागले आहेत.या सर्व घडामोडीबाबत आ.हितेंद्र ठाकूर व माजी महापौर राजीव पाटील हे दोघेही चकार शब्द बोलायला तयार नाहीत.मात्र त्यांच्या कार्यकर्त्यानी…
दीपक मोहिते, या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेत विजयी होणार… विधानसभा निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजले आहे.निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे.निवडणूक प्रक्रिया संपली की रीतसर प्रचाराला सुरुवात होणार आहे.लवकरच उमेदवारांची नांवे जाहीर होतील.त्यानंतर उमेदवाराची लगबग सुरु होणार आहे.जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेण्यासाठी उमेदवार विविध हातखंडे वापरतील. या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर हे पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.त्यांच्या दिमतीला असलेली तरुणांची फौज निवडणुकीच्या प्रचारात स्वतःला झोकून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी ही तरुणांची फौज नालासोपारा मतदारसंघाच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक मतदाराला व्यक्तीश: भेटण्याचा सपाटा लावतील.या मतदारसंघात इतर मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक मतदार आहेत.सुमारे ५ लाख ९६ हजार ९९५ मतदार या निवडणुकीत आपल्या…
दीपक मोहिते, वसईकरांचे प्रेम हीच माझ्या विजयाची पोचपावती,” करून दाखवले व करतच राहणार,” आ.हितेंद्र ठाकूर आणि वसईचे मतदार,यामध्ये वर्षानुवर्षं असलेले ऋणानुबंध,आजवर कधीही तुटू शकले नाही व आणखी २५ वर्षे तुटूही शकणार नाही.ही नाळ इतकी घट्ट आहे की भल्याभल्यानी त्यांच्यासमोर हात टेकले.यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.वसईच्या जनतेने प्रत्येकवेळी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात भरभरून माप टाकले तर आ.ठाकुरानीही मतदारसंघात भरीव विकासकामे करून त्याची उतराई केली.आज वसई शहर नावारूपाला आलं आहे,ते केवळ आ.ठाकूर यांच्या अथक प्रयत्नामुळेच..हे वास्तव विरोधकही खाजगीत मान्य करत असतात.लोकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम व आ.ठाकूर यांच्यामध्ये असलेली असलेली कर्तव्य भावना,याचा सुरेख संगम,या मतदारसंघात पाहायला मिळतो.मुलांसाठी उद्याने,क्रीडांगणे, युवकांसाठी तरणतलाव,ज्येष्ठ नागरिकासाठी बैठक निवारा,रुंद…
दीपक मोहिते, सहा विधानसभा मतदारसंघात २२ लाख ६२ हजार ९६१ मतदार, पालघर जिल्ह्यातील आगामी ६ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २२ लाख ६२ हजार ९६१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.एकूण मतदारांपैकी ११ लाख ७५ हजार ६२७ पुरुष तर १० लाख ८७ हजार १०७ महिला मतदार आहेत.तसेच २२७ तृतीय पंथीय मतदार या निवडणुकीत आपल्या मतांचा वापर करतील. १२८ डहाणू विधानसभा हा अनु.ज.साठी आरक्षित आहे.येथे २ लाख ९८ हजार ५६१ मतदार आहेत.पुरुष-१ लाख ४८ हजार ५३७,महिला-१ लाख ४९ हजार ९९० तृतीय पंथीय-३४, १२९ विक्रमगड- एकूण ३ लाख १३ हजार ६१३,पुरुष-१ लाख ५६ हजार ४९४,महिला-१ लाख ५७ हजार ११८,तृतीय पंथीय-०१, १३० पालघर-एकूण २ लाख…
दीपक मोहिते, ” डावपेच,” सहाही जागा लढवण्याचा बविआचा निर्णय ; आ.ठाकुरांची धूर्त राजकीय खेळी, बविआने पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका लढवण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.त्यांच्या या धूर्त राजकीय खेळीमुळे महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी त्यांनी घेतलेली मते,ही दुर्लक्षित करता येणार नाहीत.डहाणू विधानसभेचे आ.कॉम्रेड विनोद निकोले व विक्रमगडचे आ.सुनील भुसारा हे दोघेही आ.ठाकूर यांचे जिवलग मित्र,त्यामुळे त्यांच्यासमोर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यामागे आ.ठाकूर यांची निश्चित राजकीय खेळी आहे.मात्र त्यांच्या या खेळीमुळे राजकीय पक्ष मात्र दबावाखाली येणार आहेत.त्यांच्या या खेळीचा फटका…
