दीपक मोहिते,
वसईकरांचे प्रेम हीच माझ्या विजयाची पोचपावती,” करून दाखवले व करतच राहणार,”
आ.हितेंद्र ठाकूर आणि वसईचे मतदार,यामध्ये वर्षानुवर्षं असलेले ऋणानुबंध,आजवर कधीही तुटू शकले नाही व आणखी २५ वर्षे तुटूही शकणार नाही.ही नाळ इतकी घट्ट आहे की भल्याभल्यानी त्यांच्यासमोर हात टेकले.यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.वसईच्या जनतेने प्रत्येकवेळी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात भरभरून माप टाकले तर आ.ठाकुरानीही मतदारसंघात भरीव विकासकामे करून त्याची उतराई केली.आज वसई शहर नावारूपाला आलं आहे,ते केवळ आ.ठाकूर यांच्या अथक प्रयत्नामुळेच..हे वास्तव विरोधकही खाजगीत मान्य करत असतात.लोकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम व आ.ठाकूर यांच्यामध्ये असलेली असलेली कर्तव्य भावना,याचा सुरेख संगम,या मतदारसंघात पाहायला मिळतो.मुलांसाठी उद्याने,क्रीडांगणे,
युवकांसाठी तरणतलाव,ज्येष्ठ नागरिकासाठी बैठक निवारा,रुंद रस्ते,परिवहन सेवा,विद्यार्थ्यासाठी मोफत बससेवा,अद्ययावत मार्केट इ.विकासकामे मार्गी लावण्यात ते यशस्वी ठरले,अशी स्थिती असतानाही विरोधक मात्र आजवर विरोधाला विरोध करत आले.पण आ.ठाकूर यांनी त्यांच्या दिशाहीन व परिसर विकासाला खीळ बसणाऱ्या टीकेला कधीही उत्तर दिले नाही.संयम,समंजसपणा,लोकांचा विश्वास व स्वतःचे कर्तृत्व,या बळावर त्यांनी लोकांची मने जिंकली.सहावेळा त्यांनी विधानसभा जिंकली,तर त्याचे चिरंजीव आ.क्षितिज यांनीही सलग तीन वेळा नालासोपारा विधानसभा जिंकून इतिहास निर्माण केला आहे.आज हे पितापुत्र,”आम्ही करून दाखवले,” असे अभिमानाने बोलू शकतात.कारण या उपप्रदेशाला नावारूपाला आणण्यात त्यांच्या ठाकूर कुटुंबाचे भरीव योगदान आहे.आ.ठाकूर यांनी गेल्या तीन दशकाच्या आपल्या राजकीय वाटचालीत अनेक शिखरे पादांक्रांत केली.त्यांच्या या यशात त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे.सहकार,बँकिंग कृषी,महानगरपालिका,
जिल्हा परिषद,पंचायत समिती,
मजूरसंस्था,शेतकरी सेवा संस्था,आज सारं काही त्यांच्या ताब्यात आहे.जिल्ह्यात एकूण सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघावर त्यांचे गेल्या पंधरा वर्षापासून निर्विवाद वर्चस्व आहे.ते यंदाही कायम राहणार आहे.आव्हाने व संकटांना यशस्वीपणे तोंड देणे,हा त्यांचा स्थायी स्वभाव,कोणताही आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे आपल्या कामातून ते विरोधकांना चारीमुंड्या चित करतात.गेल्या २० वर्षात वसई,विरार व नालासोपारा या तीन महानगरात लोकसंख्या वाढीला प्रचंड वेग आला. वाढत्या लोकसंख्येच्या या शहराना सरकारकडून विकासकामासाठी भरीव आर्थिक निधी मिळावा,अशी अपेक्षा असते.परंतु सत्तेत आलेले प्रत्येक सरकार,अशा कामी राजकारण करत आले,त्याचा फटका काही प्रमाणात विकासकामाना बसला.आजही तशीच परिस्थिती पाहायला मिळते.परंतु आ.ठाकूर अशा कठीण प्रसंगातून नेहमीच मार्ग काढत असतात.त्यामुळे परिसरातील विकासकामे कधीही खोळंबून राहिली नाहीत.सर्वसामान्य नागरिक,उद्योजक,व्यापारी कष्टकरी,छोटे व्यवसायिक,महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिक,हे सतत आ.ठाकूर यांच्या पाठीशी उभे राहत असल्यामुळे विरोधात लढणारे उमेदवार त्यांच्या आसपासही फिरू शकले नाहीत.त्यामुळे यंदा आ.हितेंद्र ठाकूर सातव्यांदा तर आ.क्षितिज ठाकूर, तिसऱ्यांदा बाजी मारण्याच्या तयारीत आहेत.या निवडणुकीत राज्यात विक्रमी मतदान घेऊन विजयी होणारे उमेदवार म्हणून त्यांची इतिहासात नोंद होणार आहे.विधानसभा निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.त्यांची यंत्रणा सक्रिय झाली असून त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे.या निवडणुकीत वसई व नालासोपारा जनतेचा नेहमीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे.येणाऱ्या दिवसात तो उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे.ते प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून आपल्या भाषणात ” विजय माझाच आहे,पण तो किती प्रचंड मताधिक्याने होतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सतत लोकांमध्ये राहून त्यांची केलेली कामे,मला नेहमीच विजयस्तंभाकडे घेऊन जात असतात,असे सांगत असतात.

