दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
आ.राजेश पाटील चांगले मताधिक्य घेत विजयी होतील,
१३१ बोईसर ( अनु.ज.) विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.राजेश पाटील यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.आ.राजेश पाटील यांचा कमी वयात राजकारणात प्रवेश झाला गेल्या तीस वर्षात विविध महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले.त्यांची या काळात झालेली यशस्वी राजकीय वाटचाल पाहून आ.हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत बोईसर विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली.त्यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे विलास तरे यांच्यावर विजय मिळवला.
तत्पूर्वी,त्यांनी पंचायत समिती सभापती,जिल्हा परिषद सदस्य,ठाणे मध्य.सह.बँकेचे संचालक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,मजूर संस्थेचे अध्यक्ष अशा विविध महत्वाच्या पदावर काम केले.व्यवसायाने शेतकरी असलेल्या आ.राजेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.कृषी व सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे प्रशंसनीय ठरले.त्यांना आपल्या आजोबाकडून समाजकारण व राजकारणाचे बाळकडू मिळाले.ऐन तारुण्यात ते आ.हितेंद्र ठाकुर यांचे बोट धरून राजकारणात सक्रिय झाले.काम करण्याची क्षमता,प्रचंड इच्छाशक्ती व अभ्यासू वृत्ती लक्षात घेऊन आ.हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत बोईसरहुन उमेदवारी दिली.त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत त्यांनी आ.विलास तरे यांना धूळ चारली.गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेली विकासकामे व लोकांशी असलेला जनसंपर्क,अशा दोन कारणामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवधी असतानाही त्यांनी कालपासून प्रचाराला प्रारंभ केला आहे.ते या निवडणुकीत १०० % विजय मिळवतील,असा दावा त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

