दीपक मोहिते,
या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेत विजयी होणार…
विधानसभा निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजले आहे.निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे.निवडणूक प्रक्रिया संपली की रीतसर प्रचाराला सुरुवात होणार आहे.लवकरच उमेदवारांची नांवे जाहीर होतील.त्यानंतर उमेदवाराची लगबग सुरु होणार आहे.जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेण्यासाठी उमेदवार विविध हातखंडे वापरतील.
या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर हे पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.त्यांच्या दिमतीला असलेली तरुणांची फौज निवडणुकीच्या प्रचारात स्वतःला झोकून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी ही तरुणांची फौज नालासोपारा मतदारसंघाच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक मतदाराला व्यक्तीश: भेटण्याचा सपाटा लावतील.या मतदारसंघात इतर मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक मतदार आहेत.सुमारे ५ लाख ९६ हजार ९९५ मतदार या निवडणुकीत आपल्या मताचा हक्क बजावणार आहेत.यावेळी प्रत्येकाच्या तोंडी एकच नांव आहे,ते म्हणजे ” बिट्टू दादा,”
या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर सलग चौथ्यांदा बाजी मारतील.रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेत आ.क्षितिज ठाकूर विजयी होतील,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.मताधिक्यात होणारी वाढ,ही लक्षवेधी ठरणार असून त्याची इतिहासात नोंद होणार आहे.विरोधात कोणीही उमेदवार असो,पण आ.क्षितिज ठाकूर त्यांना धोबीपछाड देणार,हे मात्र नक्की आहे.यामातीत जन्माला आलेल्या त्यांच्यासारख्या युवा व होतकरू आमदारांकडून नालासोपारावासीयांकडून खूप अपेक्षा आहेत.गेली पंधरा वर्षे सार्वजनिक जीवनात वावरताना लोकप्रतिनीधी म्हणून त्यांनी केलेली विकासकामे,प्रशंसनीय अशी आहेत.त्यामुळे यंदाही ते हमखास चौथ्यांदा विजयस्तंभ गाठतील.कार्यकर्त्यांचा ओसंडून जाणारा उत्साह व नालासोपारावासीयांचे उदंड प्रेम,या शिदोरीवर ते या निवडणुकीत चमकदार कामगिरी करण्याच्या तयारीत आहेत.प्रसिद्धी माध्यमाच्या अनेक प्रतिनिधींनी त्यांना यंदाच्या निवडणुकीविषयी विचारले असता ते म्हणाले,गेल्या निवडणुकीतील मताधिक्याचा विक्रम मी यंदा मोडणार आहे.लोकांचे प्रेम व मिळणारा प्रतिसाद,मला विजयस्तंभाकडे नेणारा असून,हा विजय पुढील ५ वर्षे पुन्हा सेवा करण्यासाठी मला ऊर्जा देणारा ठरेल.प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात मतदारांच्या भेटीगाठी घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान व माझ्याकडून अधिकाधिक विकासकामे व्हावीत,अशी व्यक्त होणारी अपेक्षा,ही माझ्या विजयाची पोचपावती आहे आणि त्यासाठी मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची परकाष्ठा करीन,एवढेच मी या निमित्ताने सांगेन,असे त्यांनी स्पष्ट यावेळी स्पष्ट केले.

