दीपक मोहिते,
उच्च विद्याविभूषित आ.क्षितिज ठाकूर यंदा मताधिक्याचा विक्रम करणार…
नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार आ.क्षितिज ठाकूर यांनी चौथ्यांदा बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे.ते उच्च विद्याविभूषित असून त्यांनी २००९ मध्ये राजकारणात प्रवेश केला व आज सलग १५ वर्षे नालासोपाऱ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.यंदाची त्यांची ही चौथी टर्म असून यावेळीही ते नक्कीच बाजी मारतील,यात तिळमात्र शंका नाही.गेल्या निवडणुकीत विरोधकांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता,पण तो फुसका बार निघाला.त्यांच्या सुतळी बॉम्बची वातच पेटली नाही.त्या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर यांनी अगोदरच्या दोन निवडणुकीत घेतलेल्या मताधिक्याहून अधिक मते घेत विजय मिळवला.केवळ विरोधाला विरोध करून यश मिळत नसते,तर जनाधार असायला हवा असतो,हे त्यांनी दाखवून दिले.पण दुर्देवाने विरोधकाना हे शहाणपण गेली तीस वर्षे सुचले नाही.यंदाच्या निवडणुकीतही त्यांना ते सुचणार नाही.त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्यासमोर कोणी जरी निवडणूक लढवली तरी त्याची डाळ शिजू शकणार नाही.
आ.क्षितिज ठाकूर हे राजकारणातील उच्चशिक्षित असा चेहरा असून त्यांचा शिक्षणाचा चढता आलेख,पाहता जिल्ह्यात गेल्या ५० वर्षात एकही लोकप्रतिनिधी अशाप्रकारचे उच्च शिक्षण घेऊ शकला नाही.
विरार आगाशी येथील जॉन XX111 या शाळेतून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ साली त्यांनी अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेस रवाना झाले.तेथे त्यानी बाल्डविन वॅलेस युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग शाखेची मास्टर्स ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन,ही पदवी मिळवली.या यशानंतर ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून रियल इस्टेट मॅनेजमेंट व प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्रॅम,या दोन शाखेचे पदवीधर झाले.स्टँनफोर्ड,अमेरिका व स्पेनच्या आयइएसइ बिझनेस स्कुल या शैक्षणिक संस्थेमध्ये पुढील शिक्षण घेतले.
अशा हा उच्च विद्याविभूषित युवा आमदाराने,गेल्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.आता हा युवा आमदार चौथ्यांदा बाजी मारण्याच्या तयारीत आहे.यावेळी मताधिक्याचा विक्रम करण्यात यशस्वी होईल,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.अगदी लहान वयात आमदार होणारा तसेच विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून समाजकारण करणारा हा युवा आमदार आता पुन्हा सज्ज झाला आहे.

