Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, वसई शिवसेनेचे ( उबाठा ) पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देणार, महाविकास आघाडीच्या जागावाटपात १३३ वसई विधानसभा मतदारासंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे.मात्र ही जागा शिवसेनेला ( उबाठा ) देण्यात यावी,अन्यथा वसई तालुक्यातील शिवसेनेचे तमाम पदाधिकारी व शिवसैनिक आपल्या पदाचे राजीनामे देतील,असा इशारा देण्यात आला आहे.आज वसई शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांची स्वाक्षरी असलेले पत्रक वायरल झाले आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वसई तालुका शिवसेनेच्या ( उबाठा ) पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत १३३ वसई विधानसभा ही गेली २४ वर्षे लढवत शिवसेना लढवत आली.या मतदारसंघात शिवसेनेला चांगला जनाधार असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारती कामडी यांनी ६६…

Read More

दिपक मोहिते, धुरळा खाली बसला,पदाधिकारी कार्यकर्ते व पीआर कंपन्या कामाला लागले, अफवांचे पीक निवळले व समज-गैरसमजाचा धुरळा खाली बसल्यानंतर बविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते आता एकीने व एकदिलाने कामाला लागले आहेत.तिन्ही मतदारसंघात बविआच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.सर्वत्र बैठकांचा सिलसिला जोरात सुरू झाला आहे. या तिन्ही विधानसभा जागांवर बविआसमोर फार मोठे आव्हान नसले तरी वरिष्ठ नेते कार्यकर्त्याना गाफिल न राहता,मतदारांशी सतत संपर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.लढतीचे चित्र स्पष्ट झाले कि प्रचाराचे धुमशान सुरू होणार आहे.प्रचारासाठी यावेळी सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे.अनेक पक्षांनी प्रचारासाठी मुंबईतील पीआर कंपन्यांना कंत्राटे दिली आहेत.या कंपन्या आचारसंहिता व निवडणूक आयोगाची करडी नजर सांभाळून उमेदवाराच्या प्रचाराची…

Read More

दिपक मोहिते, परतीच्या पावसाचा प्रताप,शेतकरी भितीच्या सावटाखाली, गेल्या चार दिवसांपासून दररोज संध्याकाळी होत असलेल्या परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक जिल्ह्यातील भातउत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.भातपिकाची अतोनात हानी झाली असून या हानीची सरकारने अद्याप दखल न घेतल्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्यामुळे शेतकरी खूप आनंदात होते,तसेच पावसाने प्रारंभी दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची प्राथमिक कामे जलदगतीने उरकली.नंतरच्या काळातही शेतीला आवश्यक असलेला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.नांगरणी,पेरणी, आवणी,लावणी इ.कामे वेळेवर करणे,शक्य झाले.मात्र भाताची रोपे तयार झाल्यानंतर ” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार परतीच्या पावसाने कोकण विभागातील जिल्ह्यांना जबर फटका देण्यास सुरुवात केली.गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये घमासान, जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये सध्या घमासान सुरू झाले आहे.दोघांचे वरिष्ठ नेते सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत असले तरी दोघांच्या घराच्या चिमणीतून धूर बाहेर पडू लागला आहे.महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले व संजय राऊत या दोघांमध्ये दररोज कलगीतुरा रंगत आहे.नाना पटोले याना आवर घालण्यासाठी राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे या दोघांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांना मुंबईत पाचारण केले आहे.त्यांनी मुंबईत आल्या आल्या मातोश्रीवर जाऊन सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली व तोडगा दृष्टीक्षेपात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही ” रबर तुटेपर्यंत ताणू नका,” असे स्पष्ट करत…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर मुबलक पाऊस होऊनही अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती… राज्यात यंदा पाऊस मुबलक प्रमाणात झाला असून पिण्याचे,शेतीसिंचन व उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे पाणी,किमान ७ महिने पुरेल इतका जलसाठा राज्यात आहे.काही ठराविक जिल्ह्यात ” नेमेची येतो पावसाळा,” या म्हणीनुसार दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल,अशी शक्यता आहे.आपले सारे जीवन हे पावसाळी पाणी व भूगर्भातील जलसाठा,यावर अवलंबून आहे.पावसाचे प्रमाण सतत कमी होणे व भूगर्भातील पाण्याची पातळीमध्ये सतत होणारी घसरण,इ.कारणांमुळे जगभरातील अनेक देश सध्या चिंतेत सापडले आहेत.येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न अक्राळ विक्राळ रूप धारण करेल व परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल. पर्यावरण संतुलन जपण्याकडे जगातील सर्वच देशांनी दुर्लक्ष केल्यामुळे येत्या २५ वर्षात जगावर…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, आ.राजेश पाटील ; ” आपला हक्काचा माणूस,” अशी ओळख,दुसऱ्यांदा बाजी मारणार…. बोईसरचे आ.राजेश पाटील यांना बविआचे सर्वोच्च नेते आ.हितेंद्र ठाकूर यांनी सलग दुसऱ्यांदा संधी दिली आहे.राजेश पाटील हे मिळालेल्या या संधीचे नक्की सोने करतील,अशी अपेक्षा दस्तुरखुद्द बोईसरवासीय व्यक्त करत आहेत. या आठवड्यात त्यांच्याविषयी उठलेल्या अफवाबाबत त्यांनी सविस्तरपणे खुलासा केल्यामुळे त्यांच्याविषयी पसरलेल्या अफवांना ब्रेक बसला.या सर्व घडामोडीनंतर गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.गेल्या पाच वर्षात ग्रामीण व शहरी भागात त्यांनी केलेली विकासकामे व विकासकामासाठी आणलेला आर्थिक निधी याचा लेखाजोगा ते या बैठकांमध्ये मांडत आहेत.लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघातील…

Read More

दीपक मोहिते, नालासोपारा येथे बविआ कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले, बहुजन विकास आघाडीच्या नालासोपारा विभागाने काल बहुजन विकास आघाडीचे मुख्य कार्यालय असलेल्या भवन येथे कार्यकर्त्यांची सभा पार पडली.या सभेस वरिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.सदर सभेत आ.क्षितिज ठाकूर व अन्य नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. यावेळी प्रत्येक वक्त्याने गेल्या पाच वर्षात आपण केलेली विकासकामे तसेच राबवण्यात आलेल्या योजनांची सविस्तर माहिती मतदारापर्यंत पोहोचवा,असे आवाहन केले.विरोधी पक्ष काय करतो,यापेक्षा आपण आजवर केलेली लोकांची कामे,यावर आपल्या उमेदवाराच्या प्रचाराचा भर असायला हवा,असे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.तर ” क्षितिज संवाद,” कार्यक्रमाला नालासोपारावासींकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद ही खऱ्या अर्थाने आपल्या कामाची पोचपावती आहे.या कार्यक्रमात आलेल्या…

Read More

दीपक मोहिते, नालासोपाऱ्याचे बविआ कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले, बहुजन विकास आघाडीच्या नालासोपारा विभागाने काल बहुजन विकास आघाडीचे मुख्य कार्यालय असलेल्या भवन येथे कार्यकर्त्यांची सभा पार पडली.या सभेस वरिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.सदर सभेत आ.क्षितिज ठाकूर व अन्य नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. यावेळी प्रत्येक वक्त्याने गेल्या पाच वर्षात आपण केलेली विकासकामे तसेच राबवण्यात आलेल्या योजनांची सविस्तर माहिती मतदारापर्यंत पोहोचवा,असे आवाहन केले.विरोधी पक्ष काय करतो,यापेक्षा आपण आजवर केलेली लोकांची कामे,यावर आपल्या उमेदवाराच्या प्रचाराचा भर असायला हवा,असे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.तर ” क्षितिज संवाद,” कार्यक्रमाला नालासोपारावासींकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद ही खऱ्या अर्थाने आपल्या कामाची पोचपावती आहे.या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांच्या…

Read More

दीपक मोहिते, बहुजन विकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज,प्रचाराची धामधूम सुरू, आ.हितेंद्र ठाकूर, आ.क्षितिज व आ.राजेश पाटील यांनी कालपासून प्रचारास सुरुवात केली आहे.पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे.या बैठकीत हे तिघेही कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेत आहेत.लवकरच प्रचार,मतदान,मतमोजणी इ.महत्वाच्या कामासंदर्भात कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.तसेच महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यासंदर्भात अद्ययावत यादी तयार करण्यात येत आहे.ही सर्व तयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल,या निवडणुकीत चौकसभा,गावागावात जाहीर सभा,शहरी भागात बाईक रॅली,एलईडीच्या माध्यमातून विकासकामांची चलचित्रांचे मतदारांना दर्शन व प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचंड जाहीर सभा व रोड शो करण्यात येणार आहेत. बहुजन विकास आघाडीचा प्रचार हा प्रामुख्याने केलेल्या विकासकामांवर होणार आहे.त्यासाठी पुस्तिका देखील तयार…

Read More

दीपक मोहिते, अखेर वादळ शमलं,कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.. गेल्या आठ दिवसांपासून वसई तालुक्यात निर्माण झालेले चहाच्या पेल्यातील वादळ अखेर वसईच्या समुद्रकिनारी न आदळता थेट कुठेतरी भरकटले गेले.या काळात हवेच्या दाबाचा पट्टा वाढल्याचे जाणवत असताना या वादळाची तीव्रता काल संध्याकाळी अचानक कमी झाली व ते हवेतल्या हवेत विरले. वसई-विरारचे माजी महापौर व प्रसिद्ध उद्योजक राजीव पाटील,हे भाजपमधून विधानसभेची निवडणूक लढवणार,अशा प्रकारचे वादळ उठले होते.सलग आठ दिवस हे वादळ घोंगावत राहिले.मात्र ते रौद्र स्वरूप धारण करेल,असे वाटत असताना ते अचानक शमले.या सर्व घडामोडी दरम्यान राजीव पाटील व आ.हितेंद्र ठाकूर यांनी कायम मौन धारण केले होते.पण काही उत्साही कार्यकर्त्यानी बॅनर्सवरून नेत्यांचे फोटो हटवल्यामुळे…

Read More