दीपक मोहिते,
बहुजन विकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज,प्रचाराची धामधूम सुरू,
आ.हितेंद्र ठाकूर, आ.क्षितिज व आ.राजेश पाटील यांनी कालपासून प्रचारास सुरुवात केली आहे.पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे.या बैठकीत हे तिघेही कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेत आहेत.लवकरच प्रचार,मतदान,मतमोजणी इ.महत्वाच्या कामासंदर्भात कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.तसेच महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यासंदर्भात अद्ययावत यादी तयार करण्यात येत आहे.ही सर्व तयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल,या निवडणुकीत चौकसभा,गावागावात जाहीर सभा,शहरी भागात बाईक रॅली,एलईडीच्या माध्यमातून विकासकामांची चलचित्रांचे मतदारांना दर्शन व प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचंड जाहीर सभा व रोड शो करण्यात येणार आहेत.
बहुजन विकास आघाडीचा प्रचार हा प्रामुख्याने केलेल्या विकासकामांवर होणार आहे.त्यासाठी पुस्तिका देखील तयार करण्यात येणार आहे.पाणी,आरोग्य,
शिक्षण,वैद्यकीय सेवा,पायाभूत सोयी-सुविधा,रस्ते-गटारे,
तलाव सुशोभीकरण,उद्याने,
समाजमंदिरे इ.विकासकामाचा त्यामध्ये समावेश आहे.तसेच वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे महिला,विद्यार्थी,दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटाला अर्थसहाय्य,महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी विविध साहित्य उपलब्ध करणे,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे,इ.योजना राबवण्यात आल्या.त्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे.याकामी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत.

