दीपक मोहिते,
नालासोपाऱ्याचे बविआ कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले,
बहुजन विकास आघाडीच्या नालासोपारा विभागाने काल बहुजन विकास आघाडीचे मुख्य कार्यालय असलेल्या भवन येथे कार्यकर्त्यांची सभा पार पडली.या सभेस वरिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.सदर सभेत आ.क्षितिज ठाकूर व अन्य नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
यावेळी प्रत्येक वक्त्याने गेल्या पाच वर्षात आपण केलेली विकासकामे तसेच राबवण्यात आलेल्या योजनांची सविस्तर माहिती मतदारापर्यंत पोहोचवा,असे आवाहन केले.विरोधी पक्ष काय करतो,यापेक्षा आपण आजवर केलेली लोकांची कामे,यावर आपल्या उमेदवाराच्या प्रचाराचा भर असायला हवा,असे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.तर ” क्षितिज संवाद,” कार्यक्रमाला नालासोपारावासींकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद ही खऱ्या अर्थाने आपल्या कामाची पोचपावती आहे.या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांच्या आलेल्या तक्रारीचा जलदगतीने होत असल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.निवडणुकीनंतरही हा उपक्रम सुरूच राहावा,असे अनेक महिला कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.आ.क्षितिज ठाकूर यांनीही या उपक्रमाला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहता,हा उपक्रम आपण निवडणुकीनंतरही करणार असल्याचे सांगितले.या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने व एकदिलाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

