दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
आ.राजेश पाटील ; ” आपला हक्काचा माणूस,” अशी ओळख,दुसऱ्यांदा बाजी मारणार….
बोईसरचे आ.राजेश पाटील यांना बविआचे सर्वोच्च नेते आ.हितेंद्र ठाकूर यांनी सलग दुसऱ्यांदा संधी दिली आहे.राजेश पाटील हे मिळालेल्या या संधीचे नक्की सोने करतील,अशी अपेक्षा दस्तुरखुद्द बोईसरवासीय व्यक्त करत आहेत.
या आठवड्यात त्यांच्याविषयी उठलेल्या अफवाबाबत त्यांनी सविस्तरपणे खुलासा केल्यामुळे त्यांच्याविषयी पसरलेल्या अफवांना ब्रेक बसला.या सर्व घडामोडीनंतर गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.गेल्या पाच वर्षात ग्रामीण व शहरी भागात त्यांनी केलेली विकासकामे व विकासकामासाठी आणलेला आर्थिक निधी याचा लेखाजोगा ते या बैठकांमध्ये मांडत आहेत.लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघातील ग्रामीण भाग अक्षरशःपिंजून काढला.एकही खेडे व गावपाडे नसतील,ज्याला त्यांनी भेट दिली नाही.पाच वर्षांपूर्वी अनेक गावपाड्यावर चालायला धड पायवाटा नव्हत्या,आज तेथे रस्ते तयार करण्यात ते यशस्वी झाले.गावागावात एसटी सेवा सुरू करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.त्यामुळे महिला,विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिलासा मिळू शकला.यापूर्वी गावपाड्यातील जनतेला आपला आमदार कोण ? याची माहिती नसायची,पण आ.राजेश पाटील हे गेल्या पाच वर्षात पायाला भिंगरी लावून फिरले.त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांमध्ये त्यांची ओळख,” आपल्या हक्काचा माणूस,” अशी झाली आहे.हीच ओळख त्यांना सलग दुसऱ्यांदा विजयस्तंभाकडे नेणारी ठरणार आहे.

