- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- कर्जमाफीने शेतकरी कर्जमुक्त होत नाही तर तो अधिक कर्जबाजारी होत असतो,
- ” होय, मी व्हेंटिलेटरवर असलेल्या महानगरपालिकेचा सन्माननिय नागरिक आहे, “…
- यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” ” सुप्त पण जीवघेणी स्पर्धा,” येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत.भाजपच्या नियमानुसार त्यांनी सेवानिवृत्त व्हावे,यासाठी दबाव वाढत चालला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत,या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुप्त संघर्ष सुरू झाला आहे.मोदी व शहा हे दोघेही सध्या संघाचे जोखड झुगारून देशाचा कारभार करत असल्यामुळे संघ व भाजपमध्ये असलेली दरी सतत रुंदावत चालली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र २०२९ मध्ये निवडणूक लढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत.संघाला मात्र देशाचे नेतृत्व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवले पाहिजे,असे वाटत आहे.संघाच्या या हालचाली पाहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काही महिन्यांपूर्वी…
सुरेश काटे,तलासरी व्यवसायिक,व्यापारी व हॉटेल मालक यांची संयुक्त बैठक संपन्न, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत जिल्हा प्लास्टिक मुक्त तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरक्षितता,स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आले होते. त्यानुसार तलासरी तहसीलदार तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तलासरी आणि आरटीओ अधिकारी यांचा उपस्थितीत हॉटेल व्यवसायिक,आस्थापना दुकानदार यांची बैठक तलासरीत नुकतीच पार पडली. तलासरी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत प्लास्टिक मुक्त रस्ते, करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.प्लास्टिकचा वापर बंद करून सिंगल प्लास्टिक वापरण्यात येऊ नये,यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुक…
वसंत भोईर,वाडा यांत्रिकी पद्धतीने भातलागवडीकडे वाढला कल. वाडा तालुक्यात जुलैच्या दुस-या आठवड्यापासून सर्वत्र भातलावणीच्या कामाला जोमाने सुरुवात करण्यात आली असून मजुरांच्या कमतरतेमुळे यावेळेस तालुक्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिकी भात लागवडीकडे कल जास्त असल्याचा दिसत आहे.यात मेहनत,वेळ व खर्चाची मोठी बचत होत आहे. वाड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्व तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.मात्र एकाचवेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्यानमुळे वाडा तालुक्यात मजुरांची मोठी कमतरता नेहमीच भासत असते.त्यामुळे विक्रमगड,तलासरी,जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागतात.त्यात मजुरांचे दरही वाढले आहेत.एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रू.अधिक सकाळी न्याहरी,दुपारी जेवणही द्यावे लागते.त्यामुळे शेती हा जास्त कष्टाचा आणि खर्चिक व्यवसाय…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा, जागतिक युवा कौशल्य दिन हा दिवस दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना २१ व्या शतकातील बदलत्या औद्योगिक व तांत्रिक गरजांशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांची जाणीव करून देणे, त्यांना सशक्त करणे असा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.या पार्श्वभूमीवर भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जव्हार येथे आज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी भूषवले.त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य शिक्षणाचे महत्त्व सांगताना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला सतत अपडेट ठेवण्याची गरज अधोरेखित केली.कार्यक्रमासाठी जेराई फिटनेसचे प्रतिनिधी संकेत पोलादिया आणि मंगेश शेटे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.तसेच…
दीपक मोहिते, ” शिक्षणाच्या आयचा घो,” शिक्षण विभागाचा ” पायपोस त्यांच्याच पायात नाही,”… राज्यसरकारच्या शिक्षण विभागाची अवस्था ” असुन अडचण,नसून खोळंबा,अशी झाली असुन या विभागात सुधारणा करण्यासाठी आजवर एकाही शिक्षणमंत्र्याने जाणीवपुर्वक प्रयत्न केले नाहीत.या विभागाच्या दिशाहीन कारभारामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे सध्या तीन तेरा वाजले आहेत.भविष्यातही त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही. शिक्षणाचा अधिकार कायदा झाला,पण शैक्षणिक संस्थानी त्याचा पार चोळा मोळा करून टाकला.त्यांना या कामी निष्काळजी असलेल्या शिक्षण विभागाचा कायम हातभार लागला. काल,विधानसभेत भाजपचे मुंबईतील आ.योगेश सागर यांनी शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारावर टीका करत शिक्षणमंत्र्यांना देखील खडे बोल सुनावले.यावेळी त्यांनी शालेय संस्थाकडून शैक्षणिक शुल्कामध्ये करण्यात येणाऱ्या शुल्कवाढीवर अंकुश लावण्यासंदर्भात त्यांनी मुद्दा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” चड्डी-बनियन गँग ; सरकारची अब्रु चव्हाट्यावर, काल विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या उच्छादावर सभागृह व सभागृहाबाहेर ज्या पद्धतीने हल्ला चढवला,त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बोलती बंद झाली.आ.आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या घणाघाती भाषणात मंत्रीमंडळातील चड्डी-बनियन गँगवरून फडणवीस सरकारची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली.त्यामुळे महायुतीच्या अनेक आमदारांच्या अंगाची लाही लाही झाली.शिंदे गटाचे आ.निलेश राणे यांनी तर भर सभागृहात अनावश्यक केकाटणेच सुरू केले होते.पण त्यांच्या केकाटण्याची फारशी कोणी दखल घेतली नाही.या सर्व घडामोडीमुळे आदित्य ठाकरे यांचा तीर सत्ताधारी पक्षाच्या वर्मी बसल्याचे स्पष्ट झाले.या सर्व घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर चड्डी- बनियन घालून आगळे वेगळे आंदोलन केले.या सर्व घडामोडीमुळे महायुती…
दीपक मोहिते, समाधानाची बाब, वसई-विरारच्या प्रलंबित विकासकामाबाबत सरकार सकारात्मक, भाजपच्या दोन्ही आमदारांनी आपल्या वसई व नालासोपारा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा चालवला आहे.नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात या दोघांनी तारांकित व लक्षवेधी,अशी आयुधे वापरत तालुक्याच्या अनेक समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर ज्या वेगाने या दोघांनी प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा चालवला आहे,त्याचा त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत फायदा होऊ शकतो.काल आ.स्नेहा दुबे पंडित,आ.राजन नाईक व खा.डॉ.हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन प्रलंबित विकासकामासंदर्भात सविस्तर चर्चा केली.सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत जि.प.च्या ११६ प्राथमिक शाळा,३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १२ उपकेंद्रे, महानगरपालिकेकडे हस्तांतर करणे, महानगरपालिका…
*दीपक मोहिते,* कौन बनेगा सिकंदर ? *विरार पूर्व,* *१ ) मनवेलपाडा,* *२ ) संतनगर,* *३ ) कारगिलनगर,* *४ ) साईनाथ नगर,* *५ ) सहकार नगर,* *६ ) चंदनसार,* *७ ) कोपरी,* *८ ) मांडवी,* *विरार पश्चिम:-* *१ ) विराटनगर,* *२ ) एम.बी.इस्टेट,* *३ ) विवा महाविद्यालय,* *४ ) स्टार बाझार परिसर,* *५ ) ग्लोबल सिटी,* *६ ) चिखलडोंगरे / नारिंगी,* *७ ) गोकुल टाऊनशिप,* *८ ) बोळींज,* *९ ) आगाशी /पुरापाडा/ कोल्हापूर,* *१० ) नंदाखाल / नानभाट,* *११ ) उमराळे / करमाळे,* *नालासोपारा पूर्व :-* *१ ) मोरेगाव,* *२ ) निळे गांव,* *३ ) तुळींज / डोंगरी,* *४ )…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अत्यंत मागासलेले झारखंड राज्य आणि वास्तवापासून फारकत घेतलेला मुजोर खा.निशिकांत दुबे, झारखंडचा खासदार निशिकांत दुबे याने आपल्या राज्यातील उद्योग व नैसर्गिक संसाधनाविषयी ( गौण खनिज,वनसंपदा ) शेखी मिरवत,तुमच्या महाराष्ट्रात काय आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.वास्तविक दुबे यांच्या या प्रश्नाला उत्तर देणे,मनाला पटणारं नाही,पण ते द्यायलाच हवे,कारण ” म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवतो,” या म्हणीनुसार त्याच्याशी वागायला हवे..… खा.निशिकांत दुबे याने अत्यंत अशिक्षित माणसासारखे वक्तव्य करून स्वतःचे हसं करून घेतले आहे.तुमच्या महाराष्ट्रात काय आहे ? असा प्रश्न विचारण्यापूर्वी खासदार असलेल्या दुबे याने देशाच्या विविध राज्यातून गोळा होणाऱ्या जीएसटी रकमेच्या आकडेवारीवर एक नजर टाकायला…
दीपक मोहिते, पुनर्विकास मार्गदर्शन शिबीर ; जनजागृतीसाठी एक चांगला उपक्रम, वसई विरार भागात पुनर्विकासाचे आता वारे वाहू लागले आहेत,याविषयी जनतेला माहिती मिळावी,यासाठी पुनर्विकास समितीतर्फे ” स्वयं:पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.वसईत होणाऱ्या या मार्गदर्शन शिबिराच्या निमंत्रकपदी वसईच्या आ.स्नेहा दुबे या आहेत. वसई व नालासोपारा या दोन शहरात गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.नालासोपारा शहरातील ४१ अनधिकृत इमारतीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.समाजकंटकांनी आरक्षित जमिनीवर या इमारती उभारल्या व त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेने दोन महिन्यापूर्वी जमिनदोस्त केल्या.त्यामुळे सुमारे ४०० कुटुंबे बेघर झाली आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर आ.राजन नाईक व आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रकरणी पुढाकार…
