Author: दीपक मोहिते

प्रितेश पाटील, ” रणसंग्राम,” डहाणू विधानसभा ; निकोले व मेढा या दोघांमध्ये सरळ लढत, महाराष्ट्राचे शेवटचे टोक असणाऱ्या आदिवासी बहुल डहाणू अनु.जमाती विधानसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी,खरी लढत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्स.कम्यु. पक्षाचे विद्यमान आमदार कॉ.विनोद निकोले आणि महायुतीचे भाजपच उमेदवार विनोद मेढा यांच्यात होत आहे.जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार कल्पेश भावर,बहुजन विकास आघाडीचे सुरेश पाडवी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय वाडिया,बहुजन समाज पक्षाचे संतोष ठाकरे,अपक्ष उमेदवार वसंत भसरा,आणि मिना भड रिंगणात असले तरी खरी लढत निकोले व मेढा या दोघांमध्ये होईल,असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे. डहाणू अ.ज.विधानसभा मतदारसंघात एकूण ३…

Read More

दीपक मोहिते, रणसंग्राम, आज संध्या.प्रचार थंडावणार,उमेदवारांची जीवाची घालमेल सुरू, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ च्या मतदानाला अवघे ४८ तास उरले आहेत.आज संध्या.५.०० वाजता या निवडणुकीचा प्रचार थंडावणार आहे.गेले १४ दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने या निवडणुकीच्या प्रचारात मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणे,चौक सभा,बाईक रॅली,पदयात्रा,यावर भर दिला.भाजप एकमेव पक्षाचा अपवाद वगळता इतर राजकीय पक्षांनी जाहीर सभा घेतल्या नाहीत.केंद्रीय मंत्री राजनाथसिंह काल येऊन गेले. आज प्रचार बंद होणार असला तरी छुपा प्रचार मात्र सुरूच राहणार आहे,तसेच आज व उद्या अशा दोन रात्री ” रात्रीचा खेळ चाले,” हे नाट्य जोमात रंगण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या अनेक…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक संग्राम, पालघर विधानसभा ; गावित – दुबळा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत, १३० पालघर विधानसभा मतदारसंघात चार प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अन्य काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावत आहेत.अनु .जमातीसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघात राजेंद्र गावित शिवसेना ( शिंदे गट ) व जयेंद्र दुबळा शिवसेना ( उबाठा ) या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पालघरवासियांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे.त्याचा फायदा त्यांच्या पक्षाच्या जयेंद्र दुबळा यांना होण्याची दाट शक्यता आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला.पक्षात फूट पडल्यानंतर सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले.त्यामध्ये पालघर नगरपरिषद,पालघर पंचायत समिती,पालघर जिल्हा…

Read More

दीपक मोहिते, निवडणुकीच्या जीवघेण्या खेळामध्ये शेतकरी/कष्टकरी दुर्लक्षित, ” सूर्यातीर,” राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला कोणालाही वेळ नाही.ग्रामीण भागातील आमचा हा कष्टकरी अन्नदाता,सध्या अडचणीत सापडला आहे.पिकाची नुकसानी व जगण्याची धडपड,अशा कात्रीत सापडला आहे.दुसरीकडे आलिशान गाड्यातून फिरणारे राज्यकर्ते मात्र आपल्याच धुंदीत वावरत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या हातात आली पाहिजे,यासाठी या मंडळींची कटकारस्थाने सुरू आहेत.प्रचारात उमेदवार व त्यांचे नेते अवकाळी पाऊस,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,शेतमालाला हमी भाव,पिकाची पाहणी,पंचनामे,अहवाल व त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया,यास मूठमाती देऊन ही मंडळी एकमेकाची बदनामी करण्याच्या खेळात मग्न आहेत.पावसाळ्याच्या मध्यात अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी व परतीच्या पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते केले.पण एकाही पक्षाला या ज्वलंत प्रश्नाची दखल…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” महायुतीच्या नेत्यांना सध्या भितीने ग्रासले आहे… विधानसभा निवडणूकीची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.२३ नोव्हे.रोजी कसा निकाल लागेल ? याविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.महाराष्ट्र राज्य ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते तर मुंबई शहर देशाची तिजोरी असून त्याच्या चाव्या आपल्याकडे असाव्यात,यासाठी सध्या हा रणसंग्राम सुरू आहे.२० नोव्हें.२०२४ रोजी राज्यातील ९ कोटी जनता आपले २८८ लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. पूर्वी देश व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असायची,पण १९७७ सालापासून विविध पक्षाने एकत्र येऊन युती व आघाड्या स्थापन केल्या. १९४७ ते १९७७ पर्यंत एकाच पक्षाच्या हाती सत्ता होती.१९७७ साली…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” रात्रीच्या वेळी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होणे गरजेचे, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आजपासून जागोजागी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघात पैशाचा ओघ सुरू झाला आहे.स्थानिक पोलिसांनी तीन ठिकाणी वाहनांची तपासणी करून कोट्यवधी रु.जप्त केले आहेत.त्या पार्श्वभूमीवर वसई – विरार पोलीस आयुक्तालयाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.काल रात्री प्रचार संपल्यानंतर अनेक वाहने परिसरात फिरत होती,ती वाहने कोणत्या पक्षाची होती,त्याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा.केवळ चौकाचौकात महिला पोलिसांना बसवून मतदारसंघात होणारी पैशाचे आवागमन रोखणे कदापी शक्य होणार नाही.निवडणूक अधिकारी व पोलीस यांनी कोंबिंग ऑपरेशन हाती घेणे अनिवार्य आहे. मतदानाला अवघे ७२ तास उरले असून…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, भाई उर्फ जयेंद्र ठाकूर यांच्या प्रचारात हजारो तरुण सहभागी, आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना,आ.हितेंद्र ठाकूर यांचे थोरले बंधू जयेंद्र ठाकूर यांनी गेल्या चार दिवसांपासून तिन्ही विधानसभा मतदासंघाचा ग्रामीण भाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या प्रचारात तरुण,ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.त्यांच्या धुवांधार प्रचाराला शहरी व ग्रामीण भागात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधी उमेदवारांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. भाई उर्फ जयेंद्र ठाकूर हे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे काँग्रेसचे माजी ज्येष्ठ पदाधिकारी व विविध संस्थांचे विश्वस्तही सहभागी होत आहेत.विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारात तरुण वर्गाचा मोठा भरणा पाहायला मिळतो.भाई ठाकूर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजप खासदारांकडून ” घरचा आहेर,” सूर्याला कितीही लपवून ठेवलं तरी सकाळ व्हायची टळत नाही,अशीच एक घटना नालासोपारा येथे घडली.काल राज्यसभा खा.सीमा द्विवेदी या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नालासोपारा शहरात आल्या होत्या.त्यांनी या मतदारसंघात झालेल्या विकासाबाबत माध्यमाकडे आपले मतप्रदर्शन केले.त्या म्हणाल्या,” मी प्रत्येक निवडणुकीत नालासोपारा येथे येत असते.गेल्या काही वर्षात या परिसराचा मोठ्याप्रमाणात विकास झाला आहे.रस्ते पाणी,भवन या साऱ्या समस्या सुटल्या असून पूर्वीच्या तुलनेत भरपूर विकास झाला आहे.माध्यमांशी त्या बोलत असताना त्यांच्यासोबत असलेले भाजपचे उमेदवार राजन नाईक यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांना या परिसरातील विकासकामे पाहून कौतुक वाटते.पण स्थानिक पदाधिकारी व…

Read More

दीपक मोहिते, ” वास्तव,” वसई-विरारमधील विकासकामांना प्रत्यक्ष  मिळालेल्या निधीपेक्षा अधिक “आमदार निधी,” खर्च, पालघर जिल्ह्यातील अन्य आमदारांच्या तुलनेत आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी प्रत्यक्ष रकमेपेक्षा अधिक ” आमदार निधी,” वसई-विरार शहरांतील विकासकामांवर खर्च केला आहे,असा खुलासा बहुजन विकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे. आ.क्षितिज ठाकूर यांनी सन २०१९ – २० ते सन २०२४ – २५ या पाच वर्षांच्या कालावधीत १७ कोटी ८५ लाख ३० हजार ९०रु.चा निधी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी वापरात आणला आहे,अशी माहिती देत बहुजन विकास आघाडीने विरोधकांना तोंडघशी पाडले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनी ” आमदार निधी,” खर्च न केल्याने तो तसाच पडून…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, स्थानिक उमेदवाराची नाळ मातीशी जुळलेली असते.. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे चार दिवस उरले आहेत.त्यामुळे या चार दिवसात जाहीर सभांना उत येणार आहे.प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या राष्ट्रीय नेत्यांना या जाहीर सभांसाठी पाचारण करणार आहेत.बाहेरच्या नेत्यांना पाचारण करून मतदार आपल्याकडे वळतील,अशी अपेक्षा करणे,मुळात चुकीचे आहे.लोक जाहीर सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावतात,पण ते नेत्यांची भाषणे ऐकून आपली मते देत नसतात.जाहीर सभेला येणारी मंडळी केवळ भाषणे ऐकायला येत असतात.पण आपले मत कोणाला द्यायचे हे मनात पक्के ठरवून असतात.जो उमेदवार परिसर विकासाला सर्वोच्च प्राधान्य देतो,मतदार त्यालाच डोक्यावर घेत असतात.तीन दशकांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वसईमध्ये भूतो…

Read More