Author: दीपक मोहिते

मनिष धानू,डहाणू, पहिल्याच कासा महोत्सवाला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद, पालघर जिल्ह्यात कृषी,फलोत्पादन व आदिवासीच्या विविध संस्कृती,याचे यथार्थ दर्शन घडवणारे विविध महोत्सवाची मांदियाळी पाहायला मिळते.डहाणू,चिकू व त्यानंतर आता कासा महोत्सवाचा यामध्ये समावेश आहे.काल पहिल्या कासा महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.या कार्यक्रमास खासदार,आमदार,राजकीय नेते,वरिष्ठ पोलीस, शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.काल पहिल्याच दिवशी पर्यटकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.हा महोत्सव ९ फेब्रु.पर्यंत चालणार आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कासा येथे यंदा पहिल्यांदाच कासा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्थानिक आदिवासी समाजाची कलाकृती व संस्कृतीचे दर्शन घडावे,त्यांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळावी,असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उदघाटन…

Read More

शुभांगी शिंदे,नाशिक, महिला तक्रार निवारण समितीच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – विजया रहाटकर, महिलांना आपल्या कार्यालयात भयमुक्त व सुरक्षित वातावरण मिळाले, तर त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामातून दिसू शकेल.कार्यालयात असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची आहे.त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातून महिला तक्रार समितीच्या कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून ( प्रतिबंध, मनाई व निवारण ) अधिनियम २०१३ अन्वये गठीत करण्यात आलेली अंतर्गत समितीबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अवर सचिव शालिनी रस्तोगी, जिल्हाधिकारी जलज…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन, ५ लाख लाडक्या बहिणी ठरल्या सावत्र बहिणी, सहा महिन्यांपूर्वी ज्या लाडक्या बहिणींवर धनवर्षाव झाला होता,त्या लाडक्या बहिणींवर आता संक्रात आली आहे.महायुती सरकारने सुमारे ५ लाख लाडक्या बहिणींना आता सावत्र बहिणी ठरवल्या आहेत.आणखी किती बहिणींना महायुतीचे सरकार सावत्र बहीण ठरवणार आहेत,देवजाणे ? गेल्या डिसें.महिन्यात या योजनेचा लाभ देताना लाडक्या बहिणींची आकडेवारी २ कोटी ४६ लाख इतकी होती,ती जाने.२०२५ मध्ये २ कोटी ४१ लाखावर आली.निवडणूकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना कार्यान्वित करून तमाम विरोधी पक्षांना चारी मुंड्या चित केले.या योजनेसाठी येणारा प्रचंड खर्च हा राज्याला परवडणारा नाही,हे माहीत असतानाही महायुतीच्या नेत्यांनी या योजनेची धुमधडाक्यात अंमलबजावणी केली.त्याचे सकारात्मक परिणाम…

Read More

संजय लांडगे,वाडा, खा.सावरा यांनी केली मनरेगाच्या अकुशल कामगारांच्या थकीत निधीची मागणी, आज खा. सवरा यांनी केंद्रीय ग्रामीण विकास कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराज चौहान यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना दिले. मनरेगा अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांचे थकित देयक निधी मिळावे, यासाठी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ( मनरेगा ) अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांचे थकित देयक निधी त्वरित मुक्त करण्याची विनंती केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज चौहान यांना केली. २६ कोटी ४० लाख इतकी थकबाकी असून मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहॆ.त्यामुळे कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम…

Read More

संजय लांडगे,वाडा, सोशल मीडियाच्या वापराबाबत वाडा पोलिसांचे मार्गदर्शन, पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जनसंवाद अभियान अंतर्गत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी वाडा येथील रियल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. या सत्रात त्यांनी विशेषतः सोशल मीडियाच्या सुरक्षित आणि जबाबदारीपूर्ण वापरावर भर दिला.आपल्या मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात म्हणाले,सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन असले तरी त्याचा चुकीचा वापर गंभीर परिणाम घडवू शकतो.विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील गोपनीयता, वैयक्तिक माहिती,फोटो, लोकेशन यांसारखी माहिती शेअर करताना दक्षता घेणे आवश्यक आहे.साइबर गुन्ह्यांची ओळख,फेक अकाउंट्स,फिशिंग,सायबर बुलींग यासारख्या धोकादायक गोष्टींपासून सावध राहण्याचे महत्व पटवून दिले. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने वापर हा महत्वाचा असून कोणतीही…

Read More

अविनाश मढवी,नालासोपारा, ९ फेब्रू.रोजी नालासोपाऱ्यात फनस्ट्रीट संडे, वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग व जागरुक नागरिक संस्था व नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रवि.९ फेब्रु.रोजी नालासोपारा पश्चिमेकडे फनस्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे.मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे. नागरिकांना लहानपणी त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी,यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने फनस्ट्रीट या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहॆ.या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील…

Read More

शुभांगी शिंदे, मालेगाव महानगरपालिकेत अग्निशमन प्रतिबंधक व जीवसंरक्षक प्रणाली कार्यान्वित.* मालेगाव महानगरपालिकेकडून दोन वर्षापूर्वी ३० खाटांचे अलहज हारून अन्सारी हॉस्पिटलच कार्यान्वित करण्यात आले होते.यापूर्वी या महानगरपालिकेत प्राथमिक स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात होती.पंरतु सदर यंत्रणा चालु नसल्याचे बाब मुख्य अग्निशमन अधिकारी यानी आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांचे निदर्शनास आणुन दिली.त्यानंतर आयुक्तानी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जिवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ अन्वये अग्निप्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित करण्या कामी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना सुचना केल्या.त्यानंतर अग्निशमन विभागाकडून ई – निविदा प्रक्रिया राबवण्यात येवून अग्नि प्रतिबंधक उपाययोजनेचे काम पुर्ण झाले. आयुक्त तथा प्रशासक महोदयांच्या उपस्थितीत मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी त्याची तपासणी नुकतीच…

Read More

शुभांगी शिंदे,नाशिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे – कृषिमंत्री कोकाटे, रासायनिक खतांमुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे,असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. आज युथ फेस्टिवल मैदान येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाच्या उदघाटन प्रंसगी ते बोलत होते.यावेळी आ. दिलीप बनकर,अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, कृषी सहसंचालक सुभाष काटकर,कृषी उपसंचालक जगदीश पाटील,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद,माजी नगरसेवक उद्धव निमसे,वत्सलाताई खैरे यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. कृषीमंत्री ॲड.कोकाटे पुढे म्हणाले की,रासायनिक खतांचा शेतीत अतिप्रमाणात वापर केल्यामुळे शेतजमीन नापीक होते.त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” एसटी महामंडळाचे अध्यक्षपद : फडणवीस यांचा शिंदे गटाला आणखी एक धक्का, बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळख असलेल्या प्रताप सरनाईक यांनी परिवहनमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच त्यांच्यामधील बांधकाम व्यवसायिक अचानक जागा झाला.त्यांची वाकडी नजर एसटी महामंडळाच्या हजारो कोटी रु.मोकळ्या जमिनीवर गेली आहे.या जमिनीचा विकास करून महामंडळाला तोट्यातून नफ्यात आणण्याचे ते ” हसीन सपने,” बघू लागले.पण राजकारणात बेरके असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सरनाईकांचे प्रताप ओळखले व त्यांचे पंखच छाटून टाकले. फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेले महामंडळाचे अध्यक्षपद काढून घेत,त्यांच्याजागी राज्याचे अति.सचिव संजीव सेठी यांची अध्यक्षपदी वर्णी लावली आहॆ. हा शिंदे गटाला आणखी एक धक्का असल्याचे मानण्यात येत आहॆ. परिवहनमंत्रीपदी…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर लवकरच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार, पालघर जिल्ह्यात जव्हार येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणे व विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा,अशा दोन मागण्या शिवसेनेचे शिंदे गटातील निकी नाईक यांनी केली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड व मोखाडा हे आदिवासीबहुल व अति दुर्गम तालुके असुन या भागात आरोग्याच्या समस्या मोठ्याप्रमाणात आहेत.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जिल्ह्यात दरवर्षी कुपोषण व साथीचे आजाराचा प्रादुर्भाव होत असतो.पण वरील आदिवासीबहुल तालुक्यात प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना उपचारासाठी मुंबई,नासिक व केंद्रशासित प्रदेशातील सेल्वासा येथे जावे लागते. या ज्वलंत समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात व…

Read More