संजय लांडगे,वाडा,
सोशल मीडियाच्या वापराबाबत वाडा पोलिसांचे मार्गदर्शन,
पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जनसंवाद अभियान अंतर्गत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी वाडा येथील रियल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
या सत्रात त्यांनी विशेषतः सोशल मीडियाच्या सुरक्षित आणि जबाबदारीपूर्ण वापरावर भर दिला.आपल्या मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात म्हणाले,सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन असले तरी त्याचा चुकीचा वापर गंभीर परिणाम घडवू शकतो.विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील गोपनीयता,
वैयक्तिक माहिती,फोटो, लोकेशन यांसारखी माहिती शेअर करताना दक्षता घेणे आवश्यक आहे.साइबर गुन्ह्यांची ओळख,फेक अकाउंट्स,फिशिंग,सायबर बुलींग यासारख्या धोकादायक गोष्टींपासून सावध राहण्याचे महत्व पटवून दिले. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने वापर हा महत्वाचा असून कोणतीही पोस्ट शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे,चुकीच्या किंवा द्वेषपूर्ण माहीतीला प्रसिद्धी न देणे,यावर भर देण्यात आला.तर मजबूत पासवर्ड वापरणे,दोन-स्तरीय प्रमाणीकरण सक्रिय करणे, तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करणे,टाळणे याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी देखील यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्न विचारून सविस्तर माहिती घेतली.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि जबाबदारीचे भान निर्माण झाले.रियल ॲकॅडमी च्या वतीने पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आभार मानण्यात आले.

