शुभांगी शिंदे,
मालेगाव महानगरपालिकेत अग्निशमन प्रतिबंधक व जीवसंरक्षक प्रणाली कार्यान्वित.*
मालेगाव महानगरपालिकेकडून दोन वर्षापूर्वी ३० खाटांचे अलहज हारून अन्सारी हॉस्पिटलच कार्यान्वित करण्यात आले होते.यापूर्वी या महानगरपालिकेत प्राथमिक स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात होती.पंरतु सदर यंत्रणा चालु नसल्याचे बाब मुख्य अग्निशमन अधिकारी यानी आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांचे निदर्शनास आणुन दिली.त्यानंतर आयुक्तानी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जिवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ अन्वये अग्निप्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित करण्या कामी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना सुचना केल्या.त्यानंतर अग्निशमन विभागाकडून ई – निविदा प्रक्रिया राबवण्यात येवून अग्नि प्रतिबंधक उपाययोजनेचे काम पुर्ण झाले.
आयुक्त तथा प्रशासक महोदयांच्या उपस्थितीत मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी त्याची तपासणी नुकतीच पुर्ण केली.
तसेच अलहज हारून अहमद अन्सारी हॉस्पिटल अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत मॉक ड्रिलचेही आयोजन करण्यात आले होते.त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल दुसाने,विराज धावणे, डॉ.अनिस,डॉ.निशात, डॉ.समिना,डॉ.आफरीन, लिपीक साजिद अन्वर, तज्जमुल शेख व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

